Sunday, July 3, 2022

 महाराष्ट्रातील नवं सरकार, शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार राहा

विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदा संघात जास्तीत जास्त वेळ द्या
शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना पाहायला मिळेल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे.
सरकार पडलं तर मध्यावधी निवडणुका लागतील. त्यामुळे तयारी आत्तापासून करायला लागा.

Saturday, July 2, 2022

बंडखोर आमदार गोव्याहुन मुंबईला रवाना...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याहून आता मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. गोव्याच्या ताज हॉटेलमधून आज दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास त्यांची बस विमानतळाच्या दिशेला रवाना झाली होती. त्यानंतर ते विमानतळात दाखल झाले. या सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आहेत. सर्व आमदार विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते विमानात बसले आणि मुंबईच्या दिशेला रवाना झाले. पुढच्या दोन तासात हे सर्व आमदार मुंबईत दाखल होतील. या आमदारांच्या विमानात बसतानाचा पहिला व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओत आमदार विमानात आसनस्थ होताना दिसत आहेत.

शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार विधान परिषदच्या 10 जागांच्या निवडणुकीनंतर त्याच दिवशी रात्री म्हणजे 20 जूनला रात्री मुंबईहून गुजरातच्या दिशेला रवाना झाले होते. त्यानंतर ते तिथून गुवाहाटीला गेले होते. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या 11 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व असे फेरबदल झाले. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या शिवसैनिक आमदारांमुळेच मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचं भाजपला पाठिंबा मिळाल्याने भाजप आणखी सक्षम झाली आहे. या सर्व घडामोडींनंतर अखेर 11 दिवसांनी शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आज मुंबईत दाखल होत आहेत. विधानसभेच्या अध्यक्षपदाची उद्या निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने मुंबईत आणलं जात आहे.

फडणवीस समर्थकांनी अमित शहा यांचा फोटो बॅनरवरून हटवला...!

वेध माझा ऑनलाइन - राजकीय सत्ता संघर्षानंतर अखेरीस शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे.  पण, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असताना उपमुख्यमंत्रिपद दिल्यामुळे भाजपच्या गोटात कमालीची नाराजी पसरली आहे. फडणवीस समर्थकांनी अमित शहा यांचा फोटो सुद्धा बॅनरवरून हटवला आहे माध्यमांनी याचबाबत प्रश्न विचारताच सदाभाऊ खोत यांनी कोणतेही उत्तर न देता पळ काढला.

एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर खातेवाटपाबाबत रस्सीखेच सुरू आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आज भाजपच्या नेत्यांच्या भेटीला पोहोचले यावेळी खोत यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.
संजय राऊत हे दुधात मिठाचा खडा आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्यावर मात्र त्यांना कधी बोलावसं वाटलं नाही. राज्यातला शेतकरी आत्महत्या करत होता त्याच्यावर ते बोलले नाहीत आपण बोलून बोलून आपलं राज्य घडवलं आता थोडं शांत बसावं, असा सल्लावजा टोला खोत यांनी सेनेला लगावला.
'देवेंद्र फडणवीस हे लोकमान्य नेते आहेत त्यांनी दाखवून दिले की, त्याग कशाला म्हटला जातो आणि एक मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व या राज्याला मिळाले त्याचं कौतुक सगळ राज्य करत आहे लढणारी माणसं हे नाराज होत नसतात, तेवढ्याच ताकदीने परत कामाला लागतात फडणवीस लढवय्ये आहेत असंही खोत म्हणाले.

शिंदे गटाचे मंत्री कोण असणार ? भाजपच्या नव्या चेहऱ्यांना संधी ?

वेध माझा ऑनलाइन - राज्यात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्या सरकारचा मंत्रिमंडळाचा शपथविधी चार किंवा पाच जुलैला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाकडून नेमकं कोणकोणत्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. 

चंद्रकांत पाटील यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने त्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याचं बोललं जात आहे. तर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, जयकुमार रावल, अतुल भातखळकर, मनिषा चौधरी यानावांची चर्चा आहे. 
शिंदे गटाकडून दीपक केसरकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभूराजे देसाई यांच्यासह संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा आहे.

Friday, July 1, 2022

शिंदे गटाला लॉटरी ; केंद्रातून मिळणार मंत्रिपद! कुणाला हे मंत्रिपद मिळणार? :

वेध माझा ऑनलाइन - महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर आता राज्यात शिंदे सरकार आले आहे. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. एकीकडे शिंदे गटावर शिवसेना कारवाई करत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाला केंद्रातून मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटातून कुणाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार याची चर्चा रंगली आहे

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. शिंदे सरकारचा लवकरच मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर होणार आहे. पण, शिंदे गटाला आा केंद्रातून सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे. बिहारमधून जदयू कोट्यातून नवा चेहरा दिला जाणार आहे. यासाठी शिंदे गटाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे, असं वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.
येत्या 18 जुलै रोजी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधीच हे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातला हा दुसरा फेरबदल ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदे गटातून कुणाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार याची चर्चा सध्या रंगली आहे

आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार - २०२२भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांना जाहीर...

वेध माझा ऑनलाइन - येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा 'आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार - २०२२', आंतराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती, प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी, , विश्वस्त अशोक पांडुरंग पाटील, अ‍ॅड. मानसिंगराव पाटील, राजेंद्र वसंतराव माने, दिलीपभाऊ चव्हाण, डॉ. विजयकुमार साळुंखे, सौ. रेश्मा कोरे, सौ. शोभा पाटील, संयोजन समिती सदस्य प्रा. एस. ए. डांगे, प्रा. रामभाऊ कणसे, मुकुंदराव कुलकर्णी, ए.एन.मुल्ला, संभाजी पाटील, प्रा. एस. व्ही. जोशी, अबुबकर सुतार, प्रकाश पवार व सुहेल बारस्कर यांची उपस्थिती होती.

डॉ. अशोकराव गुजर म्हणाले, प्रतिष्ठानने २०११ पासून महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेल्या विभूतिंना, 'आदरणीय पी.डी.पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने' गौरविण्याची ठरविले आणि १ जुलै २०११ ला पहिला पुरस्कार थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम रुपये ५१०००/-,  मानपत्र व स्मृतिचिन्ह असून, आजअखेर कु. नसीमा हुरजूक, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. ज्येष्ठराज जोशी, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. शा. बं. मुजुमदार, डॉ. अभय बंग, डॉ.जब्बार पटेल व डॉ. रणजित जगताप यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गत २ वर्षी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला नव्हता. आता, यावर्षी २०२२ चा पुरस्कार प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांना जाहीर करण्यात आला असून, आदरणीय पी. डी. पाटील साहेब यांच्या 'स्मृतिदिनी' १७ सप्टेंबर २०२२ रोजी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे असे डॉ. गुजर यांनी सांगितले.

प्राध्यापक डॉ. शिवाजीराव कदम यांच्याविषयी -
प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांनी तीन दशकांहून अधिक  काळ अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासन या क्षेत्रामध्ये भरीव कार्य केले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ म्हणून सुपरिचित असलेले डॉ. कदम हे एम्. एस्. सी., पी. एच्. डी. असून त्यांनी भारती विद्यापीठाच्या पुना कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचे जवळपास २५ वर्षे प्राचार्यपद भूषविले. दहा वर्षांहून अधिक काळ भारती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू राहिले आहेत. २००६ ते २०१७ या कालावधीत ते कुलगुरू राहिले व आता कुलपती पदाची धुरा सांभाळीत आहेत. रसायनशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. शिवाजीराव कदम यांनी भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह आणि कार्यवाह म्हणून २५ वर्षांहून अधिक काळ काम पाहिले आहे. ते पूणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ आणि विद्वत सभेचे सदस्य होते. विद्यापीठ अनुदान आयोग व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया या भारत सरकारच्या दोन सर्वोच्च संस्थेचे सदस्य म्हणून दोन वेळा त्यांचे नाव नामनिर्देशित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे NAAC म्हणजेच राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेचे सदस्य म्हणून देखील त्यांनी भरीव योगदान दिलेले आहे.

डॉ. कदम यांनी दीर्घकाळ अध्यापन व संशोधन क्षेत्रात व्यतीत केला असून, अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, श्रीलंका, जपान, थायलंड व फ्रान्स या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन संशोधनपर शोधनिबंध सादर केले आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे १७५ हून अधिक संशोधनपर शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. रसायनशास्त्राच्या अनेक पुस्तकांचे त्यांनी सहलेखन केले असून, अनेक पी.एच्. डी. विद्यार्थ्यांचे ते मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 'औषधनिर्माण शास्त्र' या पहिल्या विद्याशाखेची निर्मिती झाली आहे. या विद्याशाखेचे 'पहिले अधिष्ठाता' म्हणून त्यांनी १५ वर्षे काम पाहिले आहे.

सामाजिक बांधिलकीतून आज डॉ. कदम हे महात्मा गांधी स्मारक निधीचे सदस्य, पांचगणी अनाथ आश्रम व कम्युनिटी अ‍ॅण्ड स्पॉन्सरशिप प्रोग्राम चे विश्वस्त, महात्मा गांधी चॅरिटेबल हॉस्पिटल या धर्मदाय दवाखान्याचे व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्राचे गव्हर्निंग बॉडीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. शिवाजीराव कदम यांच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये, आंतरराष्ट्रीय न्यायदिनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व सरन्यायाधीश यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय कायदा दिन पुरस्कार, सीएमएआय आणि टेमा यांच्याद्वारे १६ वा राष्ट्रीय शैक्षणिक पुरस्कार, बार कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे सुवर्णमहोत्सवी विशेष पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उच्चशिक्षणातील सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, एस्एफई लाईफटाईम अचिव्हमेंट 
अ‍ॅवॉर्ड, फार्मसी एज्युकेटर ऑफ डिस्टिंक्शन अ‍ॅवॉर्ड जीवनगौरव पुरस्कार, यशवंत जीवनगौरव पुरस्कार, आणि फुले - शाहू - आंबेडकर विचार वेद पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.  


हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही – उद्धव ठाकरे

वेध माझा ऑनलाइन - राज्यात एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या एक दिवसानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्रकारांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी भूतकाळातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. उद्धव ठाकरेम्हणाले की, जर गृहमंत्री अमित शाहांनी मला दिलेलं वचन पूर्ण केलं असतं तर आज राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असता. मात्र हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही.

पुढे ते म्हणाले की, 2019 मध्ये युतीदरम्यान मी अमित शहा यांना म्हणालो हो, की, अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री असेल. जर त्यांनी हे मान्य केलं असतं तर आघाडी सरकारसोबत युती करावी लागली नसती. आणि आता अडीच वर्षांनंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असता