विक्रम पावस्करांकडून इतर लोकप्रतिनिधींनी प्रेरणा घेऊन शहराच्या सुरक्षेचा विचार करून सम्पूर्ण शहर cctv च्या नियंत्रणाखाली आणावे अशी अपेक्षा आ सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केली.येथील सोमवार पेठ येथे भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी cctv यंत्रणा स्वखर्चातून बसवली आहे त्याचे लोकार्पण गाडगीळ यांनी केले त्यावेळी ते बोलत होते
नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे,नगरसेवक आण्णा पावसकर, सुहास जगताप, नगरसेविका सौ विद्या पावसकर यांच्यासाहित अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी विक्रम पावसकर म्हणाले,सम्पूर्ण सोमवार पेठेत काही दिवसांपासून चोर्यांचे प्रमाण वाढले आहे.येथील लोकांची सुरक्षा महत्वाची आहे.चांगल्या दर्जाचे एकूण 80 कॅमेरे बसविण्यात आले आहेत.येथील लोकांचे सहकार्य मला नेहमीच असते.या कॅमेर्याचे रेकॉर्डिंग भाजपा कार्यालयात व पोलीस स्टेशनमध्ये होणार आहे.
विक्रम पावसकरांचे कार्य हे नेहमीच जाहिरातबाजी न करता 24 x 7 सुरूच असते ते स्वतः ग्राउंडवरचे कार्यकर्ते आहेत.लोकांशी त्यांची थेट नाळ आहे. सोमवार पेठेतील लोकांच्या सुरक्षिततेच्या ड्रीष्टीने केलेले हे काम कौतुकास्पद व जनतेसाठी महत्वाचे आहे,त्यांच्या एकूणच कार्याचा आदर्श इथल्या निवडणुकीपूरती कामे करणाऱ्या राजकारण्यांनी घेतला पाहिजे.अशी अपेक्षा शहरवासीयांना आहे.
No comments:
Post a Comment