Thursday, June 23, 2022

बाहेर गेलेल्या आमदारांना परत यावंच लागेल ; आताच्या परिस्थितीवर मात करुन हे सरकार कायम राहिल ; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील तयार झालेल्या राजकीय परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आता शरद पवारांनी एन्ट्री केली आहे आज या सर्व घडामोडीबाबत मत व्यक्त करताना पवारांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत 

राज्यातील तयार झालेल्या राजकीय परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आता शरद पवारांनी एन्ट्री केली आहे आज या सर्व घडामोडीबाबत मत व्यक्त करताना पवारांनी काही सवाल केले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी सेनेबरोबर असल्याने बाहेर गेलेल्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे मग या अगोदर का नाही बोलले हे आमदार ? अगोदर का नाही याना हिंदुत्व आठवलं ?अचानक का? असे सवाल करत या सर्वांना इकडे यावच लागेल असे पवार म्हणाले आहेत यापूर्वी मी अनेकदा अशी परिस्थिती पहिली आहे असेही सांगायला ते विसरले नाहीत
आज शरद पवार म्हणाले की, "बाहेर गेलेले आमदार राज्यात परतल्यानंतर शिवसेनेसोबत असतील असा विश्वास वाटतोय. विधानसभेत ज्या वेळी बहुमत चाचणी होईल त्यावेळी समजेल हे सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती मी महाराष्ट्रात याआधी अनेकदा पाहिली आहे. आताच्या परिस्थितीवर मात करुन हे सरकार कायम राहिल असा विश्वास आहे. जे लोक बाहेर गेले, त्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्याने ते नाराज आहेत. मग ही नाराजी या आधी का काढली नाही? हिंदुत्वाचा मुद्दा या आधी का काढला नाही? संजय राऊत यांनी त्यांना इकडे येऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. त्यामुळे त्यांना इकडे यावंच लागेल."

राज्यातील महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, "या अडीच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये महाविकास आघाडीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोना काळात उत्तम काम केलं. हे असं असताना राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग फसला हे म्हणणं राजकीय अज्ञान आहे."

No comments:

Post a Comment