Saturday, August 22, 2020

आज 342 जण झाले कोरोनामुक्त

 सातारा दि. 21 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या  342 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 444 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.  
  विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  *जावली* तालुक्यातील 13, *कराड*तालुक्यातील 144, *खंडाळा* तालुक्यातील 25, *खटाव* तालुक्यातील 5, *कोरेगाव* तालुक्यातील 26,*महाबळेश्वर* तालुक्यातील 15, *माण* तालुक्यातील 4, *पाटण* तालुक्यातील 17, *फलटण* तालुक्यातील 16, *सातारा* तालुक्यातील 60, वाई तालुक्यातील 17 असे एकूण 342 नागरिकांचा समावेश आहे.
 
*444 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 12, कोरेगाव 30, खंडाळा येथील 90, मायणी येथील 22, महाबळेश्वर येथील 7, पानमळेवाडी 60, खावली येथील 160  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 63 असे एकूण 444 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुभाष चव्हाण यांनी दिली.
 
0000

अबब...जिल्ह्यात 361 जण बाधित ; काळजी घ्या सर्वांनी. ..

सातारा दि.22 (जिमाका):  जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 361 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
  *कराड* तालुक्यातील गोटे 1, कराड 1, पाटण कॉलनी शनिवार पेठ 2, विद्यानगर 1, बेलवडे बु. 2, कृष्णानगर उंब्रज 1, कोयना वसाहत मलकापूर 1, रविवार पेठ 1, कराड 1,  करवडी 1, कोळेवाडी 2, शनिवार पेठ पाटन कॉलनी 1, अष्टविनायक कॉलनी 1, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शनिवारपेठ मुळीक चोक 1, शनिवार पेठ 1, धरवशी गल्ली शनिवार पेठ 1, कोयना वसाहत 1,धोंडेवाडी 2, शनिवार पेठ 1, मुंढे 1, उंडाळे 9, कराड 9, हजारमाची 1, बनवडी 2, मसूर 3, यशवंतनगर 1, पाल 1, कालेटेक 1,  म्हावशी 1, शनिवार पेठ 1. आगाशिव नगर 2, साकुर्डी 1, पोलीस स्टेशन 1, रठरे बु. 1, मलकापूर 12, शेरे 1, कृष्णा मेडिकल कॉलेज 2, सह्याद्री हॉस्पिटल 3, गुरुवार पेठ 4, बाहे 5, मसुर 2, वाकण रोड 1,ओंढ 1, साळशिरंबे 1,जखीणवाडी1, वारुंजी 1, सुपणे 1,रविवार पेठ 3,  कार्वे 1, रेठरे खु.1, कोयना वसाहत 1, काले 1, हजारमाची 1, विद्यानगर 3, कोयना वसाहत 2, शनिवार पेठ 1, सोमवार पेठ 2, मसुर 1, शेरे 1, किवळ 1, श्री हॉस्पिटल 1, मंगळवार पेठ 2,उंब्रज 1.  मलकापूर 5,वाडोली 3, कराड 2 , कोळे 1, आगाशिवनगर 1.
  *सातारा* तालुक्यातील मंगळवार पेठ 1, पोलीस लाईन 1, शाहुपुरी 1, सातारा 1,अे.पी.कॉलनी शाहपुरी 1, शुक्रवार पेठ 1, गोडोली 1, घराळवाडी येवती 1, कसुंबी 1,किरोली वाठार 1,कुसुंबी 1, बेलवडे हवेली 1, सैदापूर 1, सातारा हेड ऑफिस 1, गोडोली 1, सिव्हील कॉलनी 1, विसावा नाका 1, पोलीस लाईन 1, देवी चौक 1,गुरुवार पेठ 1, सोमवार पेठ 1, सिटी पोलीस लाईन 2, निनाम 1, सदर बझार 2, सातारा 1, इंगळेवाडी (नुने) 1, पोलीस लाईन रविवार पेठ 1, म्हसवे (वर्ये) 1, भरतगाववाडी 1, पोलीस हेडक्वार्टर 1, मंगळवार पेठ 2, कुसुंबी 1, गोळीबार मैदान 1,मंगळवार पेठ 1, शाहुपुरी 1, करंजे 1, मोती चोक 2, सैनिक नगर सदरबझार 1.
भरतगाववाडी 1, कारंडवाडी 2, गजवडी 1, सुटकेस चोक 2,शिवथर 3, सातारा 9. वडुथ 1,
*खटाव* तालुक्यातील वांजळी 1, पुसेगाव 3, वेटणे 5.
*कोरेगांव* तालुक्यातील जोतिबाचामळा रहीमतपूर 1, पिंपोडे बु. 3, तडवळे 2,पतवाडी 1, आर्वी 1, पिंपोडे 1,धामनेर 3.
शांतीनगर 4, संभाजीनगर 1,कोरेगांव 1, पोलिस स्टेशन  2. कोरेगांव 1,
*फलटण* तालुक्यातील  संजीवराजे नगर 1, बुधवार पेठ 1,सोमवार पेठ 1, हत्तीखाना 1, लक्ष्मीनगर जल मंदिर 1, मोनिता गार्डन 1, कोळकी मालोजीनगर 1.  गोलेगाव 1,नांदळ 4, पाडेगांव 1,  हिंगणगाव 1, कोळकी 5, ठाकुर्की 2, पोलीस कॉलनी 1,
*महाबळेश्वर* तालुक्यातील गवली मोहोल्ला 1. महाबळेश्वर 10, नगरपालिका 1,
*माण* तालुक्यातील शिंदी खुर्द 1, गोंदवले बु. 1. दहिवडी 9. इंजबाव 4,
 *पाटण* तालुक्यातील सणबुर 2, पाटण 1, तारळे 1. येरफळे 1,
*खंडाळा* तालुक्यातील लोणंद 5, मरीआईचीवाडी 1.    रामोशी आळी  शिरवळ 1, शिरवळ 1, गुठले 1, शिंदेवाडी 3, पारगांव खंडाळा 1,भादे 3, वडवाडी 1, स्टार सिटी शिरवळ 1, लोणंद 7,  
*वाई* तालुक्यातील  उडतरे 4, केजळ 1, विरमाडे 1, पाचवड 1, ओझर्डे 1. ब्रामणपुरी 2. शेंदुर्जणे 2,बावधन ओढा4, उडतरे 11, बोपर्डी 2, बावधन 2, गणपत आळी 1, सिध्दनाथ वाडी 5, सोनगीरवाडी 4. पाचवड 1,
*जावली* तालुक्यातील मेढा 2, महिगाव 4, आनेवाडी 1, गोगवे 2. कुडाळ 5.
*इतर* 
आटपाडी  सांगली 1,   चिंचणी अंबक सांगली 2, बोरगाव वाला 1, 
*8 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे म्हसवड ता. माण येथील 83 वर्षीय पुरुष,पेरले ता. कराउयेथील 75 वर्षीय महिला,कठापुर ता. कोरेगांव येथील 32 वर्षीय पुरुष या तीन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर डीसीएचसी कोरेगांव येथे चोराडे ता. खटाव येथील  60 वर्षीय पुरुषाचा व जिल्या. तील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये शाहुपुरी येथील 89 वर्षीय, बदेवाडी (भुईंज ) ता. वाई येथील 92 वर्षीय पुरुष, फुलेनगर वाई येथील 70 वर्षीय हिला व पाचवड ता. वाई येथील 72 वर्षीय पुरुष या चार कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  असे एकूण 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 
घेतलेले एकूण नमुने --  39599
एकूण बाधित -- 9369
घरी सोडण्यात आलेले ---  5208
मृत्यू -- 296
उपचारार्थ रुग्ण --  3865
00000

Friday, August 21, 2020

सातारा जिल्ह्यात 290 जण झाले कोरोनामुक्त; आज दिला डिस्चार्ज

 सातारा दि. 21 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या  290 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 892 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.  
  विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  *जावली* तालुक्यातील 4, *कराड*तालुक्यातील 82, *खंडाळा* तालुक्यातील 29, *खटाव* तालुक्यातील 13, *कोरेगाव* तालुक्यातील 35,*महाबळेश्वर* तालुक्यातील 11, *माण* तालुक्यातील 1, *पाटण* तालुक्यातील 13, *फलटण* तालुक्यातील 16, *सातारा* तालुक्यातील 41, वाई तालुक्यातील 45  असे एकूण 290 नागरिकांचा समावेश आहे.
 
*892 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 20, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 80, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 57, कोरेगाव 47, वाई येथील 69, खंडाळा येथील 92, रायगाव 23,  मायणी येथील 49, महाबळेश्वर येथील 24, पानमळेवाडी 88, पाटण येथील 22, दहिवडी 40, खावली येथील 157  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 124 असे एकूण 892  जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुभाष चव्हाण यांनी दिली.
 
0000

मलकापुरात "एक नगरपरिषद एक गणपती' उपक्रम राबवणार ; मनोहर शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती

कराड
गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर येथील मलकापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून एक नगरपरिषद एक गणपती उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पोलीस प्रशासन,महसूल विभाग, मलकापुरातील गणेश मंडळे, यांच्या एकत्रित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा नीलम एडगे, नगरसेवक राजेंद्र यादव,विरोधी पक्ष नेते अजित थोरात, पोलीस अधीक्षक सूरज गुरव,कराड शहर पोलीस प्रमुख बी आर पाटील ,भाजपा शहर अध्यक्ष सूरज शेवाळे.युवा मोर्चाचे तानाजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
 एकूण प्रभागातील 57 गणेश मंडळांनी या उपक्रमास एकमुखाने आपला होकार दिला आहे.सध्या कोरोना संकटाच्या पार्शवभूमीवर घेतलेला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
मलकापुरात सध्या कोरिनाच्या रुग्णसंख्येची आकडेवारी पाहता त्या ठिकाणची साखळी तुटणे महत्वाचे आहे. गणेशोत्सव काळात होणारी गर्दी टाळून कोरोनाला आटोक्यात आणण्याच्या ड्रीष्टिकोणातून पालिकेचा हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. पालिकेतील विरोधीपक्षासह सर्वच घटकांच्या साथीने हा उपक्रम मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने पार पडणार आहे. विसर्जनासाठी देखील पालिकेकडून सहकार्य केले जाणार आहे.अशीही यावेळी माहिती देण्यात आली.राज्यात पहिलाच अशा प्रकारचा उपक्रम गणेशोत्सवाच्या निमित्ताने होत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील झाले कोरोनामुक्त ; आज मिळाला डिस्चार्ज...

कराड
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांना नुकताच  मुबई येथील ब्रिज कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील दोन-तीन दिवस मुंबई येथील निवासस्थानी विश्रांती घेऊन नंतर  ते सेवेत रुजू होणार आहेत.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांना मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.त्यांना उपचारासाठी येथील कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.त्याठिकाणी काही दिवस उपचार घेऊन त्यांना राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्या सूचनेनुसार मुंबई येथील ब्रिज कँडी हॉस्पिटल येथे नेण्यात आले होते,त्या ठिकाणी उपचार घेऊन ते सध्या कोरोनामुक्त झाले आहेत.त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.मुंबई येथील निवासस्थानी 2 ते 3 दिवस विश्रांती घेऊन ते पुन्हा सेवेत रुजू होणार आहेत. 

