वेध माझा ऑनलाइन - महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर आता राज्यात शिंदे सरकार आले आहे. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. एकीकडे शिंदे गटावर शिवसेना कारवाई करत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाला केंद्रातून मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटातून कुणाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार याची चर्चा रंगली आहे
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. शिंदे सरकारचा लवकरच मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर होणार आहे. पण, शिंदे गटाला आा केंद्रातून सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे. बिहारमधून जदयू कोट्यातून नवा चेहरा दिला जाणार आहे. यासाठी शिंदे गटाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे, असं वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.
येत्या 18 जुलै रोजी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधीच हे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातला हा दुसरा फेरबदल ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदे गटातून कुणाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार याची चर्चा सध्या रंगली आहे
No comments:
Post a Comment