Wednesday, March 22, 2023

"त्या' रात्री मदन कदमसह कुटुंबाला मारहाण ; 10 जणांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; मदन कदम याचा मुलगा गौरव कदम याने दिली फिर्याद ;

वेध माझा ऑनलाईन - पाटण तालुक्यात शिंद्रुकवाडीमध्ये रविवारी रात्री ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत याच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी पोलिसांनी मदन कदम याला अटक केली आहे. मात्र, त्या रात्री कदमसह कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती. आणि या प्रकरणी आता 10 जणांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मदन कदम याचा मुलगा गौरव कदम याने फिर्याद दिली आहे. 

दरम्यान,  गौरव कदम याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, रविवारी रात्री कारची काच फोडल्याचा राग मनात धरून आठ वाजण्याच्या सुमारास श्रीरंग जाधव यांच्यासह दहाजण घराच्या कंपाउंडमधून आत घुसले. त्यांनी वडील मदन कदम, भाऊ योगेश कद6म व मला लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान माजी नगरसेवक मदन कदम याचा मुलगा गौरव कदम याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी श्रीरंग जाधव यांच्यासह अनोळखी नऊजणांचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास पाडळे करीत आहेत.दरम्यान ज्या बंदुकीतून गोळीबार केला, ती बंदूक पोलिसांनी जप्त केली आहे. झाडलेल्या गोळ्यांपैकी तीन गोळ्या श्रीरंग जाधव व सतीश सावंत यांना लागल्या. कदम याने बारा बोअरच्या बंदुकीतून गोळीबार केला होता. तसेच ज्या बंदुकीतून गोळीबार केला त्या बंदुकीचा परवाना असल्याचेही तपासातून समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment