Wednesday, February 3, 2021

रस्त्याच्या दुभाजकामध्ये नवीन प्लँटेशन करण्यास होणार सुरुवात ; आरोग्य सभापती गुंड्याभाऊ वाटेगावकर रात्री अकरा वाजता "ऑन द स्पॉट" ...

कराड
येथील रस्त्याच्या दुभाजकामध्ये नवीन प्लॅनटेशन करण्याच्या प्रक्रियेला येथील पालिकेच्या वतीने सुरुवात झाली आहे.त्यामधील यापूर्वीचे केलेले रोपण सध्या दुरावस्थेत असल्याने या ठिकाणी नवीन रोपण करणार असल्याचे आरोग्य सभापती गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी सांगितले.ते दोन दिवसांपूर्वी स्वतः रात्री उशिरा पर्यंत या दुभाजकांमध्ये रोपण करण्याच्या तयारीसाठी कर्मचाऱ्यांना सूचना करत होते. गुंड्याभाऊ  येथील कृष्णा नाका येथे थांबून त्या दुभाजकांची स्वच्छता करून घेत होते.त्यांनी दुभाजकांवर असणारा जुना रंग  घासून काढण्यासाठी लिक्विड व इतर मटेरिअलची उपलब्धता करून दिली. कृष्णा नाका ते कोल्हापूर नाका याठिकाच्या एकूण तीन किलोमीटर अंतराचे हे प्लॅनतेशन होणार असल्याचे ते म्हणाले.त्यामधून बेड तयार करून त्यामधून पाम तसेच इतर विविध जातीची रोपे लावण्यात येणार आहेत असेही वाटेगावकर मेहेरबान म्हणाले..शहर स्वच्छ व सुशोभित असलेच पाहिजे हा त्यांचा हट्ट त्यांच्या बोलण्यातून दिसून आला.
 स्वच्छतेसह अनेक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेणारे मेहेरबान वाटेगावकर यांनी शहरातून होणाऱ्या प्रत्येक सामाजिक उपक्रमामधून आपला सहभाग नोंदवत आपले समाज्याप्रति असणारे कर्तव्य वेळोवेळी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. नियमित नगरपालिकेत उपस्थित राहून कोणत्याही प्रभागातील लोकांना कधीही,काहीही अडचण आल्यास पुढे होऊन ती सोडवताना त्यांना अनेकांनी पाहिलंय. विशेष म्हणजे शहरातील असणाऱ्या प्रत्येक राजकीय पार्टीमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. ते  या राजकीय पार्ट्यांमधील सदस्यामध्ये असे काहीवेळा मिक्स झालेले दिसतात,जणू त्याच पार्टीचे सदस्य वाटू लागतात,असे त्यांचे वैशिष्ठय आहे. अजातशत्रू म्हणून त्यांची शहरात ओळख आहे.नियमित नगरपालिकेत येऊन लोकांची कामे करणारे लोकसेवक म्हणून त्यांना ओळखतात.सिम्पल व्यक्तिमत्व असणारे वाटेगावकर मेहेरबान दोन दिवसांपूर्वी  दुभाजकांची स्वच्छता करण्याकरिता रात्री 11 वाजता कृष्णा नाका या ठिकाणी कर्मचार्यांबरोबर हजर होते.त्या ठिकाणच्या होणाऱ्या प्लॅनटेशनची त्यांनी त्यावेळी माहिती दिली त्यांच्या शहरातील स्वच्छतेबाबतीतील सहभागाबद्दल त्यांचे नेहमीच कौतुक होत असते.

No comments:

Post a Comment