वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे यांच्या गटात हळूहळू आमदारांची सख्या 50 च्या आसपास पोहोचली आहे. शिवसेनेचे कट्टर मानले जाणारे दिलीप लांडेही गुवाहाटी येते शिंदे गटाला मिळाले आहेत. दरम्यान शिवसेनेकडून काही आमदारांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या सगळ्या प्रक्रियेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भूमिका महत्वाची आहे. परंतु मागच्या काही काळापासून नरहरी झिरवळच नॉट रिचेबल लागत आहे. ते कुठे गेलेत? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांची रणनीती ठरली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कालच्या बैठकीत शरद पवार यांनी काही सूचना केल्या आहेत. सभागृहात शिवसेनेच्या आमदारांचं सभासदत्व रद्द झाल्यावर फ्लोअर टेस्टच्या संख्याबळाचं गणित बदलणार आहे. हे गणित सतत बदलत ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होणार आहे. एकनाथ शिंदे यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं तर राजकीय चित्र पलटवलं जाऊ शकतं
No comments:
Post a Comment