Wednesday, July 6, 2022

वेध माझा ऑनलाइन - राजकीय सत्तासंघर्षानंतर अखेरीस शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता चांगलेच कामाला लागले आहे. पण, अजूनही शिंदे गटाकडून भेटीगाठी सुरूच आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.  या भेटीमुळे दादर परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर अचानक शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खळबळ उडाली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्व शिंदे गटातील आमदार हे आपआपल्या मतदारसंघात पोहोचले आहे. आज सकाळी सदा सरवणकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवास्थानी जाऊन भेट घेतली.
माहीम मतदार संघाचे आमदार सदा सरवणकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. सदा सरवणकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत.  या भेटीच्यावेळी सरवणकर यांची मुलगी आणि माजी नगरसेवक असलेला मुलगा समाधान सरवणकर ही उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सदा सरवणकर म्हणाले की, 'राज्यात सेना-भाजप सरकार स्थापन झाले आहे. राज ठाकरे हिंदु पुरस्कर्ते आहेत.  राज ठाकरे हे हिंदु जननायक आहेत. माझे शेजारी सुद्धा आहेत. त्यांची तब्येत बरी नसतानाही त्यांनी मला वेळ दिला मी आभारी आहे', अशी प्रतिक्रिया दिली.
विशेष म्हणजे,शिंदे सरकारची बहुमत चाचणी पार पडली. यावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारला मत दिलं होतं. एवढंच नाहीतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तोंडभरून कौतुकही केलं होतं.

No comments:

Post a Comment