Wednesday, February 10, 2021

आज जिल्ह्यात 62 जण बाधित

सातारा दि. 10(जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 62 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा2, पीरवाडी 1,शनिवार पेठ1, विसावा नाका1,एम.आय डीसी1, खेजेवाडी 7,सदरबाजार 1,भुईज1,पिंपरी1,खिंडवाडी1,महागाव1,वडूथ1,मोरे कॉलनी 1,मंगळवार पेठ1,
*वाई तालुक्यातील*, बावधन2, रविवार पेठ1,  
*पाटण तालुक्यातील* घनवटवाडी 1,नावडी1,मारुल हवेली 1,मरळी 2,गव्हाण1,
*फलटण तालुक्यातील*मिरढे 1,मलटण1,जाधवाडी1,
*जावली तालुक्यातील*सोनगाव 1,
*खटाव तालुक्यातील* निढळ 2,राजाकुर्ले 1,निमसोड1,
*कोरेगाव तालुक्यातील*कोरेगाव3, लासुर्णे 1, , 
 *माण तालुक्यातील* म्हसवड 1, दहिवडी 10, गोंदवले बु.2,
  *इतर* 4, कुभरोशी 1,म्हवशी 1,जलगेवाडी 1,
*एकूण नमुने -322928*
*एकूण बाधित -57113*  
*घरी सोडण्यात आलेले -54454*  
*मृत्यू -1831* 
*उपचारार्थ रुग्ण-828* 

0000

Saturday, February 6, 2021

पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण याना पोलीसांकडून अटक...कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करताना पोलिसांची कारवाई...

कराड : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सत्त्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात ताब्यात घेतलं. कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करताना पोलिसांनी कारवाई केली.

“शेतकऱ्यांचे कायदे करणाऱ्यांना शेती कशी करतात हे माहिती आहे का? शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की अदानी अंबानी यांच्या फायद्याचे आहेत?” असा जळजळीत सवाल सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला विचारला. दक्षिण कराड या मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाणांचे प्राबल्य राहिले आहे. सत्त्वशीला चव्हाणही कराड तालुक्यात चांगल्याच सक्रिय आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्त्वशीला चव्हाण मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.
साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज विविध संघटनाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हा महिला संघटना, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडी अशा विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या निषेध नोंदवला.
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाजवळ कोरेगाव-सातारा मार्ग काही काळासाठी रोखून धरला होता. तर काही आंदोलकांनी या महामार्गावरच चूल मांडून भाकऱ्या थापल्या. त्यानंतर काही वेळासाठी याठिकाणी वाहतूक विस्कळित झाली. आंदोलनानंतर पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.


Friday, February 5, 2021

आज जिल्ह्यात 64 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 64  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून  2  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 7, मंगळवार पेठ 3, कोडोली 1, गोडोली 1, मंगळवार पेठ 2, खेड 3, सैदापूर 1, संगमनगर 1, सासपाडे 1, नागठाणे 1,
*कराड तालुक्यातील*  मलकापूर 1, नारासणवाडी 1, वडगांव 1, बडगांव 1, 
*फलटण तालुक्यातील*   लक्ष्मीनगर 1,
*खटाव तालुक्यातील*  खटाव 1, येराळवाडी 1, वडुज 1, निमसोड 4, वडुज 4, बनपुरी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव 7, चिमणगांव 1,  सासुर्वे 1, रहिमतपुर 1, 
*खंडाळा तालुक्यातील*  शिरवळ 1, लोणंद 2,म्हावशी 2,
*वाई तालुक्यातील*   रामडोह आळी 1, वासोले 1, बावधन 2,सिध्दनाथवाडी 1, किकली 1, व्याहाळी 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील*   
*माण तालुक्यातील* दहिवडी 2, वावरहिरे 1,गोंदवले बु. 1, 
*इतर*  --
*बाहेरील जिल्ह्यातील* --  
* 2 कोरोना बाधितांचा मृत्यू*
खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या नांदवळ वडुज ता. खटाव येथील 67 वर्षीय पुरुष, येराळवाडी ता. खटाव येथील 69 वर्षीय महिला या दोन कोरोना बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
 
*एकूण नमुने -316407*
*एकूण बाधित -56731*  
*घरी सोडण्यात आलेले -54135*  
*मृत्यू -1824* 
*उपचारार्थ रुग्ण-772* 


0000

Wednesday, February 3, 2021

रस्त्याच्या दुभाजकामध्ये नवीन प्लँटेशन करण्यास होणार सुरुवात ; आरोग्य सभापती गुंड्याभाऊ वाटेगावकर रात्री अकरा वाजता "ऑन द स्पॉट" ...

कराड
येथील रस्त्याच्या दुभाजकामध्ये नवीन प्लॅनटेशन करण्याच्या प्रक्रियेला येथील पालिकेच्या वतीने सुरुवात झाली आहे.त्यामधील यापूर्वीचे केलेले रोपण सध्या दुरावस्थेत असल्याने या ठिकाणी नवीन रोपण करणार असल्याचे आरोग्य सभापती गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी सांगितले.ते दोन दिवसांपूर्वी स्वतः रात्री उशिरा पर्यंत या दुभाजकांमध्ये रोपण करण्याच्या तयारीसाठी कर्मचाऱ्यांना सूचना करत होते. गुंड्याभाऊ  येथील कृष्णा नाका येथे थांबून त्या दुभाजकांची स्वच्छता करून घेत होते.त्यांनी दुभाजकांवर असणारा जुना रंग  घासून काढण्यासाठी लिक्विड व इतर मटेरिअलची उपलब्धता करून दिली. कृष्णा नाका ते कोल्हापूर नाका याठिकाच्या एकूण तीन किलोमीटर अंतराचे हे प्लॅनतेशन होणार असल्याचे ते म्हणाले.त्यामधून बेड तयार करून त्यामधून पाम तसेच इतर विविध जातीची रोपे लावण्यात येणार आहेत असेही वाटेगावकर मेहेरबान म्हणाले..शहर स्वच्छ व सुशोभित असलेच पाहिजे हा त्यांचा हट्ट त्यांच्या बोलण्यातून दिसून आला.
 स्वच्छतेसह अनेक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेणारे मेहेरबान वाटेगावकर यांनी शहरातून होणाऱ्या प्रत्येक सामाजिक उपक्रमामधून आपला सहभाग नोंदवत आपले समाज्याप्रति असणारे कर्तव्य वेळोवेळी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. नियमित नगरपालिकेत उपस्थित राहून कोणत्याही प्रभागातील लोकांना कधीही,काहीही अडचण आल्यास पुढे होऊन ती सोडवताना त्यांना अनेकांनी पाहिलंय. विशेष म्हणजे शहरातील असणाऱ्या प्रत्येक राजकीय पार्टीमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. ते  या राजकीय पार्ट्यांमधील सदस्यामध्ये असे काहीवेळा मिक्स झालेले दिसतात,जणू त्याच पार्टीचे सदस्य वाटू लागतात,असे त्यांचे वैशिष्ठय आहे. अजातशत्रू म्हणून त्यांची शहरात ओळख आहे.नियमित नगरपालिकेत येऊन लोकांची कामे करणारे लोकसेवक म्हणून त्यांना ओळखतात.सिम्पल व्यक्तिमत्व असणारे वाटेगावकर मेहेरबान दोन दिवसांपूर्वी  दुभाजकांची स्वच्छता करण्याकरिता रात्री 11 वाजता कृष्णा नाका या ठिकाणी कर्मचार्यांबरोबर हजर होते.त्या ठिकाणच्या होणाऱ्या प्लॅनटेशनची त्यांनी त्यावेळी माहिती दिली त्यांच्या शहरातील स्वच्छतेबाबतीतील सहभागाबद्दल त्यांचे नेहमीच कौतुक होत असते.

भरकटलेले राजकारण यापुढे शहराला नकोय ...निवडणूक पक्ष चिन्हावर होण्याची शक्यता... दोन्हीं काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन लढणार ? मग आघाड्यांच्या राजकारणाचे काय? शहरात चर्चा...

वेध माझा ऑनलाइन
अजिंक्य गोवेकर / कराड

आता तोंडावर येऊन ठेपलेली येथील पालिकेची निवडणूक पक्ष चिन्हावर व्हावी अशी कराडकरांची इच्छा आहे शहराच्या  राजकारणाची एकूणच झालेली बोंबाबोंब पाहता  यावर्षीची होणारी निवडणूक पक्षीय विचारधारेशी बांधील असणे अपेक्षित आहे.म्हणूनच ही निवडणुक पक्षचिन्हावर होण्याबाबत मागणी होत आहे. या निवडणुकीतून भाजपाने पक्षचिन्ह घेऊन लढणार असे जाहीर केले आहे तर काँग्रेस देखील पक्षचिन्ह घेऊन लढेल अशी चर्चा आहे शहरातील राष्ट्रवादी पार्टी म्हणून ओळख असणाऱ्या लोकशाही आघाडीने आपण आघाडी म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते शशिकांत शिंदे यांनी आपण साताऱ्यात राष्ट्रवादी म्हणून लढणार  असे काही दिवसांपूर्वीच विधान केले आहे... कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन महाविकास आघाडी म्हणून देखील रिंगणात उतरतील असाही जाणकारांचा अंदाज आहे... मात्र ते पक्षचिन्हावर एकत्र येतात का महाआघाडी म्हणून स्वतंत्र चिन्ह घेऊन उतरतात हेही पहावे लागेल...एकूणच शहरात अशा पद्धतीने निवडणूक झाल्यास शहरातील राजकारणाचा "ट्रेंड' बदलेल संधीसाधू राजकारण त्यामुळे नक्कीच थांबेल आणि ते थांबवण्यासाठीच्या आवश्यक घडामोडी पडद्यामागे सुरूही झाल्या आहेत  म्हणूनच...इथले आमदार खासदार मंत्री अजूनही गप्प आहेत ? अशीही चर्चा आहे...

