सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांना नुकताच मुबई येथील ब्रिज कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील दोन-तीन दिवस मुंबई येथील निवासस्थानी विश्रांती घेऊन नंतर ते सेवेत रुजू होणार आहेत.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांना मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.त्यांना उपचारासाठी येथील कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.त्याठिकाणी काही दिवस उपचार घेऊन त्यांना राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्या सूचनेनुसार मुंबई येथील ब्रिज कँडी हॉस्पिटल येथे नेण्यात आले होते,त्या ठिकाणी उपचार घेऊन ते सध्या कोरोनामुक्त झाले आहेत.त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.मुंबई येथील निवासस्थानी 2 ते 3 दिवस विश्रांती घेऊन ते पुन्हा सेवेत रुजू होणार आहेत.
No comments:
Post a Comment