सातारा जिल्ह्यात 337 जण बाधित ; 11 जण मृत्युमुखी; परिस्थिती गंभीर

सातारा दि.21 (जिमाका):  जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*वाई* तालुक्यातील पिराचीवाडी 1, मालखेड 5, उडतारे 1, देगाव 1,  वहागाव 1, गंगापुरी 1,  सोनगिरीवाडी 1, सिद्धनाथवाडी 2, पोलीस स्टेशन 1, वाई 1, गणपतीआळी 2,  पळशी यशवंत आळी 2, शेलारवाडी 1, धर्मापुरी 1, किकली 1, बावधन 5, गरवारे वॉल 2, भुईंज 1,  वळसे 1, 
*कराड* तालुक्यातील बेलवडे बु 1, बनवडी 3, कराड 17, ओंड 6, महीगाव 5, येळगाव 1, सह्याद्री हॉस्पीटल 1, वहागाव 1, उंडाळे 4,  उंब्रज 1, कालवडे 1, शनिवार पेठ 4, बेलवडे 1,  हजारमाची 5, गोवारे 1, सैदापूर 1,  बुधवार पेठ 1,  चेचेगाव 1,  मलकापूर 11, केवळ 1, कर्वेनाका 1, आगाशिवनगर 6, रेठरे बु 1, खडेपुर 1, काले 1, शुक्रवार पेठ 1, सोमवार पेठ 1, अटके 1, कोयना वसाहत 1, ताकवे 1, कोर्टी 1, गोळेश्वर 2, रविावार पेठ 2, हिंनगोळे 1, मंगळवार पेठ 3, शरद क्लिीनक 3, कापील 1,  जारवे 1, कोल्हापूर नाका 1,  धोंडेवाडी 1, सावडे 1,  रुक्मिणीनगर 1, सरताळे 1,  कार्वे 1,
*सातारा* तालुक्यातील सदरबझार 5,  प्रतिभा हॉस्पीटल 1, करंजे 5, अंबेदरे 2, सातारा 14,  सीटी पोलीस लाईन 2, शनिवार पेठ 8, सासपडे 1, विकासनगर 1, सोमवार पेठ 2, केसकर पेठ 1, कोंडवे 2, गोवे 1, वडूथ 1, मोळाचा ओढा 2, गोडोली 3, पळशी 1, देवी चौक 1,  सासपडे 4, शाहुनगर 3, अतित 1, रांगोळी कॉलनी 1,  मिस्तेवाडी 1, निगडी 4,  दिव्यनगरी 1,  कापेर्डे 1, बारावकरनगर संभाजीनगर 10, रविावार पेठ 1,  लिंब 1,  निगडी 1, 
*फलटण* तालुक्यातील खोळकी 1, आदर्की बु 1,  साखरवाडी 3, तारडफ 1, हात्तीखाना 1, मंगळवार पेठ 1, फलटण 2, खटकेवस्ती  5, तामखाडा 5, मुंजवडी 4, मिरर्ढे 3, गोखळी 1, कसबा पेठ 1, नाईबोमवाडी 1, डीएड चौक 1,  विडणी 1, शुक्रवार पेठ 1,  बुधवार पेठ 1,
*महाबळेश्वर* तालुक्यातील मोहल्ला स्कूल 1, ताळदेव 1, नगरपालिका 13, बेल एअर पाचगणी 1,  शिवाजीनगर पाचणी 1
*कोरेगाव* तालुक्यातील कोलावडी 1,  सोळशी 1,  पिंपोडे बु 1, कोरेगाव 6, चिमणगाव 
*खंडाळा* तालुक्यातील लोणंद 4, खेड 1, नायगाव 1,  शिर्के कॉलनी शिरवळ 1, फुलमळा शिरवळ 4, आरदगाव 1,  गावडेवाडी 1, मोरवे 1, सह्याद्रीनगर शिरवळ 1, बाधे 2, शिरवळ 1, 
*पाटण* तालुक्यातील मल्हारपेठ 1, सावंतवाडी 1, ढेबेवाडी 1, विहे 1, मारुल हवेली 1,  
*माण* तालुक्यातील म्हसवड 11, 
*खटाव* तालुक्यातील मायणी 5, डीस्कळ 1, कलेढोण 1, विटणे 1, बनपुरी 1, नांदोशी 1,  तडवळे 1, 
*जावली* तालुक्यातील कुसुंबी 1, बामणोली 1,  महिगाव 7, खरशी 1 
इतर 4
बाहेरील जिल्या1,तील 
ईस्लामपूर जि. सांगली 1, वाळवा 1, सांगली 1, 
*11 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे अतित ता. सातारा येथील 94 वर्षीय पुरुष, राजुरी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष, भुईंज ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, विडणी ता. फलटण येथील  52 वर्षीय महिला, धामणी ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, तसेच वाई तालुक्यातील खासगी हॉस्पीटल येथे मोरजीवाडा चिखली ता. वाई येथील 55 वर्षीय महिला, पाटण येथील 86 वर्षीय पुरुष, शिंदूजर्णे ता. वाई येथील 75 वर्षीय महिला, कराड खासगी हॉस्पीटमध्ये शनिवार पेठ कराड येथील 77 वर्षीय पुरुष, मारुल हवेली ता. पाटण येथील 76 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये वळसे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष असे एकूण 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 
घेतलेले एकूण नमुने --  38707
एकूण बाधित -- 9008 
घरी सोडण्यात आलेले ---  4918
मृत्यू -- 288
उपचारार्थ रुग्ण --  3802
00000

Thursday, August 20, 2020

स्वच्छ सर्वेक्षण मध्ये कराड शहर देशात दुसऱ्यांदा अववल ; नगरपालिकेत फटाक्याची आतिषबाजी, कर्मचाऱ्यांचा झाला सत्कार...

कराड
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत एक लाख लोकसंख्या गटात कराड शहर याहीवर्षी देशात अववल ठरले . दिल्लीमधून केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत हि घोषणा केली. व्हर्चुअल पद्धतीने झालेल्या या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे मुंबईला गेल्या होत्या. त्यांनी हा पुरस्कार तेथे स्वीकारला.यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपस्थित होते. 

मागीलवर्षी देखील कराडचा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये प्रथम क्रमांक आला होता, याही वर्षी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कराडनेच पटकावले.देशात सलग दोन वेळा अववल येण्याचा मान कराड शहराला मिळाला आहे.कराडच्या नगराध्यक्षा सौ शिंदे यांनी शहरवासीयांचे यानिमित्त अभिनंदन केले आहे. या स्पर्धेतून द्वितीय पारितोषिक सासवड शहराला व त्रितीय पारितोषिक लोणावळा शहराला मिळाले आहे.
दरम्यान शहराला प्रथम क्रमांक मिळाल्याने  शहरातून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. यानिमित्त आज पालिकेत करमचार्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.