कराड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधून निवडून आलेल्या अपक्ष नगरसेविका सौ. तेजश्री सुदर्शन पाटसकर यांच्या पालिकेतील स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे आणि तत्परतेने सोडविण्याच्या उद्देशाने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
या कार्यालयाचे उद्घाटन सौ. आशा विष्णू पाटसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक विजयसिंह यादव, नगरसेवक जयंतकाका पाटील, विष्णुकाका पाटसकर, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर तसेच लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीचे सर्व नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास स्थानिक कार्यकर्ते, नागरिक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नगरसेविका तेजश्री पाटसकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रभागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, प्रकाशयोजना यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी बोलताना नगरसेविका तेजश्री पाटसकर यांनी सांगितले की, “ जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी व विकासकामांना गती देण्यासाठी हे स्वतंत्र कार्यालय महत्त्वपूर्ण ठरेल. नागरिकांनी कोणत्याही समस्येसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.”
नवीन कार्यालयामुळे प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिकांना त्यांच्या प्रश्नांसाठी थेट प्रतिनिधींशी संपर्क साधणे सुलभ होणार असून प्रशासनाशी समन्वय अधिक प्रभावीपणे साधता येणार आहे. त्यामुळे प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
No comments:
Post a Comment