Wednesday, July 6, 2022

आज कराडात कोरोना रुग्णसंख्या वाढली! ; सातारा जिल्ह्यात 68 बाधित ; राज्यात 3142 नव्या रुग्णांची भर ,तर दिवसभरात 3974 रुग्ण कोरोनामुक्त...

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 68 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 3  खंडाळा 5 खटाव 5 कोरेगांव 7 माण 1महाबळेश्वर 1 पाटण 1 फलटण 24  सातारा 14 वाई 2 व इतर 5 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 68 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

दरम्यान, राज्यात आज 3142 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 3974 रुग्ण कोरोनामुक्त  होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या  5600 सक्रिय रुग्ण आहेत. 

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज सात कोरोनाबाधित  रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78, 25,114 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.90 टक्के इतकं झालं आहे.  

राज्यात आज एकूण 19981  सक्रिय रुग्ण
राज्यात आज एकूण 19981 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5600  इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यात 3384 सक्रिय रुग्ण आहेत.

बी ए. 5 व्हेरीयंटचे 6 आणि बी ए. 4 चे तीन रुग्ण आढळले
बी ए.5 व्हेरीयंटचे 6 आणि बी ए. 4 चे तीन रुग्ण  आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे  येथील आहेत. या शिवाय बीए. 2.75 या वेरियंटचे राज्यात एकूण 10 रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत . हे सर्व रुग्ण लक्षणविरहित असून ते घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत.

देशात रुग्णांसह मृत्यूसंख्या वाढली
देशातील कोरोनाच्या विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतातील कोरोना रुग्णांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 159 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी देशात 16 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 24 रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी दिवसभरात 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 5 लाख 25 हजार 270 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत 15 हजार 394 रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे.


जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक ; 18 जुलैला याद्या होणार जाहीर...

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर त्या दिवसापासून 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या 29 जुलै 2022 रोजी अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 8 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली.


वेध माझा ऑनलाइन - राजकीय सत्तासंघर्षानंतर अखेरीस शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता चांगलेच कामाला लागले आहे. पण, अजूनही शिंदे गटाकडून भेटीगाठी सुरूच आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.  या भेटीमुळे दादर परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर अचानक शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खळबळ उडाली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्व शिंदे गटातील आमदार हे आपआपल्या मतदारसंघात पोहोचले आहे. आज सकाळी सदा सरवणकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवास्थानी जाऊन भेट घेतली.
माहीम मतदार संघाचे आमदार सदा सरवणकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. सदा सरवणकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत.  या भेटीच्यावेळी सरवणकर यांची मुलगी आणि माजी नगरसेवक असलेला मुलगा समाधान सरवणकर ही उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सदा सरवणकर म्हणाले की, 'राज्यात सेना-भाजप सरकार स्थापन झाले आहे. राज ठाकरे हिंदु पुरस्कर्ते आहेत.  राज ठाकरे हे हिंदु जननायक आहेत. माझे शेजारी सुद्धा आहेत. त्यांची तब्येत बरी नसतानाही त्यांनी मला वेळ दिला मी आभारी आहे', अशी प्रतिक्रिया दिली.
विशेष म्हणजे,शिंदे सरकारची बहुमत चाचणी पार पडली. यावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारला मत दिलं होतं. एवढंच नाहीतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तोंडभरून कौतुकही केलं होतं.

Monday, July 4, 2022

जयंत गुजर परिवाराच्या वतीने उद्या गुरुपौर्णिमा उत्सवाचे कराडात आयोजन ; भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा ; जयंत गुजर परिवाराच्या वतीने निमंत्रण...


वेध माझा ऑनलाइन - 
येथील साईभक्त जयंत  गुजर यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी 
उद्या बुधवारी 13 जुलैला जुने कृष्णामाई मंगल कार्यालय येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार असल्याची माहिती स्वतः जयंत गुजर यांनी दिली आहे यावर्षी या उत्सवाचे 25 वे वर्ष आहे

दरम्यान, बुधवार दिनांक 13 रोजी पहाटे सव्वापाच वाजता काकड आरतीने या उत्सवास प्रारंभ होईल... त्यानंतर 6 वाजता अभिषेक होईल... 7 वाजता सत्यनारायण महापूजा होणार आहे... त्यानंतर 9 वाजता स्तवनमंजिरी वाचन... दुपारी 12 वाजता माध्यान आरती...व साडेबारा वाजता महाप्रसाद सुरू होणार आहे... दुपारी 4.30 यर्यंत महाप्रसादाचा लाभ भक्तांना मिळणार आहे... त्यानंतर सायंकाळी 6 30 वाजता धुप आरती व रात्री 10 वाजता शेजारती होईल... अशी माहिती जयंत गुजर यांनी दिली आहे...तरी जास्तीत जास्त भक्तांनी आपल्या परिवारासह या  कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जयंत गुजर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे
गेली 24 वर्षे जयंत गुजर परिवार हा उत्सव  साजरा करत आहेत यावर्षी या उत्सवाचे 25 वे वर्ष आहे

आज कराडमध्ये सापडला कोरोना बाधित रुग्ण ; आज साताऱ्यात सर्वाधिक पेशंट ; सातारा जिल्ह्यात पेशंट किती?

