Saturday, June 25, 2022

शिंदे गटाच्या आता शिवसेनेचं पक्ष चिन्ह 'धनुष्यबाण' ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू!

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कथित बंडखोरीमुळे राज्यातील सरकार धोक्यात आलं आहे. दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांची ताकद वाढताना दिसत आहे. आता तर शिवसेना पक्षच ताब्यात घेतला जाण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यावर आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये सर्व अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले असून बैठकीत 3 मोठे ठराव मंजूर करण्यात आले आहे दरम्यान
शिंदे गटाने आता शिवसेनेचं पक्ष चिन्ह 'धनुष्यबाण' ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ठाकरे देखील सावध झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी उपसभापती आणि राज्यपालांना पत्र पाठवले आहे. त्यात शिवसेनेच्या 37 आमदारांच्या पाठिंब्याने त्यांनी स्वतःची विधीमंडळ पक्षनेतेपदी वर्णी लावली आहे. शिंदे गटात सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे आणखी तीन आमदार गुवाहाटीला पोहोचले आहेत. शिंदे गटाने आता शिवसेनेचं पक्ष चिन्ह 'धनुष्यबाण' ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ठाकरे देखील सावध झाले आहेत.

शिवसेनेच्या बैठकीत 3 मोठे ठराव मंजूर
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत सुरू आहे. शिवसेनेच्या या बैठकीत आज तीन मोठे ठराव मंजूर करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, 
शिवसेनेतील सर्व प्रकारचे निर्णय घेणारे सर्व अधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील, असे पहिल्या ठरावात म्हटले आहे.

दुसरा प्रस्ताव - 
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कोणालाही वापरता येणार नाही.

तिसरा प्रस्ताव- पक्षातील गद्दारांवर कारवाई करण्याचे अधिकार पक्षप्रमुखांनाही असतील. आतापर्यंत हे सर्व प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आले आहेत.

Friday, June 24, 2022

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई ; खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त;

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्या कारखान्यावर धाड टाकली होती. याशिवाय खोतकर यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवर देखील धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता ईडीने खूप मोठी कारवाई केली आहे. ईडीने खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली आहे. शिवसेनेसाठी हा खूप मोठा फटका आहे. कारखान्याच्या जमीनीचा जो व्यवहार झाला आहे त्यामध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप आहे. याच आरोपांप्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात एकीकडे राजकीय भूकंप सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेच्या आणखीन एका नेत्यावर ईडीने कारवाईचा बडगा उचलत खळबळ उडवून दिली. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालना सहकारी साखर कारखान्यावर ED कडून  जप्तीची कारवाई करण्यात आलीय. सदर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आलीय. या कारवाई अंतर्गत कारखान्याची जमीन आणि तेथील यंत्रसामुग्री ED ने जप्त केलीय.

एकनाथ शिंदे अचानकपणे दिल्लीला रवाना ! ; हालचालीना वेग

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे काही वेळापूर्वी पोलीस बंदोबस्तात दोन-तीन आमदारांसोबत हॉटेल रेडिसनमधून बाहेर पडले होते. मात्र, आता एक तास उलटूनही एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये परतलेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित होत होता. शिंदे यांचे नवे लोकेशन उघड झाले आहे. शिंदे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे  सकाळपासून राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते. सुरुवातीला असं सांगितलं गेली की गुवाहाटीमध्येच काहीतरी कामासाठी गेले आहेत, पण ते गुवाहाटीला नसून दिल्लीला रवाना झाल्याचं उघड झालं आहे.

आतापर्यंत हॉटेलमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक आमदाराच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे स्वतः हजर राहायचे. मात्र, नुकतंच दिलीप लांडे यांनी हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे इथे उपस्थित नव्हते. त्याचवेळी शिंदे गुवाहाटीमध्ये आहेत की अन्य ठिकाणी रवाना झालेत असा प्रश्न विचारला जात होता.



विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अचानक नॉट रीचेबल ; आमदारांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे यांच्या गटात हळूहळू आमदारांची सख्या 50 च्या आसपास पोहोचली आहे. शिवसेनेचे कट्टर मानले जाणारे दिलीप लांडेही गुवाहाटी येते शिंदे गटाला मिळाले आहेत. दरम्यान शिवसेनेकडून काही आमदारांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या सगळ्या प्रक्रियेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ  यांची भूमिका महत्वाची आहे. परंतु मागच्या काही काळापासून नरहरी झिरवळच नॉट रिचेबल लागत आहे. ते कुठे गेलेत? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांची रणनीती ठरली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कालच्या बैठकीत शरद पवार यांनी काही सूचना केल्या आहेत. सभागृहात शिवसेनेच्या आमदारांचं सभासदत्व रद्द झाल्यावर फ्लोअर टेस्टच्या संख्याबळाचं गणित बदलणार आहे. हे गणित सतत बदलत ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होणार आहे. एकनाथ शिंदे यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं तर राजकीय चित्र पलटवलं जाऊ शकतं

राज्याच्या राजकारणाला नवे वळण ; विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळच नॉट रिचेबल...

