वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे काही वेळापूर्वी पोलीस बंदोबस्तात दोन-तीन आमदारांसोबत हॉटेल रेडिसनमधून बाहेर पडले होते. मात्र, आता एक तास उलटूनही एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये परतलेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित होत होता. शिंदे यांचे नवे लोकेशन उघड झाले आहे. शिंदे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे सकाळपासून राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते. सुरुवातीला असं सांगितलं गेली की गुवाहाटीमध्येच काहीतरी कामासाठी गेले आहेत, पण ते गुवाहाटीला नसून दिल्लीला रवाना झाल्याचं उघड झालं आहे.
आतापर्यंत हॉटेलमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक आमदाराच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे स्वतः हजर राहायचे. मात्र, नुकतंच दिलीप लांडे यांनी हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे इथे उपस्थित नव्हते. त्याचवेळी शिंदे गुवाहाटीमध्ये आहेत की अन्य ठिकाणी रवाना झालेत असा प्रश्न विचारला जात होता.
No comments:
Post a Comment