वेध माझा ऑनलाईन।
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी व्याही अरूण लखानी यांची सुद्धा वर्णी लागली आहे. लखानी हे प्रदेश कार्यकारिणीत सह कोषाध्यक्ष असतील. तर या बहुप्रतिक्षित प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहर्यांना सुद्धा संधी मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचे व्याही अरूण लखानी सह कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील
भाजप प्रदेश कार्यकारिणीत खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरूण लखानी यांची वर्णी लागली आहे. त्यांना सह कोषाध्यक्ष पद देण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचे लग्न सारंग अरुण लखानी यांच्यासोबत निश्चित झाले आहे.
सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि पुढे सुप्रिया सुळे यांनी याविषयीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती. विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरूण लखानी हे आहेत. ते मूळचे नागपूरचे आहेत. रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात सार्वजनिक-खासगी भागीदारी PPP प्रकल्पांसह इतर अनेक उद्योगात हा समूह आघाडीवर आहे.
No comments:
Post a Comment