वेध माझा ऑनलाइन - मी आणि पंकजा मुंढे भाजपमध्ये नाराज होतो हा चुकीचा समज आहे मी नाराज असतो तर कुठेतरी तसे आलेही असते मात्र, तसे काहीच नाही मी राज्यात मंत्री होतो आणि सध्या पक्षाचा पदाधिकारी आहे ही अडजेस्टमेंट नाही तर आमच्या पक्षात जो आदेश दिला जातो त्याचे पालन केले जाते अशी पद्धत आहे असा खुलासा भाजप चे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे बोलणे वागणे राजकीय ड्रीष्टीने परिपक्व नसल्याचेही विधान तावडे यांनी यावेळी केले
केंद्राच्या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत सातारा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी कराड येथे आले असता कराडच्या सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
भाजपचे राज्याचे पदाधिकारी डॉ अतुल भोसले विक्रम पावसकर तसेच कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ धैर्यशील कदम मनोज घोरपडे यांच्यासह शहर अध्यक्ष एकनाथ बागडी तसेच अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्ते आणि सातारा लोकसभा प्रवास समितीचे जिल्ह्याचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते
ते पुढे म्हणाले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात हिंदुत्व आणले मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडीला लावून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व संपवण्यासाठी प्रयत्न केले त्यांना लोक स्वीकारणार नाहीत शिवसेनेने सोडलेले हिंदुत्व व त्यामुळे त्यांच्यापासून लांब गेलेली 8 टक्के हिंदूत्वाची मते भाजप मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे असेही ते म्हणाले मनसे बरोबर भाजपची युती होण्याची शक्यता तावडे यांनी फेटाळून लावली
भाजप ने आता लोकसभा प्रवास योजना राबवण्यास सुरुवात केली आहे राज्यातील 48 पैकी 18 लोकसभा मतदार संघात याची प्रत्यक्ष अमलबजावणी सुरु झाली आहे पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या गरीब कल्याणकारी योजना किती लोकांपर्यंत पोचल्या याचा याद्वारे आढावा घेण्यात येणार आहे तसेच त्या त्या राज्यात बद्दललेली राजकीय समीकरणे याबाबतचा ही आढावा यातून घेण्यात येईल 40 केंद्रीय मंत्री या प्रवास योजनेत सहभागी होऊन दिल्लीतला मंत्री गल्लीत या योजनेअंतर्गत सहभागी झालेले दिसणार आहेत असेही तावडे यावेळी म्हणाले
No comments:
Post a Comment