Saturday, July 2, 2022

फडणवीस समर्थकांनी अमित शहा यांचा फोटो बॅनरवरून हटवला...!

वेध माझा ऑनलाइन - राजकीय सत्ता संघर्षानंतर अखेरीस शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे.  पण, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असताना उपमुख्यमंत्रिपद दिल्यामुळे भाजपच्या गोटात कमालीची नाराजी पसरली आहे. फडणवीस समर्थकांनी अमित शहा यांचा फोटो सुद्धा बॅनरवरून हटवला आहे माध्यमांनी याचबाबत प्रश्न विचारताच सदाभाऊ खोत यांनी कोणतेही उत्तर न देता पळ काढला.

एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर खातेवाटपाबाबत रस्सीखेच सुरू आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आज भाजपच्या नेत्यांच्या भेटीला पोहोचले यावेळी खोत यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.
संजय राऊत हे दुधात मिठाचा खडा आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्यावर मात्र त्यांना कधी बोलावसं वाटलं नाही. राज्यातला शेतकरी आत्महत्या करत होता त्याच्यावर ते बोलले नाहीत आपण बोलून बोलून आपलं राज्य घडवलं आता थोडं शांत बसावं, असा सल्लावजा टोला खोत यांनी सेनेला लगावला.
'देवेंद्र फडणवीस हे लोकमान्य नेते आहेत त्यांनी दाखवून दिले की, त्याग कशाला म्हटला जातो आणि एक मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व या राज्याला मिळाले त्याचं कौतुक सगळ राज्य करत आहे लढणारी माणसं हे नाराज होत नसतात, तेवढ्याच ताकदीने परत कामाला लागतात फडणवीस लढवय्ये आहेत असंही खोत म्हणाले.

No comments:

Post a Comment