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 10 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 1  खंडाळा 3 खटाव कोरेगांव 1 माण 0महाबळेश्वर 0 पाटण  फलटण 0  सातारा 5 वाई 0 व इतर  आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 10 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  


पंपिंग स्टेशन सातसाठी जमिनी दिलेल्या 35 शेतकऱयांना सुभाषकाका पाटील यांनी शब्द दिला आणि पाळलाही...काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन - कराडच्या वाढीव भागातील भुयारी गटार योजनेसाठी वाखाण भागात पंपिंग स्टेशन क्रमांक सात प्रस्तावित करण्यात आले होते. या स्टेशनसाठी 2012 साली जमीन देणाऱया 35 शेतकऱयांना टीडीआर मिळवून देण्याचा शब्द लोकशाही आघाडीचे तत्कालीन अध्यक्ष सुभाषराव पाटील यांनी दिला होता. मात्र पालिका स्तरावर हा विषय जाणूनबुजून मागे ठेवला गेला असताना सुभाषराव पाटील यांनी पाठपुरावा करून या शेतकऱयांना टीडीआर मिळवून दिला. सोमवारी नगरपालिकेत सुभाषराव पाटील हस्ते व मुख्याधिकारी रमाकांत डाके, सौरभ पाटील, अभियंता श्री ढोणे  यांच्या उपस्थितीत टीडीआर प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.  
कराड शहराची हद्दवाढ झाल्यानंतर शहराच्या त्रिशंकू भागासाठी शहराप्रमाणेच भुयारी गटार योजना राबविण्याचा निर्णय तत्कालीन सत्ताधारी लोकशाही आघाडीने घेतला होता. यासाठी विविध ठिकाणी पंपिंग स्टेशन प्रस्तावित करण्यात आली होती. वाखाण रस्त्यावर पटेल लोनच्या मागील बाजूस पौडाचा ओढय़ाजवळ पंपिंग स्टेशन क्रमांक सात प्रस्तावित करण्यात आले होते. येथे जमिनी असणाऱया शेतकऱयांबरोबर वाटाघाटी करून त्यांना जमिनीच्या बदल्यात टीडीआर मिळवून देण्याचा शब्द सुभाषराव पाटील यांनी दिला. मंगळवार पेठेतील शिंदे व तांबवेकर  कुटुंबातील 35 शेतकऱयांनी सुमारे 32 गुंठे जमीन दिली.  
दरम्यानच्या काळात 2016 साली नगरपालिका निवडणूक झाली. नवे सत्ताधारी आले. लोकशाही आघाडी विरोधी बाकावर गेली. त्यानंतरच्या पाच ते सहा वर्षांच्या काळात भुयारी गटर योजनेतील अडथळे दूर करून ही योजना कार्यान्वित करणे गरजेचे होते. टीडीआरचा शब्द दिलेल्या शेतकऱयांना तो मिळवून देणे गरजेचे होते. मात्र हा विषय पुढे गेलाच नाही. यात दप्तर दिरंगाईचा अनुभव शेतकऱयांना येत होता. मात्र सुभाषराव पाटील यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. लोकशाही आघाडीचे तत्कालीन गटनेते सौरभ पाटील यांनी याबाबत पालिका सभेत आवाज उठवला होता. सुभाषराव पाटील आणि सौरभ पाटील यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, नगर रचना विभाग सातारा, भूमि अभिलेख यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्याधिकारी रमाकांत डाके व जयंत बेडेकर यांचे सहकार्य लाभले. अखेर शासनाकडून हा टीडीआर मंजूर झाला आहे.
सोमवारी नगरपालिकेत सुभाषराव पाटील यांच्या हस्ते संबंधित शेतकऱयांना टीडीआर प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सुमारे दहा वर्षांनी हा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल शेतकऱयांनी सुभाषराव पाटील तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह लोकशाही आघाडीचे आभार मानले.

*सर्वप्रथम पी. डी. पाटीलसाहेबांनी पाहिली होती जागा*
सुभाषराव पाटील यावेळी म्हणाले की, पंपिंग स्टेशन क्रमांक सातची जागा सर्वप्रथम स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेबांनी पाहिली होती. नंतरच्या काळात मी वाटाघाटी केल्या. टीडीआर देण्याच्या शब्द दिला. मात्र मध्यंतरीच्या पालिकेतील राजकीय उलथापालथीत याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले. हा प्रश्न मार्गी लागावा, अशी काहींची इच्छा नव्हती. तरीही शेतकऱयांनी संयमाने वाट पाहिली. आम्ही हा प्रश्न मार्गी लावला. तरीही काही उशिर झाला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगत त्यांनी जमिनी दिल्याबद्दल संबंधित शेतकर्यांचे आभार मानले.

