Thursday, June 23, 2022

बाहेर गेलेल्या आमदारांना परत यावंच लागेल ; आताच्या परिस्थितीवर मात करुन हे सरकार कायम राहिल ; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील तयार झालेल्या राजकीय परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आता शरद पवारांनी एन्ट्री केली आहे आज या सर्व घडामोडीबाबत मत व्यक्त करताना पवारांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत 

राज्यातील तयार झालेल्या राजकीय परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आता शरद पवारांनी एन्ट्री केली आहे आज या सर्व घडामोडीबाबत मत व्यक्त करताना पवारांनी काही सवाल केले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी सेनेबरोबर असल्याने बाहेर गेलेल्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे मग या अगोदर का नाही बोलले हे आमदार ? अगोदर का नाही याना हिंदुत्व आठवलं ?अचानक का? असे सवाल करत या सर्वांना इकडे यावच लागेल असे पवार म्हणाले आहेत यापूर्वी मी अनेकदा अशी परिस्थिती पहिली आहे असेही सांगायला ते विसरले नाहीत
आज शरद पवार म्हणाले की, "बाहेर गेलेले आमदार राज्यात परतल्यानंतर शिवसेनेसोबत असतील असा विश्वास वाटतोय. विधानसभेत ज्या वेळी बहुमत चाचणी होईल त्यावेळी समजेल हे सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती मी महाराष्ट्रात याआधी अनेकदा पाहिली आहे. आताच्या परिस्थितीवर मात करुन हे सरकार कायम राहिल असा विश्वास आहे. जे लोक बाहेर गेले, त्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्याने ते नाराज आहेत. मग ही नाराजी या आधी का काढली नाही? हिंदुत्वाचा मुद्दा या आधी का काढला नाही? संजय राऊत यांनी त्यांना इकडे येऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. त्यामुळे त्यांना इकडे यावंच लागेल."

राज्यातील महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, "या अडीच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये महाविकास आघाडीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोना काळात उत्तम काम केलं. हे असं असताना राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग फसला हे म्हणणं राजकीय अज्ञान आहे."

भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदासह 12 मंत्रिपदांची ऑफर

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेला मोठं खिंडार पाडलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकार यामुळे अस्थिर बनलं आहे. मात्र एवढं सगळं केल्यानंतर पुढे काय असा प्रश्न सर्वांना पडत आहे. या परिस्थितीत सत्ता स्थापनेसाठी भाजप महत्त्वाची भूमिका बजावेल. मात्र राज्यात वेगाने राजकीय हालचाली होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  नेमके कुठेत असा प्रश्न पडतो. काही वेगळी समीकरणं राज्यातील राजकारणात दिसतील अशी दाट शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्याने अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडे सरकार टीकवण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाही. त्यात आता एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वाचं आहे. झी 24 तासच्या वृत्तानुसार, भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय 12 मंत्रिपदांची ऑफरही त्यांच्या गटाला आहे. त्यामुळे सध्या सहा मंत्रिपदं असलेल्या शिंदे गटाल एकूण मंत्रिमंडळाच्या 25 टक्के हिस्सा देण्याची ऑफर भाजपकडून असल्याचं बोललं जात आहे.

Wednesday, June 22, 2022

आमदारांबरोबर शिवसेनेचे खासदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडू लागले...खासदारांचा शिंदेंना पाठिंबा;

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे  यांच्यासोबत सध्या 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. हे सर्व आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार असल्याचं समोर येत आहे. शिवसेनेचे अनेक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे. अशात आता आमदारांपाठोपाठ खासदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडत असल्याने शिवसेनेच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार असून त्यातील अनेक खासदार आपला नवा गट स्थापन करणार आहेत. ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे आणि कल्याण लोकसभा खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सध्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात आहेत. वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे.

उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव शिंदेंनी फेटाळला, 4 मुद्द्यात आपली भूमिका केली स्पष्ट; शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वेगवेगळे वळण लागत आहे. आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. भाजपच्या प्रस्तावावर आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वेळ आल्यास बहुमत सिद्ध करु, असा दावा केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. दरम्यान,उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव शिंदेंनी फेटाळला असून 4 मुद्द्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. शिवसेना आमदार आणि भाजपची याबाबत चर्चा सुरु आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मते , महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांची ग्रामीण भागातील ताकद झपाट्याने वाढत आहे. शिवसेनाचा विस्तार होत नाही.  
शिवसेनेच्या नेत्यांची कामे होत नाहीत. अन् झाली तर त्याचं श्रेय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस घेतात, असा दावाही बंडखोर शिवसेना आमदारांनी केलाय. आज सकाळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. मात्र, त्यामधून काहीही निष्कर्ष निघाला नाही.  शिवसेनाबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी उद्धव ठाकरे यांना अनेकदा सांगितले. पण त्यांच्याकडून कोणताही कठोर निर्णय घेण्यात आला नाही. उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा निर्णय येथे असणारे सर्व आमदार घेतील, फक्त एकनाथ शिंदे हा निर्णय घेऊ शकत नाहीत, अशी भूमिका तेथील आमदारांची असल्याचं सूत्रांनी सांगितले. 

उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव शिंदेंनी फेटाळला, 4 मुद्द्यात भूमिका केली स्पष्ट
उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर बंडखोर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना आपल्या शैलीत सुनावले होते. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच आघाडीतून बाहेर पडणे का गरेजचं आहे? हे ट्विटमधून एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेय. एकप्रकारे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांचा प्रस्थाव धुडकावत परत येणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेय. 

ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलेय?
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. 
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला.उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील इमोशनल मुद्दे...वाचा सविस्तर...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिंदे हे शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांना सोबत घेऊन राज्याच्या बाहेर आहेत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदार असल्यानं ठाकरे सरकार अल्पमतामध्ये आल्याचं मानलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी या लाईव्हमधून अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.  या लाईव्हमध्ये त्यांनी भावनिक आावाहनावर भर दिला.


वाचा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील इमोशनल मुद्दे...
हिंदुत्व हा शिवसेना श्वास. शिवसेना आणि हिंदुत्व हे एकमेकांमध्ये गुंफलेलं आहे. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री. असं काय केलं की हिंदुत्वापासून दूर गेलो असं वाटलं? आधीही शिवसेना हिंदुत्त्ववादी आताही हिंदुत्ववादीच आहे.

सत्तेच्या अडीच वर्षात जे मिळालं ते बाळासाहेबांनीच दिलं. मला सत्तेचा मोह नाही.

आपल्या माणसांना शोधावं लागणं ही कसली लोकशाही?

शरद पवारांनी सांगितलं म्हणून मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी विश्वास टाकला. प्रशासननंही मला सांभाळले

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा माझ्यावर अजूनही विश्वास आहे. आजच कमलनाथ यांच्यासोबत माझं बोलणं झालं.

माझ्याच लोकांना मी मुख्यमंंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? गुजरातला जाऊन बोलायची काय गरज आहे. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे, मी पद  सोडायला तयार आहे. मी आजच वर्षा बंगल्यातून मातोश्रीवर जाण्यास तयार आहे.

आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करत आहे. गायब आमदारांनी समोर येऊन माझ्या राजीनाम्याचं पत्र राज्यपालांना द्यावं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर राजीनामा देण्यास तयार आहे. कोरोना नसता तर मीच राजीनामा घेऊन गेलो असतो.

शिवसैनिकांनी सांगावं मी शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी योग्य नाही, मी शिवसेना प्रमुखपद सोडण्यास तयार आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असल्यास आनंदच आहे.

मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे अनपेक्षितपणानं आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. संख्याबळ हा माझ्यासाठी गौण आहे.

उद्धव ठाकरेंना अजूनही नेता मानता का?असा पत्रकारांनी प्रश्न विचारताच शिंदेंनी फोन कट केला!!

वेध माझा ऑनलाइन - पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर पुढे जाणार असल्याची भूमिका ना शिंदेंनी मांडली. याच वेळी त्यांना माध्यमांकडून एक प्रश्न विचारण्यात आला. "बाळासाहेब हे तुमचे नेते आहेतच, पण उद्धव ठाकरे यांना तुम्ही अजूनही तुमचे नेते मानता का?", यावेळी ते काय उत्तर देतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते, पण त्याच वेळी संपर्क तुटला. त्यानंतर फोन कट झाला की केला, याबाबत चर्चा सुरू झाली.
दरम्यान उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा का नाही, हा निर्णय त्यांचा आहे असे ते म्हणाले आहेत

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला. दरम्यान, आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेसोबतच राहणार का किंवा ते वेगळा गट स्थापन करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“संध्याकाळी आमदारांची एक बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल. तो तुम्हाला संध्याकाळी कळेल,” असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी पुढील भूमिकेवर बोलताना दिलं. याशिवाय आपलं संख्याबळ आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि विश्वास ठेवणारे आहोत. तिच भूमिका महाराष्ट्राच्या जनतेचीही आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा का नाही, हा निर्णय त्यांचा असल्याचंही ते म्हणाले. याच वेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. "बाळासाहेब हे तुमचे नेते आहेतच, पण उद्धव ठाकरे यांना तुम्ही अजूनही तुमचे नेते मानता का?", यावेळी ते काय उत्तर देतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते, पण त्याच वेळी संपर्क तुटला. त्यानंतर फोन कट झाला की केला हे कळू शकले नाही


नामदार शंभूराज देसाई याना नोटीस ; ... ना. देसाई यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार ?

वेध माझा ऑनलाइन - राज्याचे गृहराज्यमंत्री ना शंभूराज देसाई याना शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयातून नोटीस बजावण्यात आली आहे 
या नोटीस नुसार आज बुधवारी वर्षा बंगल्यावर होणाऱ्या बैठकीस ना देसाई याना उपस्थित रहायचे आहे तसे न झाल्यास ना देसाई यांच्यावर आपात्रतेची कारवाई होणार असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे