Thursday, August 20, 2020

स्वच्छ सर्वेक्षण मध्ये कराड शहर देशात दुसऱ्यांदा अववल ; नगरपालिकेत फटाक्याची आतिषबाजी, कर्मचाऱ्यांचा झाला सत्कार...

कराड
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत एक लाख लोकसंख्या गटात कराड शहर याहीवर्षी देशात अववल ठरले . दिल्लीमधून केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत हि घोषणा केली. व्हर्चुअल पद्धतीने झालेल्या या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे मुंबईला गेल्या होत्या. त्यांनी हा पुरस्कार तेथे स्वीकारला.यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपस्थित होते. 

मागीलवर्षी देखील कराडचा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये प्रथम क्रमांक आला होता, याही वर्षी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कराडनेच पटकावले.देशात सलग दोन वेळा अववल येण्याचा मान कराड शहराला मिळाला आहे.कराडच्या नगराध्यक्षा सौ शिंदे यांनी शहरवासीयांचे यानिमित्त अभिनंदन केले आहे. या स्पर्धेतून द्वितीय पारितोषिक सासवड शहराला व त्रितीय पारितोषिक लोणावळा शहराला मिळाले आहे.
दरम्यान शहराला प्रथम क्रमांक मिळाल्याने  शहरातून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. यानिमित्त आज पालिकेत करमचार्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.

No comments:

Post a Comment