येथील पालिका निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे.राज्याच्या राजकारणाचा परिणाम नेहमीच स्थानीक राजकारणावर दिसून येतो. त्यानुसार त्या त्या ठिकाणी घडामोडी घडतात..त्याचेच प्रत्यंतर झालेल्या पदवीधर निवडणूकित दिसून आले. अपवाद वगळता ग्रामपंचायत निवडणूका याच धर्तीवर पार पडल्या व  निकालदेखील त्याच प्रमाणात दिसून आले.काही महिन्याने कराड नगरपरिषदेची निवडणुक होईल.येथील परिस्थीती पहिली तर, स्वच्छ सर्वेक्षणच्या नावाखाली येथे इतर कामाना तितकेसे महत्व दिले गेले नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबीतच आहेत.त्यामुळे येथील काही लोकप्रतिनिधींनी आपल्या वॉर्डामधील इतर कामे होण्यासाठीचे प्रयत्न ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू ठेवली आहेत असे दिसते. त्यापैकी काहींच्या बाबतीत "वेळ निघून गेल्याचे" प्रत्यंतर येण्याची शक्यता आहे, तर काहीजण सातत्याने लोकांची कामे करत जनतेच्या मनातील आपली जागा "अभाधित" ठेवण्यात यशस्वी होतील अशीही शक्यता आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे.भाजपाचे संख्याबळ अधिक असूनदेखील ते विरोधात आहेत. असे असताना महाविकास आघाडीची संकल्पना पदवीधर व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत लोकांना फारशी रुचनार नाही अशी अनेकांची धारणा होती मात्र ती सपशेल फोल ठरली. झालेल्या पदवीधर निवडणुकीत याच महाविकास आघाडीला सुशिक्षित मततदारांनी अक्षरशः डोक्यावर घेत भाजपला बाजूला केले व आपला कौल दिला. ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र भावकीचे गणित दिसून आले, तेथील राजकारणात पारंपरिक विरोध व जुळवाजुळवीचे राजकारण असे स्वरूप पहायला मिळाले मात्र शहरातून महाविकास आघाडी पसंतीस उतरल्याने दिसुन आले, म्हणजेच ग्रामीण व शहरी भागात राजकारणाचे गणित वेगवेगळे घडत असल्याचे जाणवले.त्यामुळे शहरी राजकारणात पक्षीय राजकारणाचा फॉर्म्युला महाविकास आघाडी म्हणून यशस्वी झाला हे सिद्ध झाले.  
कराड शहरातील लोकांनादेखील पालिका निवडणूक पक्षचिन्हावरच हवी आहे.दरम्यान यापूर्वीच्या झालेल्या येथील काही निवडणुकीच्या माध्यमातून आपला केवळ वापरच झाला... अशी इथल्या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची भावना झाल्याचे समजते, म्हणूनच एकमेकांच्या विरोधात उभे राहून दोघांचेही नुकसान करून घेण्याच्या मानसिकतेत काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आता दिसत नाहीत, त्यामुळे कदाचित दोन्ही काँग्रेस महाविकास आघाडीचा फॉर्म्युला घेऊन निवडणुकीत उतरतील असाही अंदाज आहे आता ताकही फुंकून पीत कराड पालिका निवडणुकीसाठी पुढची वाटचाल करताना दोन्ही काँग्रेसची भूमिका दिसेल हेही तितकेच खरे आहे.तर दुसरीकडे आमचाही शहराच्या राजकारणात सोयीपुरता वापर झाला अशी चर्चा भाजपाचे नेतेही शहरात करताना दिसत आहेत.
शहराच्या राजकारणात लोकशाही आघाडी,जनशक्ती आघाडी,आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणारे नगरसेवक, व भाजपाचे नगरसेवक असे चार गट कार्यरत आहेत. दरम्यान जनशक्ती आघाडीमध्ये उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांना मानणारे नगरसेवक,जाधव समर्थक नगरसेवक, आणि यादव समर्थक नगरसेवक असे मिळून सत्तारूढ म्हणून कार्यरत आहेत. नगराध्यक्षपद भाजपकडे आहे. भाजपाने मागील निवडणूक पक्षचिन्हावरच लढली आहे.नगराध्यक्षपदासाठी त्यांना पक्षचिन्हाचा फायदाच झाला आहे.याहीवेळी पुन्हा पूर्ण ताकदीने भाजपा पक्षचिन्हावरच लढणार आहे.काँग्रेसची देखील पक्ष चिन्हावरच लढण्याची मानसिकता आहे असे समजते तर,राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच लढेल असे संकेत जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी साताऱ्यात दिले आहेत मात्र येथील राष्ट्रवादीचा मानला जाणारा पालिकेतील गट लोकशाही आघाडी म्हणून लढेल असे आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे पण पक्ष म्हणून लढण्याची वेळ आल्यास त्यांची भूमिका काय असणार हेही पहावे लागणार आहे कदाचित ऐनवेळी दोन्ही काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकत्र येवून लढतील असाही कयास आहे...
दरम्यान या निवडणुकीत राजकीय पक्ष म्हणून लढणाऱ्या ताकदी  जनतेचा विश्वास गमावून बसलेल्या  शहरातील काही "पुढार्यांना' या निवडणुकीत "एकट" पाडतील...अशी महत्वपूर्ण माहिती मिळत आहे... संधीसाधू राजकारणाला दूर ठेवणे हा यामागचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे...  आणि हे घडवून आणण्यासाठी पडद्यामागच्या हालचाली सुरूही झाल्या आहेत... म्हणूनच इथले आमदार खासदार मंत्री अजूनही गप्प आहेत ? अशीही चर्चा आहे...

Tuesday, February 2, 2021

विक्रम पावस्करांच्या कार्याचा इतर लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा ; आ सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केली अपेक्षा...

कराड
विक्रम पावस्करांकडून इतर लोकप्रतिनिधींनी प्रेरणा घेऊन शहराच्या सुरक्षेचा विचार करून सम्पूर्ण शहर cctv च्या नियंत्रणाखाली आणावे अशी अपेक्षा आ सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केली.येथील सोमवार पेठ येथे भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी cctv यंत्रणा स्वखर्चातून बसवली आहे त्याचे लोकार्पण गाडगीळ यांनी केले त्यावेळी ते बोलत होते

नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे,नगरसेवक आण्णा पावसकर, सुहास जगताप, नगरसेविका सौ विद्या पावसकर यांच्यासाहित अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी विक्रम पावसकर म्हणाले,सम्पूर्ण सोमवार पेठेत काही दिवसांपासून चोर्यांचे प्रमाण वाढले आहे.येथील लोकांची सुरक्षा महत्वाची आहे.चांगल्या दर्जाचे एकूण 80 कॅमेरे बसविण्यात आले आहेत.येथील लोकांचे सहकार्य मला नेहमीच असते.या कॅमेर्याचे रेकॉर्डिंग भाजपा कार्यालयात व पोलीस स्टेशनमध्ये होणार आहे. 
विक्रम पावसकरांचे कार्य हे नेहमीच जाहिरातबाजी न करता 24 x 7 सुरूच असते ते स्वतः ग्राउंडवरचे कार्यकर्ते आहेत.लोकांशी त्यांची थेट नाळ आहे.  सोमवार पेठेतील लोकांच्या सुरक्षिततेच्या ड्रीष्टीने केलेले हे काम कौतुकास्पद व जनतेसाठी महत्वाचे आहे,त्यांच्या एकूणच कार्याचा आदर्श इथल्या निवडणुकीपूरती कामे करणाऱ्या राजकारण्यांनी घेतला पाहिजे.अशी अपेक्षा शहरवासीयांना आहे.

41 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

सातारा दि.2 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 41 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 2, करंजे 1,  शाहुपुरी 1, तामाजाईनगर 2, तासगाव 1, शिरगाव 1, शिवथर 1, सासुर्वे 1, खोजेवाडी 1, कोडोली 1, शेरेचीवाडी 1, 
*कराड तालुक्यातील* कराड 1, मंगळवा पेठ 1,
*फलटण तालुक्यातील* जिंती 1, वाठार निंबळक 1, 
*खटाव तालुक्यातील* वडूज 1, औंध 1, मांडवे 1, नांदोशी 1, 
*कोरेगाव तालुक्यातील* सासुर्वे 3, चिमणगाव 1, वाठार स्टेशन 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 2, पाचगणी 2,  कहीनगर 5, 
*जावली तालुक्यातील* कुडाळ 1, 
*माण तालुक्यातील* पळशी 2, 
इतर सुर्ली 1, 
*एकूण नमुने -314017*
*एकूण बाधित -56543*  
*घरी सोडण्यात आलेले -53924*  
*मृत्यू -1819* 
*उपचारार्थ रुग्ण-800* 
0000