वेध माझा ऑनलाइन - छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील विधानावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर भाजपाकडून सडकून टीका होत आहे. इतकच नाही तर भाजपाने अजित पवारांविरोधात राज्यभर आंदोलनंही केली. त्यानंतर अजित पवारांनी बुधवारी (४ जानेवारी) पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘जाणता राजा’ शब्दावरून प्रश्न विचारला. यावर अजित पवार भर पत्रकार परिषदेत संतापल्याचं दिसलं.
अजित पवार यांनी संभाजी महाराजांसाठी वापरला जाणारा स्वराज्यरक्षक हा शब्द इतर कोणासाठीही वापरता येणार नाही असं म्हटलं. त्यावर भाजपाकडून शरद पवारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘जाणता राजा’ शब्दावर आक्षेप घेतला जातो. याबाबत पत्रकाराने अजित पवारांना प्रश्न विचारला. अजित पवार म्हणाले, “आम्ही कुठं म्हणतो वापरा. ‘माझ्या काकाला जाणता राजाच म्हणा’, असं मी कुठं म्हटलो. काय बोलतो राव. ज्यांनी हा शब्दप्रयोग केला त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, मला कशाला विचारता.”अस म्हणत दादा यावेळी संतापलेले दिसले
No comments:
Post a Comment