Wednesday, February 3, 2021

भरकटलेले राजकारण यापुढे शहराला नकोय ...निवडणूक पक्ष चिन्हावर होण्याची शक्यता... दोन्हीं काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन लढणार ? मग आघाड्यांच्या राजकारणाचे काय? शहरात चर्चा...

वेध माझा ऑनलाइन
अजिंक्य गोवेकर / कराड

आता तोंडावर येऊन ठेपलेली येथील पालिकेची निवडणूक पक्ष चिन्हावर व्हावी अशी कराडकरांची इच्छा आहे शहराच्या  राजकारणाची एकूणच झालेली बोंबाबोंब पाहता  यावर्षीची होणारी निवडणूक पक्षीय विचारधारेशी बांधील असणे अपेक्षित आहे.म्हणूनच ही निवडणुक पक्षचिन्हावर होण्याबाबत मागणी होत आहे. या निवडणुकीतून भाजपाने पक्षचिन्ह घेऊन लढणार असे जाहीर केले आहे तर काँग्रेस देखील पक्षचिन्ह घेऊन लढेल अशी चर्चा आहे शहरातील राष्ट्रवादी पार्टी म्हणून ओळख असणाऱ्या लोकशाही आघाडीने आपण आघाडी म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते शशिकांत शिंदे यांनी आपण साताऱ्यात राष्ट्रवादी म्हणून लढणार  असे काही दिवसांपूर्वीच विधान केले आहे... कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन महाविकास आघाडी म्हणून देखील रिंगणात उतरतील असाही जाणकारांचा अंदाज आहे... मात्र ते पक्षचिन्हावर एकत्र येतात का महाआघाडी म्हणून स्वतंत्र चिन्ह घेऊन उतरतात हेही पहावे लागेल...एकूणच शहरात अशा पद्धतीने निवडणूक झाल्यास शहरातील राजकारणाचा "ट्रेंड' बदलेल संधीसाधू राजकारण त्यामुळे नक्कीच थांबेल आणि ते थांबवण्यासाठीच्या आवश्यक घडामोडी पडद्यामागे सुरूही झाल्या आहेत  म्हणूनच...इथले आमदार खासदार मंत्री अजूनही गप्प आहेत ? अशीही चर्चा आहे...

येथील पालिका निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे.राज्याच्या राजकारणाचा परिणाम नेहमीच स्थानीक राजकारणावर दिसून येतो. त्यानुसार त्या त्या ठिकाणी घडामोडी घडतात..त्याचेच प्रत्यंतर झालेल्या पदवीधर निवडणूकित दिसून आले. अपवाद वगळता ग्रामपंचायत निवडणूका याच धर्तीवर पार पडल्या व  निकालदेखील त्याच प्रमाणात दिसून आले.काही महिन्याने कराड नगरपरिषदेची निवडणुक होईल.येथील परिस्थीती पहिली तर, स्वच्छ सर्वेक्षणच्या नावाखाली येथे इतर कामाना तितकेसे महत्व दिले गेले नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबीतच आहेत.त्यामुळे येथील काही लोकप्रतिनिधींनी आपल्या वॉर्डामधील इतर कामे होण्यासाठीचे प्रयत्न ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू ठेवली आहेत असे दिसते. त्यापैकी काहींच्या बाबतीत "वेळ निघून गेल्याचे" प्रत्यंतर येण्याची शक्यता आहे, तर काहीजण सातत्याने लोकांची कामे करत जनतेच्या मनातील आपली जागा "अभाधित" ठेवण्यात यशस्वी होतील अशीही शक्यता आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे.भाजपाचे संख्याबळ अधिक असूनदेखील ते विरोधात आहेत. असे असताना महाविकास आघाडीची संकल्पना पदवीधर व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत लोकांना फारशी रुचनार नाही अशी अनेकांची धारणा होती मात्र ती सपशेल फोल ठरली. झालेल्या पदवीधर निवडणुकीत याच महाविकास आघाडीला सुशिक्षित मततदारांनी अक्षरशः डोक्यावर घेत भाजपला बाजूला केले व आपला कौल दिला. ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र भावकीचे गणित दिसून आले, तेथील राजकारणात पारंपरिक विरोध व जुळवाजुळवीचे राजकारण असे स्वरूप पहायला मिळाले मात्र शहरातून महाविकास आघाडी पसंतीस उतरल्याने दिसुन आले, म्हणजेच ग्रामीण व शहरी भागात राजकारणाचे गणित वेगवेगळे घडत असल्याचे जाणवले.त्यामुळे शहरी राजकारणात पक्षीय राजकारणाचा फॉर्म्युला महाविकास आघाडी म्हणून यशस्वी झाला हे सिद्ध झाले.  
कराड शहरातील लोकांनादेखील पालिका निवडणूक पक्षचिन्हावरच हवी आहे.दरम्यान यापूर्वीच्या झालेल्या येथील काही निवडणुकीच्या माध्यमातून आपला केवळ वापरच झाला... अशी इथल्या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची भावना झाल्याचे समजते, म्हणूनच एकमेकांच्या विरोधात उभे राहून दोघांचेही नुकसान करून घेण्याच्या मानसिकतेत काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आता दिसत नाहीत, त्यामुळे कदाचित दोन्ही काँग्रेस महाविकास आघाडीचा फॉर्म्युला घेऊन निवडणुकीत उतरतील असाही अंदाज आहे आता ताकही फुंकून पीत कराड पालिका निवडणुकीसाठी पुढची वाटचाल करताना दोन्ही काँग्रेसची भूमिका दिसेल हेही तितकेच खरे आहे.तर दुसरीकडे आमचाही शहराच्या राजकारणात सोयीपुरता वापर झाला अशी चर्चा भाजपाचे नेतेही शहरात करताना दिसत आहेत.
शहराच्या राजकारणात लोकशाही आघाडी,जनशक्ती आघाडी,आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणारे नगरसेवक, व भाजपाचे नगरसेवक असे चार गट कार्यरत आहेत. दरम्यान जनशक्ती आघाडीमध्ये उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांना मानणारे नगरसेवक,जाधव समर्थक नगरसेवक, आणि यादव समर्थक नगरसेवक असे मिळून सत्तारूढ म्हणून कार्यरत आहेत. नगराध्यक्षपद भाजपकडे आहे. भाजपाने मागील निवडणूक पक्षचिन्हावरच लढली आहे.नगराध्यक्षपदासाठी त्यांना पक्षचिन्हाचा फायदाच झाला आहे.याहीवेळी पुन्हा पूर्ण ताकदीने भाजपा पक्षचिन्हावरच लढणार आहे.काँग्रेसची देखील पक्ष चिन्हावरच लढण्याची मानसिकता आहे असे समजते तर,राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच लढेल असे संकेत जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी साताऱ्यात दिले आहेत मात्र येथील राष्ट्रवादीचा मानला जाणारा पालिकेतील गट लोकशाही आघाडी म्हणून लढेल असे आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे पण पक्ष म्हणून लढण्याची वेळ आल्यास त्यांची भूमिका काय असणार हेही पहावे लागणार आहे कदाचित ऐनवेळी दोन्ही काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकत्र येवून लढतील असाही कयास आहे...
दरम्यान या निवडणुकीत राजकीय पक्ष म्हणून लढणाऱ्या ताकदी  जनतेचा विश्वास गमावून बसलेल्या  शहरातील काही "पुढार्यांना' या निवडणुकीत "एकट" पाडतील...अशी महत्वपूर्ण माहिती मिळत आहे... संधीसाधू राजकारणाला दूर ठेवणे हा यामागचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे...  आणि हे घडवून आणण्यासाठी पडद्यामागच्या हालचाली सुरूही झाल्या आहेत... म्हणूनच इथले आमदार खासदार मंत्री अजूनही गप्प आहेत ? अशीही चर्चा आहे...

No comments:

Post a Comment