*पंपिंग स्टेशन सात वाखाण भागासाठी महत्वाचे*
सद्याच्या रूक्मिणीनगर भागात पंपिंग स्टेशन क्रमांक तीन आहे. या भागात नागरीकरण वाढत असून येथील ड्रेनेज या पंपिंग स्टेशनला जोडले आहे. त्याचा ताणही वाढत आहे. पंपिंग स्टेशन क्रमांक सातची जागा संपूर्ण वाखाण भागात खोलगट आहे. त्यामुळे ही जागा योग्य होती. पंपिंग स्टेशन झाल्यानंतर संपूर्ण वाखाण भागातील ड्रेनेज येथे जोडता येणार आहे. त्यामुळे तीन क्रमांकाच्या पंपिंग स्टेशनचा ताणही कमी होणार आहे. भुयारी गटर योजनाही गतीने साकारणार आहे.

पाच वर्षे प्रश्न ‘जैसे थे' होता
शहराच्या विकासात योगदान देण्याच्या हेतून सुभाषराव पाटील यांनी आम्हा शेतकऱयांकडे शब्द टाकला. त्याचा मान ठेवून आम्ही जमिनी दिल्या. मात्र गेल्या पाच वर्षात टीडीआर मिळवून देण्याच्या विषय ‘जैसे थे' होता. आम्ही अनेकांना भेटलो. मात्र दिरंगाई होत असल्याने पुन्हा सुभाषकाकांना विनंती केली. त्यांनीच पालिकेत नसतानाही पाठपुरावा केला. त्यामुळे आम्हाला टीडीआर मिळाला आहे.
शशांक शिंदे, (शेतकरी)

माझ्या घरावर दगड मारणारा अजून पैदा झाला नाही ; एकनाथ शिंदे कडाडले

वेध माझा ऑनलाइन - एकीकडे माझ्याकडे बोलण्यासाठी माणसं पाठवली आणि दुसरीकडे माझ्यावर दुषणं लावली, टीका केली, पुतळे जाळून टाकले. घरावर दगडं मारण्याची भाषा केली, पण एकनाथ शिंदेंच्या घरावर दगड मारणारा अजून कुणी पैदा झाला नाही. जितेंद्र आव्हाड यांना माहिती आहे, माझ्यावर प्रेम करणारी किती माणसं आहे, मी निघालो तर लोकांचा मधमाशांचा मोहोळ उठतो, माझ्यावर चालून आले तर ही लोक त्यांना डसून संपवून टाकतील, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना इशारा दिला.

शिंदे आणि फडणवीस सरकारने बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर झालेले आरोप आणि टिकेला सडेतोड उत्तर दिले.

शिंदे पुढे म्हणाले...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने भाजप आणि शिवसेना सरकार आले आहे.गेल्या दहा दिवसांपासून 50 आमदार सातत्याने माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय घेण्याचे धाडस करतात त्यांचे मी अभिनंदन करतो. मला आता विश्वासही बसत नाहीये की, या सभागृहामध्ये मुख्यमंत्री म्हणून बोलत आहे.
या महाराष्ट्राच्या अनेक घटना पाहिल्या असतील, खासदार, आमदार किंवा नगरसेवक असतील तर ते विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जात असतात. पण, पहिल्यांदाच अशी घटनेची नोंद फडणवीस यांनी सांगितले की, 33 देशांनी नोंद घेतली आहे.
स्वतचं आमदार, मंत्रिपद डावावर लावून सगळे जण हे आमच्यासोबत आले, समोर एवढे मोठे मंत्री, नेते, सत्ता आणि यंत्रणा होती. पण, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा सैनिक होता. आम्ही ज्या दिवशी विधानभवनातून निघालो तो आधी मी व्यथित होतो. ज्या पद्धतीने माझ्यासोबत वागले होते, त्याची साक्षीदार इथं बसलेले आमदार होते.

बाळासाहेबांनी नेहमी आमदारांविरोधात बंड पुकारण्याचे सांगितले. मला त्यावेळी काय झालं काही कळत नव्हतं. मी लोकांना फोन लावले आणि मोहिम सुरू केली. मला मुख्यमंत्र्यांनी फोन करून विचारलं, कुठे चाललाय, कशाला चाललाय आणि कधी येणार... मी कधी येणार हे सांगितलं नाही.
अजितदादा.... हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहिद झालो तरी चालेल पण मागे येणार नाही, असं ठरवलं होतं.
मी आमदारांना विश्वास दिला होता, तुमची आमदारकी, तुमचे भवितव्य काय असेल हे यासाठी मी लढेन, जोपर्यंत तुमचं भलं होत नाही, तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. तुमची आमदारकी मिळाल्यानंतर मी जगाचा निरोप घेईन.