वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 68 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे
तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 3 खंडाळा 5 खटाव 5 कोरेगांव 7 माण 1महाबळेश्वर 1 पाटण 1 फलटण 24 सातारा 14 वाई 2 व इतर 5 आणि नंतरचे वाढीव 0 असे आज अखेर एकूण 68 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
दरम्यान, राज्यात आज 3142 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 3974 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 5600 सक्रिय रुग्ण आहेत.
सात कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज सात कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78, 25,114 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.90 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज एकूण 19981 सक्रिय रुग्ण
राज्यात आज एकूण 19981 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5600 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यात 3384 सक्रिय रुग्ण आहेत.
बी ए. 5 व्हेरीयंटचे 6 आणि बी ए. 4 चे तीन रुग्ण आढळले
बी ए.5 व्हेरीयंटचे 6 आणि बी ए. 4 चे तीन रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. या शिवाय बीए. 2.75 या वेरियंटचे राज्यात एकूण 10 रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत . हे सर्व रुग्ण लक्षणविरहित असून ते घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत.
देशात रुग्णांसह मृत्यूसंख्या वाढली
देशातील कोरोनाच्या विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतातील कोरोना रुग्णांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 159 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी देशात 16 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 24 रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी दिवसभरात 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 5 लाख 25 हजार 270 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत 15 हजार 394 रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे.
No comments:
Post a Comment