Thursday, June 23, 2022

भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदासह 12 मंत्रिपदांची ऑफर

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेला मोठं खिंडार पाडलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकार यामुळे अस्थिर बनलं आहे. मात्र एवढं सगळं केल्यानंतर पुढे काय असा प्रश्न सर्वांना पडत आहे. या परिस्थितीत सत्ता स्थापनेसाठी भाजप महत्त्वाची भूमिका बजावेल. मात्र राज्यात वेगाने राजकीय हालचाली होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  नेमके कुठेत असा प्रश्न पडतो. काही वेगळी समीकरणं राज्यातील राजकारणात दिसतील अशी दाट शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्याने अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडे सरकार टीकवण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाही. त्यात आता एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वाचं आहे. झी 24 तासच्या वृत्तानुसार, भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय 12 मंत्रिपदांची ऑफरही त्यांच्या गटाला आहे. त्यामुळे सध्या सहा मंत्रिपदं असलेल्या शिंदे गटाल एकूण मंत्रिमंडळाच्या 25 टक्के हिस्सा देण्याची ऑफर भाजपकडून असल्याचं बोललं जात आहे.

No comments:

Post a Comment