 वेध माझा ऑनलाइन - आमदारांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या सगळ्या प्रक्रियेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भूमिका महत्वाची आहे
आमदारांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या सगळ्या प्रक्रियेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भूमिका महत्वाची आहे
आमदारांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या सगळ्या प्रक्रियेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भूमिका महत्वाची आहे





Thursday, June 23, 2022

हॅलो... मी एकनाथ शिंदे बोलतोय... अचानक डोंबवलीत खणाणला एकनाथ शिंदेंचा फोन...काय आहे कारण ?...वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडतांना दिसतायेत. सा सर्वाचं मुख्य कारण म्हणजे सेनेचे प्रमुख नेते तथा ठाणे जिल्ह्यात ज्यांचा दबदबा आहेत असे एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड पुकारलयं. त्यामुळे ठाणे ,कल्याण डोंबिवलीसह इतर जिल्ह्यातील इतर शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे. एकीकडे शिंदे यांच्याविरोधात काही शिवसैनिक आक्रमक झालेले असताना दुसरीकडे मात्र ठाणे जिल्हा मात्र शांत होता. शिवसैनिकांच्या मनाची घालमेल सुरू असतानाच अचानक गुरुवारी दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांचा फोन डोंबिवलीत खणाणला आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. याला कारणही तसं भावनिक आहे. 
       
''हॅलो  डॉक्टर..मी एकनाथ शिंदे बोलतोय.. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे.त्यांची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा... माझा कार्यकर्ता जगला पाहिजे ही विंनती...'', हे संभाषण होतं एकनाथ शिंदे यांचं! शिंदे यांनी डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात फोन लावला होता. कारण ज्येष्ठ शिवसैनिक तथा डोंबिवलीतील उपशहरप्रमुख राम मिराशी यांची २१ जूनला अचानक तब्येत बिघडल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात मिराशी यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती शिंदे यांना मिळाली. मग क्षणाचाही विलंब न करता गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजता थेट रुग्णालयातील डॉक्टरांना फोन लावला. 
"आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची काळजी घ्या", असं शिंदे म्हणाले. एकीकडे मोठया प्रमाणावर राजकीय उलथापालथ सुरू असतानाचा  शिंदे यांनी फोन करून कार्यकर्त्याच्या तब्येतीची चौकशी केल्याने शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले आणि शिंदे यांचे वर्षानुवर्षे जुने कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर का गेले नाहीत... याचे उत्तरदेखील लोकांना यानिमित्ताने मिळाले

एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांशी संवाद साधतानाचा व्हिडीओ व्हायरल ; त्यानंतर पवारांची प्रतिक्रिया ; पवार म्हणाले ... याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावेच लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला वाटत नाही की त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते इथे येऊन मार्गदर्शन करतील. तसेच तिथे गेलेल्या आमदारांनी घेतलेला निकाल पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात देखील त्याची प्रतिक्रिया उमटेल, त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत, असंही शरद पवार यांनी सांगितलं.माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी हे भाष्य केलं

एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांशी संवाद साधतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. नॅशनल पार्टी, महाशक्ती. त्यांनी मला सांगितलंय, तुम्ही जो हा निर्णय घेतला आहे, हा देशातला ऐतिहासिक निर्णय आहे. तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे. कुठेही काही लागलं तर कधीही कमी पडणार नाही, याची प्रचिती आपल्याला जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा येईल असं सांगत एकनाथ शिंदे यांनी  अप्रत्यक्षपणे भाजपचा पाठिंबा असल्याचं सूतोवाच केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आसाममध्ये व्यवस्था करणं म्हणजे तेथील राज्य सरकार अॅक्टिव्ह आहे. राज्य भाजपच्या हाती आहे. वस्तूस्थिती काय आहे हे स्पष्ट होतंय. तिथे कोण आहे, नाही नावं घेण्याची गरज नाही. तिथे जे दिसतंय ते कोण आहेत हे तुम्हाला समजेल, असंही ते म्हणाले. आता मी एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ पाहिला. आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठींबा असल्याचं ते म्हणाले. माझ्याकडे यादी आहे, त्यात राष्ट्रीय पक्ष कोण भाजप, बसपा, कम्युनिस्ट पार्टी सीपीआय, सीपीएम, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेली यादी आहे. यात बसपा, कम्युनिस्ट पार्टी सीपीआय, सीपीएम, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा हात आहे का? आणि नसेल तर कोणाचा हात आहे हे सांगण्याची गरज नसल्याचंही ते म्हणाले.
“महाविकास आघाडीचा प्रयोग फसला असं नाही. अडीच वर्षे महाविकास आघाडीनं उत्तम काम केलं आहे. अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले. कोरोना काळातही उत्तम काम झालं आहे अशात प्रयोग फसला असं म्हटलं जातं हे राजकीय अज्ञान आहे,” असंही त्यांनी सांगितलं. सरकार अल्पमतात आहे का नाही, हे ठरवण्याचा अधिकार हा विधानसभेला आहे. विधानसभेत हे सरकार बहुमतात आहे का नाही, हे स्पष्ट होईल, असंही पवार म्हणाले.

...