Friday, March 24, 2023

मी भाजपमध्ये नाराज नाही ; विनोद तावडे यांची स्पष्टोक्ती ; म्हणाले, राहुल गांधींच्यात राजकीय परिपक्वता नाही ;

वेध माझा ऑनलाइन - मी आणि पंकजा मुंढे भाजपमध्ये नाराज होतो हा चुकीचा समज आहे मी नाराज असतो तर कुठेतरी तसे आलेही असते मात्र, तसे काहीच नाही मी राज्यात मंत्री होतो आणि सध्या पक्षाचा पदाधिकारी आहे ही अडजेस्टमेंट नाही तर आमच्या पक्षात जो आदेश दिला जातो त्याचे पालन केले जाते अशी पद्धत आहे असा खुलासा भाजप चे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे बोलणे वागणे राजकीय ड्रीष्टीने परिपक्व नसल्याचेही विधान तावडे यांनी यावेळी केले 

केंद्राच्या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत सातारा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी कराड येथे आले असता कराडच्या सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
भाजपचे राज्याचे पदाधिकारी डॉ अतुल भोसले विक्रम पावसकर तसेच कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ धैर्यशील कदम मनोज घोरपडे यांच्यासह शहर अध्यक्ष एकनाथ बागडी तसेच अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्ते आणि सातारा लोकसभा प्रवास समितीचे जिल्ह्याचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते

ते पुढे म्हणाले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात हिंदुत्व आणले मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडीला लावून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व संपवण्यासाठी प्रयत्न केले त्यांना लोक स्वीकारणार नाहीत शिवसेनेने सोडलेले हिंदुत्व व त्यामुळे त्यांच्यापासून लांब गेलेली 8 टक्के हिंदूत्वाची मते भाजप मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे असेही ते म्हणाले मनसे बरोबर भाजपची युती होण्याची शक्यता तावडे यांनी फेटाळून लावली

भाजप ने आता लोकसभा प्रवास योजना राबवण्यास सुरुवात केली आहे राज्यातील 48 पैकी 18 लोकसभा मतदार संघात याची प्रत्यक्ष अमलबजावणी सुरु झाली आहे पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या गरीब कल्याणकारी योजना किती लोकांपर्यंत पोचल्या याचा याद्वारे आढावा घेण्यात येणार आहे तसेच त्या त्या राज्यात बद्दललेली राजकीय समीकरणे याबाबतचा ही आढावा यातून घेण्यात येईल 40 केंद्रीय मंत्री या प्रवास योजनेत सहभागी होऊन दिल्लीतला मंत्री गल्लीत या योजनेअंतर्गत सहभागी झालेले दिसणार आहेत असेही तावडे यावेळी म्हणाले

काँग्रेस ला झटका ; राहुल गांधी यांची खासदारकी रद्द ; मोठी बातमी;

वेध माझा ऑनलाइन - मोदी आडनावाविरोधात वादग्रस्त विधान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात मधील सुरत कोर्टाकडून २ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती, त्यामुळे आता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्यावर ही मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. त्यानंतर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

Thursday, March 23, 2023

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांची हकालपट्टी, ‘या’ ज्येष्ठ नेत्याची नेतेपदी निवड

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर संसदीय नेतेपदी खासदार गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून महिती दिली. संजय राऊतांना संसदीय नेतेपदावरुन हटवून शिंदे यांनी ठाकरे गटला मोठा धक्का दिला आहे.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष टोकला गेला आहे. यातच निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्याने यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरुन ठाकरे गट आक्रमक झाला असून खासदार संजय राऊत हे सातत्याने शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. यावरुन शिंदे गटाच्या आमदारांनी पलटवार करताना राऊतांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी असे म्हटले आहे. त्यातच आता संजय राऊतांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

लोकसभेतील 18 पैकी 13 खासदार शिंदे गटात सामिल झाले आहेत.त्यामुळे शिंदे गटाकडून संसदेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी खासदार राहुल शेवाळे यांची यापूर्वीच नियुक्ती केली आहे.आता खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी केली असून त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती केली आहे.दरम्यान यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच राहुल शेवाळे यांनी पत्रकारांना तशी माहिती दिली होती.त्यानुसार, गुरुवारी ही निवड करण्यात आली आहे.

राहुल गांधी दोषी, दोन वर्षांची शिक्षा ; काय आहे प्रकरण ?


वेध माझा ऑनलाइन -  राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेली टीका महागात पडली आहे. मोदी आडनावावरून अपमान केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या खटल्यात राहुल गांधींना सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरविले आहे. 

राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा प्रचारावेळी मोदींवर टीका करताना सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असा सवाल केला होता. याविरोधात गुजरातमधील मोदी समाजाने राहुल गांधींवर खटला दाखल केला होता. सुरतच्या सीजेएम कोर्टाने सकाळी ११ वाजता आपला निर्णय दिला आहे. 
राहुल गांधी आज या कोर्टात पोहोचले होते. यावेळी कोर्टाने राहुल गांधींना तुम्हाला यावर काही सांगायचे आहे का असे विचारले. यावेळी राहुल यांनी मी नेहमी भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. मी कोणाच्या विरोधात मुद्दामहून बोललो नाही. यामुळे कोणाला नुकसान झालेले नाही, असे सांगितले. सुरतच्या जिलल्हा सत्र न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. 
या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने आयपीसीच्या कलम ५०४ अन्वये मानहानीच्या आरोपाखाली दोषी ठरवले. आयपीसीच्या कलम ५०४ मध्ये दोषी आढळल्यास दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. न्यायालयाने निर्णय जाहीर केला असून राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर राहुल यांना लगेचच जामिनही दिला आहे.

Wednesday, March 22, 2023

"त्या' रात्री मदन कदमसह कुटुंबाला मारहाण ; 10 जणांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; मदन कदम याचा मुलगा गौरव कदम याने दिली फिर्याद ;

वेध माझा ऑनलाईन - पाटण तालुक्यात शिंद्रुकवाडीमध्ये रविवारी रात्री ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत याच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी पोलिसांनी मदन कदम याला अटक केली आहे. मात्र, त्या रात्री कदमसह कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती. आणि या प्रकरणी आता 10 जणांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मदन कदम याचा मुलगा गौरव कदम याने फिर्याद दिली आहे. 

दरम्यान,  गौरव कदम याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, रविवारी रात्री कारची काच फोडल्याचा राग मनात धरून आठ वाजण्याच्या सुमारास श्रीरंग जाधव यांच्यासह दहाजण घराच्या कंपाउंडमधून आत घुसले. त्यांनी वडील मदन कदम, भाऊ योगेश कद6म व मला लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान माजी नगरसेवक मदन कदम याचा मुलगा गौरव कदम याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी श्रीरंग जाधव यांच्यासह अनोळखी नऊजणांचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास पाडळे करीत आहेत.दरम्यान ज्या बंदुकीतून गोळीबार केला, ती बंदूक पोलिसांनी जप्त केली आहे. झाडलेल्या गोळ्यांपैकी तीन गोळ्या श्रीरंग जाधव व सतीश सावंत यांना लागल्या. कदम याने बारा बोअरच्या बंदुकीतून गोळीबार केला होता. तसेच ज्या बंदुकीतून गोळीबार केला त्या बंदुकीचा परवाना असल्याचेही तपासातून समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’ धोक्यात ?निवडणूक आयोगाकडून फेरविचार सुरू

वेध माझा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा निवडणूक आयोगाकडून फेरविचार करत असल्याची बाब समोर आली आहे. मंगळवारी आयोगासमोर पक्षाच्या वतीने बाजू देखील मांडण्यात आली.  प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे वकील सुनावणीला हजर असल्याची  माहिती सूत्रांनी दिली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवावा का याबाबत सध्या निवडणूक आयोगाकडून चाचपणी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच आयोगाच्या कार्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देखील आपलं म्हणण मांडण्यासाठी बोलावण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार स्वतः राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे आयोगाच्या कार्यालयातून जाऊन आले आहेत 
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक आयोगाने सध्या राष्ट्रीय दर्जा कायम ठेवण्यासाठी फेरआढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती करण्यात आल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबतच निवडणूक आयोगाच्यावतीने याआधी मायावती यांचा बसप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनाही 2019 साली निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्या वर्षीचा लोकसभा निवडणुकीतील संबंधित पक्षाची कामगिरी पाहता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेऊ नये असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.  या संपूर्ण प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार असल्याच्या बातम्या धुडकावून लावल्या आहेत. तसेच प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात गेलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची आणि निवडणुक आयोगातील अधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाली असून पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा अबाधित राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य महाराष्ट्रासह नागालँड, केरळ आणि झारखंड या राज्यात  आहेत. तसेच निवडणूक आयोगाने घातलेल्या अटी शर्थी पूर्ण करत असल्यामुळे आम्हांला अडचण नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे.  मात्र आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतोय याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.


कराडमध्ये शंभू स्मारकाच्या बांधकामास प्रारंभ ; शहर व परिसरातील शिवशंभूप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती ;

वेध माझा ऑनलाईन - येथील शंभू तीर्थावर स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या बांधकामाचा प्रत्यक्ष शुभारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करवडीचे मठाधिपती विजयलिंग महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक, शिवशंभूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे, अशी कराडकर नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आता पूर्णत्वास जात आहे. या स्मारकासाठी स्थापन झालेल्या स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीने सचिव रणजितनाना पाटील यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुरावामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या स्मारकासाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. निधी मंजूर झाल्यानंतर या स्मारकाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज प्रत्यक्ष स्मारकाच्या बांधकामास प्रारंभ झाला. या कामाची मदत सुमारे दोन वर्षे आहे. या माध्यमातून राज्यातील भव्य स्मारक कराडला उभारण्यात येणार आहे. आज शंभुतीर्थावर मठाधिपती विजयलिंग महाराज यांच्या हस्ते बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी सौ. रूपाली तोडकर व प्रमोद तोडकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. गुढी उभारण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पिसाळ याही यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमास स्मारक समितीचे  सचिव रणजितनाना पाटील, तसेच घनःश्याम पेंढारकर, एकनाथ बागडी, राजेंद्र माने, राजेंद्रआबा यादव, शिवराज इंगवले, मुकुंद चरेगावकर,महादेव पवार, विष्णू पाटसकर, समितीचे सर्व सदस्य, माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, शहर व तालुक्यातील शिवशंभूप्रेमी तसेच कराड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.