वेध माझा ऑनलाइन।
बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या भीषण विमान अपघातातअजित पवार यांचे निधन झाले. या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अपघातामागे तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू असतानाच आता नागरी उड्डाण मंत्रालय यांनी तपासाबाबत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,
अपघातग्रस्त ‘Learjet 45’ या विमानाचा ब्लॅक बॉक्स नवी दिल्ली येथे पोहोचला असून त्यातील डेटा यशस्वीरित्या डाऊनलोड करण्यात आला आहे. तपासाची जबाबदारी कडे असून आंतरराष्ट्रीय मानांकानुसार सखोल चौकशी सुरू आहे.
विमानातील डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर मधील माहिती मिळवण्यात यश आले आहे. हा रेकॉर्डर L3 कम्युनिकेशन्स कंपनीने तयार केलेला असून त्यातील माहितीचे विश्लेषण दिल्लीतील AAIB प्रयोगशाळेत सुरू आहे. या डेटामधून अपघाताच्या क्षणांपूर्वी विमानाची स्थिती, उंची, वेग आणि इतर तांत्रिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
मात्र कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर ला आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. हे उपकरण हॅनीवेल कंपनीचे असल्याने त्यातील माहिती पुनरप्राप्त करण्यासाठी परदेशी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. त्यामुळे तपासाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
अपघातानंतर सरकारने संबंधित विमान कंपनी ‘VSR व्हेंचर्स’च्या कामकाजाचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. 4 फेब्रुवारी 2026 पासून ऑडिट सुरू आहे. यात नियमपालन, देखभाल प्रक्रिया, वैमानिकांचे प्रशिक्षण आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीची तपासणी केली जात आहे.
मंत्रालयाने स्पष्ट केले की
आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या नियमांनुसार अपघाताचा प्राथमिक अहवाल 30 दिवसांच्या आत प्रसिद्ध केला जाईल. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत देशातील इतर नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर्स आणि VVIP उड्डाणांसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानतळांचेही टप्प्याटप्प्याने ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment