Monday, February 2, 2026

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली ;

वेध माझा ऑनलाइन।
आज कराड येथील प्रीतिसंगम येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. 
सन्मानीय वेणुताई यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाला भेट देत, स्व. यशवंतराव चव्हाण साहेब व वेणुताई चव्हाण यांच्या पुतळ्यांना त्यांनी पुष्पहार अर्पण केला. 

तटकरे यांची पोस्ट व्हायरल; 
आमचे नेते तसेच राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार  यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळाचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आणि प्रेरणादायी होते. अजितदादा अनेक वेळा कराड येथे येऊन समाधीस्थळी दर्शन घेत, महाराष्ट्राच्या भाग्यविधात्यासमोर नतमस्तक होत आणि त्यांच्या विचारांतून समाजाभिमुख कार्यासाठी नवी ऊर्जा घेत असत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली.

यावेळी  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील  खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील  उपस्थित होते.तसेच जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोशी आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment