वेध माझा ऑनलाइन - अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत आणि जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक होते, असं अजित पवार म्हणाले. तसंच औरंगजेब क्रूर असता तर त्याने विष्णूचं मंदीर तोडलं असतं, असं वक्तव्य केलं. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर भाजप राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध आक्रमक झाली.
अजित पवार यांच्या विरोधात भाजपने राज्यभरात आंदोलन केलं, पण यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच अडचणीत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी बावनकुळे यांचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे, यामध्ये बावनकुळे औरंगजेबजी असा उल्लेख करताना दिसत आहेत 'क्रूरकर्मा औरंग्याला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब ज्यावेळी औरंगजेबजी असे सन्मानाने म्हणतात त्यावेळी धर्मवीर शब्दावर राजकारण करू पाहणारे औरंगजेबाचे बगलबच्चे बावनकुळे यांचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का? विशेषता टिलल्या आमदार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करेल का?' असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी विचारला आहे.
No comments:
Post a Comment