Monday, February 9, 2026

कराड उत्तरमध्ये आ.मनोजदादा घोरपडे यांचा करिष्मा ; भाजपची ताकद वाढली ;

वेध माझा ऑनलाइन।
आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांच्या साथीने कराड उत्तरेतील नऊ जिल्हा परिषद गटांपैकी सहा गटांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे कराड तालुक्यातील पाचपैकी चार जिल्हा परिषद गट भाजपकडे आले असून ही कामगिरी ऐतिहासिक मानली जात आहे.दरम्यान या निवडणुकीत मानसिंगराव जगदाळे व देवराजदादा पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे 
यानिमित्ताने कराड उत्तरमध्ये आमदार मनोजदादा घोरपडे यांचा करिश्मा पहायला मिळाला आहे 

कराड उत्तरमध्ये भाजप विरोधी राष्ट्रवादी अशीच प्रामुख्याने लढत पहायला मिळाली. पण आ. मनोजदादा घोरपडे आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी भाजप उमेदवारांना निवडून आणत उत्तरेत भाजपाला राजकीय वैभव मिळवून दिले आहे.
कोपर्डे हवेली गटातून भाजपाचे नेते रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडाचे निशान फडकावत या गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवाय याच गणातील दोन्ही अपक्ष उमेदवारांना त्यांना सोबत घेतले होते. अटीतटीच्या लढतील त्यांच्या पत्नी विद्या रामकृष्ण वेताळ विजयी झाल्या. कोपर्डे हवेली गणात राष्ट्रवादी बाळासाहेब पाटील गटाचे सिध्दार्थ चव्हाण विजयी झाले. तर वाघेरी गणात भाजपच्या अनिता वेताळ विजयी झाल्या आहेत. या गटात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. पण येथे अपक्ष उमेदवाराला मतदारांनी पसंती दिली. राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या स्थानावर गेला आहे.
सैदापूर जि.प.गटात मोठी चूरस पहायला मिळाली. भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा फटका भाजप उमेदवारांना बसणार का, अशी चर्चा सुरू होती. मात्र या गटात जि.प.व गणातील दोन्ही उमेदवार भाजपाचे निवडून आले. या गटात राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाने स्वतंत्र उमेदवार दिले होते. शिवाय दोन अपक्ष उमेदवार रिंगणात होते. मतविभागणीचा फायदा भाजप उमेदवारांना झाला. या जि.प. गटात भाजपाचे सागर शिवदास पुन्हा विजयी झाले. तर यावेळी पहिल्यांदाच सैदापूर गण व हजारमाची गणात भाजपाचे दोन्ही उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी बाळासाहेब पाटील गट व काँग्रेसच्या गटाची या ठिकाणी पिछेहाट झाली आहे.
मसूर गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण याला सुरूंग लावण्याचे काम भाजपने केले आहे. जि.प.चे माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या ठिकाणी भाजपाचे लालासो जगदाळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सोमनाथ चव्हाण व अपक्ष कुलदीप क्षीरसागर यांनी चांगली लढत दिली पण त्यांना पराभवाचा समाना करावा लागला. मसूर गट व त्या अंतर्गत मसूर गण व वडोली भिकेश्वर हे दोन्ही गण अशा तिन्ही जागेवर भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या पाल जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजप यांच्या मध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार माधवराव उर्फ मदनभाऊ काळभोर विजयी झाले.  पाल गणात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रताप चव्हाण तर चरेगांव गणात भाजपच्या धैर्यजा माने विजयी झाल्या आहेत. दरम्यान आतापर्यंत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला पाल जिल्हा परिषद गट भाजपच्या ताब्यात घेण्यात आमदार मनोजदादा घोरपडे यांना यश आले आहे.
पाल जिल्हा परिषदेचे उमेदवार मदनभाऊ काळभोर हे जवळपास  997 मतांनी विजय जाहीर होताच कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला. कराड उत्तर मतदार संघातील पाल गट हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माजी शिक्षण सभापती तथा पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, भाजपकडून माधवराव उर्फ मदनराव  काळभोर, शिवसेना शिंदे पक्षाकडून नयनेश निकम हे प्रमुख उमेदवार असले तरी खरी लढत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजप यांच्यात झाली. कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी पाल गटावर विशेष लक्ष केंद्रीत केले होते.
उंब्रज जिल्हा परिषद गटात बहुरंगी लढत झाली असली तरी खरी लढत ही राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजप यांच्या मध्ये अत्यंत चुरशीची झाली. या लढतीत भाजपचे उमेदवार रणजित जाधव विजयी झाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे  उमेदवार संग्रामसिंह जाधव यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. दरम्यान भाजपचे उमेदवार रणजित जाधव यांचे उंब्रज येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कराड उत्तर मतदार संघातील उंब्रज गट हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र गतवर्षी विधानसभा निवडणूकीत भाजपचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांनी  माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पराभव करून कराड उत्तर मतदार संघावर भाजपचे वर्चस्व प्रस्थापीत केले होते. याच अनुषंगाने कोणत्याही परिस्थितीत उंब्रज जिल्हा परिषद गट भाजपकडे आला पाहिजे यासाठी आ. मनोजदादा घोरपडे यांनी स्वत: लक्ष घातले होते.
उंब्रज जिल्हा परिषद गटासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार रणजित जाधव पहिल्या फेरी पासून कमीजास्त प्रमाणात आघाडीवर होते. दोन्ही उमेदवार यांच्या मतामधील कमी जास्त होणारी आघाडी ही दोघा उमेदवाराबरोबरच कार्यकर्ते यांची धाकधुक वाढवणारी होती. दरम्यान भाजपचे उमेदवार रणजीत जाधव विजयी झाल्याचे समजताच उंब्रज येथे कार्यकर्त्यानी फटाकांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला. 

No comments:

Post a Comment