वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला असून सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आता धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. आमदार धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर आहे. धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून त्यांच्या प्रकृतीसंदर्भात सविस्तर माहिती देत चिंतेचं कारण नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या छातीच्या बरगड्यांना मार लागल्यामुळे दोन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. त्याव्यतिरिक्त त्यांच्या छातीला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं रिपोर्ट्समधून निष्पन्न झालं आहे. तसेच, अपघातात त्यांच्या डोक्यालाही काही जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्यासाठी योग्य त्या तपासण्या करण्यात आल्या. डोक्याला झालेल्या जखमा बाहेरून आहेत. काही दिवसांतच त्या बऱ्या होतील, असंही कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून बेल्ट लाऊन आराम करणं हा एकमेव उपचार असल्याचं धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
No comments:
Post a Comment