वेध माझा ऑनलाइन - भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेले दोन आठवडे त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याचा भीषण अपघात झाला होता आज गुरूवारी सकाळी त्यांना डाॅक्टरांनी डिस्जार्च दिला आहे. त्यांचा 24 डिसेंबर रोजी अपघात झाला होता. पुलावरून जवळपास 30 फूट चारचाकी गाडी खोल खड्ड्यात कोसळली होती. त्यानंतर त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. आज त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे
Thursday, January 5, 2023
अपघातानंतर धनंजय मुंडे यांना कुठे कुठे आहे फ्रॅक्चर? आणखी काय आहे महत्वाची माहिती ?वाचा बातमी
वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला असून सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आता धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. आमदार धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर आहे. धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून त्यांच्या प्रकृतीसंदर्भात सविस्तर माहिती देत चिंतेचं कारण नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या छातीच्या बरगड्यांना मार लागल्यामुळे दोन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. त्याव्यतिरिक्त त्यांच्या छातीला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं रिपोर्ट्समधून निष्पन्न झालं आहे. तसेच, अपघातात त्यांच्या डोक्यालाही काही जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्यासाठी योग्य त्या तपासण्या करण्यात आल्या. डोक्याला झालेल्या जखमा बाहेरून आहेत. काही दिवसांतच त्या बऱ्या होतील, असंही कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून बेल्ट लाऊन आराम करणं हा एकमेव उपचार असल्याचं धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Wednesday, January 4, 2023
"औरंगजेबजी' म्हणत आता बावनकुळे फसले ; औरंगजेबजी असे सन्मानाने म्हणणाऱ्या बावनकुळे यांचा पुतळा धर्मवीर शब्दावर राजकारण करणारे आता जाळणार का? अमोल मिटकरी यांचा सवाल-
वेध माझा ऑनलाइन - अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत आणि जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक होते, असं अजित पवार म्हणाले. तसंच औरंगजेब क्रूर असता तर त्याने विष्णूचं मंदीर तोडलं असतं, असं वक्तव्य केलं. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर भाजप राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध आक्रमक झाली.
अजित पवार यांच्या विरोधात भाजपने राज्यभरात आंदोलन केलं, पण यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच अडचणीत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी बावनकुळे यांचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे, यामध्ये बावनकुळे औरंगजेबजी असा उल्लेख करताना दिसत आहेत 'क्रूरकर्मा औरंग्याला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब ज्यावेळी औरंगजेबजी असे सन्मानाने म्हणतात त्यावेळी धर्मवीर शब्दावर राजकारण करू पाहणारे औरंगजेबाचे बगलबच्चे बावनकुळे यांचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का? विशेषता टिलल्या आमदार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करेल का?' असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी विचारला आहे.
माझ्या काकाला जाणता राजाच म्हणा’, असं मी कुठं म्हटलो ; अजितदादा संतापले ;
वेध माझा ऑनलाइन - छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील विधानावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर भाजपाकडून सडकून टीका होत आहे. इतकच नाही तर भाजपाने अजित पवारांविरोधात राज्यभर आंदोलनंही केली. त्यानंतर अजित पवारांनी बुधवारी (४ जानेवारी) पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘जाणता राजा’ शब्दावरून प्रश्न विचारला. यावर अजित पवार भर पत्रकार परिषदेत संतापल्याचं दिसलं.
अजित पवार यांनी संभाजी महाराजांसाठी वापरला जाणारा स्वराज्यरक्षक हा शब्द इतर कोणासाठीही वापरता येणार नाही असं म्हटलं. त्यावर भाजपाकडून शरद पवारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘जाणता राजा’ शब्दावर आक्षेप घेतला जातो. याबाबत पत्रकाराने अजित पवारांना प्रश्न विचारला. अजित पवार म्हणाले, “आम्ही कुठं म्हणतो वापरा. ‘माझ्या काकाला जाणता राजाच म्हणा’, असं मी कुठं म्हटलो. काय बोलतो राव. ज्यांनी हा शब्दप्रयोग केला त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, मला कशाला विचारता.”अस म्हणत दादा यावेळी संतापलेले दिसले
ईडीकडून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांची १० कोटींची मालमत्ता जप्त ; ईडी चा दणका ; ठाकरे गटाला धक्का ;
वेध माझा ऑनलाइन - ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना ईडी ने दणका दिला आहे. ईडीकडून अनिल परब यांच्याशी निगडीत १० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अनिल परब यांची ईडीकडून चौकशी देखील झाली होती. त्यानंतर आज ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
ईडीनं या कारवाई संदर्भात एक ट्विट देखील केलं आहे. यात अनिल परब, साई रिसॉर्ट एनएक्स आणि इतर ठिकाणची १०.२० कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. अनिल परब यांनी मात्र या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याचं भाष्य केलं आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद मागणार आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार संघटनांमध्ये चर्चा ; बैठकीत काढण्यात आला सकारात्मक तोडगा ; .
वेध माझा ऑनलाइन - आज मध्यरात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार संघटनांमध्ये आज चर्चा पार पडली. या बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्यात आला. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा विभागाचे अधिकारी, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण विभागाचे अधिकारी आणि विविध वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित करताना म्हटले की, राज्य सरकारला वीज कंपन्यांचे कोणतेही खासगीकरण करायचे नाही. येत्या तीन वर्षात राज्य सरकार 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. अदानी समूहाने समांतर परवान्यासाठी अर्ज केला. त्याच्या निषेधार्थ हा संप करण्यात आला होता. याबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, समांतर परवान्याबाबत महावितरण, सरकारने अर्ज वीज नियामक आयोगाकडे करायला हवे अशी भूमिका वीज कर्मचारी संघटनांनी मांडली होती. राज्य वीज नियामक आयोगाकडे आपल्या हिताचे निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सरकार घेईल, असे फडणवीस यांनी म्हटले. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. कामगार संघटनांनी घेतलेली भूमिका ही राज्य सरकारची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
दिलगिरी नाही,माफी नाही...संभाजीराजे स्वराज्यरक्षकच ; अजितदादा आपल्या भूमिकेवर ठाम ;
वेध माझा ऑनलाइन - संभाजीराजांच्या स्मारकासाठी मी पाठपुरावा केला आहे. मी महापुरुषांबद्दल , स्त्रियांबद्दल कधीही चुकीचा बोललो नाही. मी माझ्या भूमीकेवर ठाम आहे असे म्हणत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य राज्यपाल, मंत्री, सत्ताधारी आमदारांनी केले आहे. त्या भाजप आमदारांवर कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित करत माझ्या विरोधात आंदोलन करण्यास भाजपने प्रोत्साहित केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
अजित पवार म्हणाले, मी महापुरुषबद्दल , स्त्रियांबद्दल कधीही चुकीचे बोललो नाही. भाजपने मला विरोधी पक्ष नेते पद दिलेले नाही त्यामुळे त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. भाजपने माझ्याविरोधात आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले आहे. महापुरुषबद्दल बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षांनी केली आहे. त्यांच्यावर कारावाई होत नाही. ते माफी मागायला तयार नाही, दिलगिरी व्यक्त करत नाहीत. मी वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.
Subscribe to:
Posts (Atom)