कराड
गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर येथील मलकापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून एक नगरपरिषद एक गणपती उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस प्रशासन,महसूल विभाग, मलकापुरातील गणेश मंडळे, यांच्या एकत्रित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा नीलम एडगे, नगरसेवक राजेंद्र यादव,विरोधी पक्ष नेते अजित थोरात, पोलीस अधीक्षक सूरज गुरव,कराड शहर पोलीस प्रमुख बी आर पाटील ,भाजपा शहर अध्यक्ष सूरज शेवाळे.युवा मोर्चाचे तानाजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
एकूण प्रभागातील 57 गणेश मंडळांनी या उपक्रमास एकमुखाने आपला होकार दिला आहे.सध्या कोरोना संकटाच्या पार्शवभूमीवर घेतलेला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
मलकापुरात सध्या कोरिनाच्या रुग्णसंख्येची आकडेवारी पाहता त्या ठिकाणची साखळी तुटणे महत्वाचे आहे. गणेशोत्सव काळात होणारी गर्दी टाळून कोरोनाला आटोक्यात आणण्याच्या ड्रीष्टिकोणातून पालिकेचा हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. पालिकेतील विरोधीपक्षासह सर्वच घटकांच्या साथीने हा उपक्रम मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने पार पडणार आहे. विसर्जनासाठी देखील पालिकेकडून सहकार्य केले जाणार आहे.अशीही यावेळी माहिती देण्यात आली.राज्यात पहिलाच अशा प्रकारचा उपक्रम गणेशोत्सवाच्या निमित्ताने होत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment