कराडमधील जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने "कराड संग्रहालय' नावाचे दालन उभे करण्याचा मानस आहे यासाठी नगरपरिषदेच्या वतीने जागा व इमारत आम्हाला उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ट्रस्ट चे अध्यक्ष विनायक गरुड यांच्यावतीने कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
निवेदनात म्हटले आहे की
जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट हे गेली कित्येक वर्षं कराडमध्ये कार्यरत आहे अनेक सामाजिक ऐतिहासिक धार्मिक अशा अनेकविविध उपक्रमांना या ट्रस्ट च्या वतीने राबवण्यात येते तसेच याठिकाणी विविध मार्गदर्शनपर कार्यशाळा रक्तदान शीबीरे व स्वयंरोजगार कौशल्य मार्गदर्शनपर शिबिरे देखील राबवली जातात अनेक पौराणिक व ऐतिहासिक वस्तुचा संग्रह तसेच कराडच्या इतिहासाची महती सांगणारी अनेक ऐवजे या ट्रस्ट कडे संग्रही आहेत ज्याद्वारे कराडच्या प्राचीन ईतिहासावर प्रकाश टाकला जाऊ शकतो या व अशा अनेक बाबींद्वारे कराडच्या अनेक पैलूंना या कराड संग्रहालयाच्या माध्यमातून लोकांसमोर आणले जाऊ शकते
सध्या हे संग्रहालय भाड्याच्या जागेत सुरू आहे तरी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी यात लक्ष घालून व पाठपुरावा करून आम्हाला नगरपरिषदेच्या माध्यमातून योग्य ते सहकार्य करावे असेही या निवेदनात म्हटलय
No comments:
Post a Comment