वेध माझा ऑनलाइन - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कथित बंडखोरीमुळे राज्यातील सरकार धोक्यात आलं आहे. दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांची ताकद वाढताना दिसत आहे. आता तर शिवसेना पक्षच ताब्यात घेतला जाण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यावर आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये सर्व अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले असून बैठकीत 3 मोठे ठराव मंजूर करण्यात आले आहे दरम्यान
शिंदे गटाने आता शिवसेनेचं पक्ष चिन्ह 'धनुष्यबाण' ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ठाकरे देखील सावध झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी उपसभापती आणि राज्यपालांना पत्र पाठवले आहे. त्यात शिवसेनेच्या 37 आमदारांच्या पाठिंब्याने त्यांनी स्वतःची विधीमंडळ पक्षनेतेपदी वर्णी लावली आहे. शिंदे गटात सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे आणखी तीन आमदार गुवाहाटीला पोहोचले आहेत. शिंदे गटाने आता शिवसेनेचं पक्ष चिन्ह 'धनुष्यबाण' ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ठाकरे देखील सावध झाले आहेत.
शिवसेनेच्या बैठकीत 3 मोठे ठराव मंजूर
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत सुरू आहे. शिवसेनेच्या या बैठकीत आज तीन मोठे ठराव मंजूर करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार,
शिवसेनेतील सर्व प्रकारचे निर्णय घेणारे सर्व अधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील, असे पहिल्या ठरावात म्हटले आहे.
दुसरा प्रस्ताव -
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कोणालाही वापरता येणार नाही.
तिसरा प्रस्ताव- पक्षातील गद्दारांवर कारवाई करण्याचे अधिकार पक्षप्रमुखांनाही असतील. आतापर्यंत हे सर्व प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment