Sunday, February 18, 2024

अजित पवारांनी ३ वेळा शब्द फिरवून आमच्या पाठीत खंजीर खुपसला ; अंकिता पाटील यांनी दिला इशारा ;

वेध माझा ऑनलाईन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंड केल्यानंतर बारामती लोकसभेवर दावा केला आहे. त्यामुळे बारामतीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार उमेदवार देणार हे तर नक्की आहे. त्यादृष्टीने अजितदादा बारामतीत जाऊन बारामतीकराना भावनिक आवाहन सुद्धा करत आहेत. मात्र त्याच दरम्यान आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी अजितदादांना निवडणुकीपूर्वीच थेट इशारा दिला आहे. अजित पवारांनी ३ वेळा शब्द फिरवून आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यामुळे जे आमचे विधानसभेला काम करतील त्यांचेच आम्ही लोकसभेला काम करू असा इशारा अंकिता पाटील यांनी दिला आहे.

अंकिता पाटील म्हणाल्या, आम्ही यापूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत होतो आणि आता महायुतीत एकत्र आहोत. मागच्या तिन्ही वेळेस अजित पवार यांनी आम्हाला शब्द देऊन फिरवला आहे. त्यांनी आमची फसवणूक केली आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे जे आमचे विधानसभेला काम करतील त्यांचेच आम्ही लोकसभेला काम करू असा इशारा अंकिता पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात.

नेमका विषय काय? 
खरं तर इंदापूरच्या विधानसभा जागेवरून अजित पवार पाटील यांच्यात वितुष्ट आलं होते. इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभेच्या अंतर्गत येतो. यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये हर्षवर्धन पाटील आघाडीधर्म पाळून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंना निवडणुकीसाठी मदत करायचे, मात्र लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका येताच अजित पवार त्याठिकाणी त्यांचा उमेदवार उभा करत होते. २०१४ आणि २०१९ च्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी दत्तात्रय भरणे याना विधानसभेचं तिकीट देऊन हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात उभे केलं होते. दोन्ही वेळा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. आता अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे महायुतीत आहेत, त्यामुळे इंदापूर विधानसभेच्या जागेचा पेच पुन्हा उभा राहणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अंकिता पाटील यांनी अजित पवार याना थेट इशारा दिला आहे.

Saturday, February 17, 2024

शिवसेना का सोडली…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात दिले कारण...

वेध माझा ऑनलाईन | आज बाळासाहेब असते तर राम मंदिर पूर्ण होताना आणि कलम ३७० हटवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतूक केले असते. परंतु जे वारसा सांगता आहेत, त्यांनी एकही शब्दही उच्चारले नाही. यामुळे हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही.महाविकास आघाडीत असताना बाळासाहेबांचे विचार मरु लागले होते. शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले होते. नेतृत्व चुकत असल्याचे लक्षात आले होते. मग बाळासाहेबांची भूमिका मांडण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले. आमचे पाऊल जर चुकले असते तर ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष जनतेने केला नसता. तुम्ही देखील इतक्या मोठ्या संख्येने येथे आला नसता, असे शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी शिवसेनेच्या अधिवेशनात बोलताना सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर घाणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

ते म्हणाले...
आज बाळासाहेब असते तर राम मंदिर पूर्ण होताना आणि कलम ३७० हटवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतूक केले असते. परंतु जे वारसा सांगता आहेत, त्यांनी एकही शब्दही उच्चारला नाही. यामुळे हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही. तुमच्याकडे असतो तो पर्यंत तो व्यक्ती चांगला असतो. परंतु गेल्यावर तो कचरा होतो. तो गद्दर होतो. आता एकेदिवशी हा महाराष्ट्र तुम्हाला कचरा केल्याशिवाय राहणार नाही, असा घाणाघात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. आज त्यांनी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला.

…मग लोकांचे हे प्रेम मिळाले नसते
आम्ही अनेक ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी रात्रीअपरात्री हजारो लोक स्वागतासाठी येतात. लोकांचे हे प्रेम कामातून, वागण्यातून मिळाले आहे. आम्ही चुकीचे केले असते तर लोकांचे हे प्रेम मिळाले नसते. बाळासाहेबांनी सांगितले होते काँग्रेससोबत जाण्यापेक्षा माझे दुकान बंद करेल. मग आज त्याच काँग्रेससोबत तुम्ही बसला आहात. आता तुमचे हिंदुत्व कुठे गेले? सावरकरांचा अपमान केला तेव्हा कुठे गेले तुमचे हिंदुत्व? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात करताना लवकरच आपण सर्वांना अयोध्येत घेऊन जाणार असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे अधिवेशन कालपासून सुरु आहे. अनेक विषयांना या अधिवेशनातून चालना देण्यात आली. कोल्हापूर शहरात भगवे वातावरण झाले आहे. शिवसेना ही कुणाची आहे, हे शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी उद्योजकांसाठी सर्व ठराव आपण करुन घेतले.

आरशामध्ये त्यांनी स्वतःला पहावे. स्वतःचे कर्तुत्व आरशात पहावे. किती मुकुटे घालून फिरणार तुम्ही? हे कधी लपत नाहीत. या गोष्टी सगळ्या बाहेर येत असतात. बाळासाहेबांचा वारसा सांगण्यासाठी तोंडात नाही तर मनगटात जोर असावा लागतो. ताकत असावी लागते. ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केले. पाकिस्तानची मॅच होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियम तोडून टाकलं ही शिवसेना कार्यकर्ते होते.शिवसेना अशीच मोठी झाली नाही. त्यासाठी रक्ताचे पाणी केले लोकांनी. घरावर तुळशीपत्र ठेवले.
आज बाळासाहेब असते तर राम मंदिर पूर्ण होताना आणि कलम ३७० हटवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतूक केले असते. परंतु जे वारसा सांगता आहेत, त्यांनी एकही शब्दही उच्चारले नाही. यामुळे हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही.

शिवसेना का सोडली...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले कारण
Follow us
google-news-icon
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 17, 2024 | 3:09 PM
कोल्हापूर, दि. 17 फेब्रुवारी 2024 | महाविकास आघाडीत असताना बाळासाहेबांचे विचार मरु लागले होते. शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले होते. नेतृत्व चुकत असल्याचे लक्षात आले होते. मग बाळासाहेबांची भूमिका मांडण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले. आमचे पाऊल जर चुकले असते तर ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष जनतेने केला नसता. तुम्ही देखील इतक्या मोठ्या संख्येने येथे आला नसता, असे शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी शिवसेनेच्या अधिवेशनात बोलताना सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर घाणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.


बाळासाहेबांनी मोदींचे कौतूक केले असते
आज बाळासाहेब असते तर राम मंदिर पूर्ण होताना आणि कलम ३७० हटवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतूक केले असते. परंतु जे वारसा सांगता आहेत, त्यांनी एकही शब्दही उच्चारला नाही. यामुळे हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही. तुमच्याकडे असतो तो पर्यंत तो व्यक्ती चांगला असतो. परंतु गेल्यावर तो कचरा होतो. तो गद्दर होतो. आता एकेदिवशी हा महाराष्ट्र तुम्हाला कचरा केल्याशिवाय राहणार नाही, अशा घाणाघात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. आज त्यांनी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला.

…मग लोकांचे हे प्रेम मिळाले नसते
आम्ही अनेक ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी रात्रीअपरात्री हजारो लोक स्वागतासाठी येतात. लोकांचे हे प्रेम कामातून, वागण्यातून मिळाले आहे. आम्ही चुकीचे केले असते तर लोकांचे हे प्रेम मिळाले असते. बाळासाहेबांनी सांगितले होते काँग्रेससोबत जाण्यापेक्षा माझे दुकान बंद करेल. मग आज त्याच काँग्रेससोबत तुम्ही बसला आहात. आता तुमचे हिंदुत्व कुठे गेले? सावरकरांचा अपमान केला तेव्हा कुठे गेले तुमचे हिंदुत्व? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

कुटुंबात मी एकटा पडलोय अस म्हणत अजित पवार लोकांची सहानुभूती घेत आहेत ; ...बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखतात, आम्हाला भावनात्मक अपील करण्याची गरज नाही ; शरद पवार यांचा पुन्हा हल्लाबोल ;

वेध माझा ऑनलाईन। विरोधकांकडून ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते, त्यांची भाषणं पाहता बारामतीचे लोक नोंद घेतील, असे म्हणत शरद पवार यांनी बारामतीमधील अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळाव्यातून अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे
आम्ही भावनात्मक अपील करण्याचं कारण नाही. कारण बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखत आहेत. त्यामुळे आम्हाला भावनात्मक अपील करण्याची गरज नाही. पण विरोधकांकडून ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते, त्यांची भाषणं पाहता बारामतीचे लोक नोंद घेतील, असे म्हणत शरद पवार यांनी बारामतीमधील अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळाव्यातून अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. 
पुढे ते असेही म्हणाले की, उमेदवार कोणी असला तरी निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा अधिकार आहे. पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या मागे आहेत, आणि मीच एकटा आहे, असं भासवणं म्हणजेच लोकांना भावनिक करण्यासारखं आहे. लोकांची सहानुभूती मिळवण्याचं काम असल्याचे म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. अजित पवार यांनी आपल्याला परिवारात एकटं पाडण्यात आल्याची भावना व्यक्त करत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता.

 



डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून रस्ते सुधारणेसह शाळा दुरुस्तीसाठी निधी मंजूर ; कालवडे येथे १५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन ;

वेध माझा ऑनलाईन। कालवडे (ता. कराड) येथे राज्य शासनाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून अंतर्गत रस्ता सुधारणेसाठी १० लाख रुपये आणि जिल्हा परिषद शाळा दुरूस्तीसाठी ५ लाख रुपये असा एकूण १५ लाख रुपयांचा विकासनिधी उपलब्ध झाला आहे. या विकासकामांचे भूमिपूजन डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णू थोरात होते. 

याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, दत्तात्रय देसाई, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद पाटील, बाबुराव यादव, हर्षवर्धन मोहिते, पैलवान दादासाहेब थोरात, उपसरपंच शुभम थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खात्याने व ग्रामविकास खात्याने कराड दक्षिण मतदारसंघात कोट्यवधींचा निधी दिला आहे. या विकासनिधीतून रस्ते, पूल अशी अनेक कामे मार्गी लागत आहेत. राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे कराड दक्षिण मतदारसंघाच्या विकासाकडे विशेष लक्ष असून, येत्या काळातही जास्तीत जास्त विकासनिधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यातून कालवडे गावातील विविध विकासकामांसाठीदेखील मोठा निधी देण्याची ग्वाही डॉ. भोसले यांनी दिली.

यावेळी दिनकर थोरात, धनाजीराव थोरात, उदयसिंह थोरात, रविराज थोरात, बालिश थोरात, विलास देसाई यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय सेटलमेंट करून घेतला ; शरद पवारांचा हल्लाबोल ;

वेध माझा ऑनलाईन। पक्ष, चिन्ह काढून घेणे हा आमच्यावर अन्याय आहे. पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला. माध्यमांशी बोलताना त्यांनी विधानसभा अध्यक्ष तसेच अजित पवार गटावर हल्ला चढवला.

काय म्हणाले शरद पवार ?
सेटलमेंट करून पक्ष, चिन्ह देण्यात आलंय. असा निर्णय होईल याची खात्री होती. त्याचं कारण विधानसभा अध्यक्षांना, पदाला जी प्रतिष्ठा आहे ती त्यांनी ठेवली नाही. ते ठेवतील असं वाटत नव्हतं. त्या प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला. दोन्ही बाजूने अशा प्रकारचा निर्णय त्यांनी शिवसेनेबाबत घेतला होता. त्याच निर्णयाची पुनरावृत्ती त्यांनी केलीय. पण पक्ष आणि चिन्ह याबाबतची भूमिका निवडणूक आयोगाने घेतली किंवा सभापतींनी घेतली, आमच्या मते ही संस्था न्याय देणारी आहे. पण पदाचा गैरवापर कसा होतो त्याचं उदाहरण यातून दिसलं. त्याला पर्याय फक्त सुप्रीम कोर्ट आहे. आम्ही कोर्टात याचिका दाखल केली आहे. निवडणुका जवळ आल्यात तुम्ही लवकर निर्णय घ्या अशी विनंती आहे .

राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली हे देशाला माहीत आहे
आतापर्यंत अनेक निर्णय झाले. पण पक्ष आणि चिन्ह दुसऱ्यांना देणं हे घडलं नाही. राष्ट्रवादीची स्थापना कुणी केली हे जगाला माहीत आहे. हे माहीत असताना पक्ष इतरांच्या हाती देणं हा अन्याय करणारा निर्णय आहे. त्यामुळे आमच्यासमोर सुप्रीम कोर्टाशिवाय पर्याय नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. अनेक लोकांनी मेळाव्यातून सभातून दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसात मिळतील हे जाहीर केलं होतं. तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की सेटिंग करून निर्णय घेतले जातील. आपल्यावर अन्याय होणारे निर्णय होतील. पक्षाला पुढची तयारी केली पाहिजे, त्यासाठी आम्ही वरच्या कोर्टात गेलो.


Friday, February 16, 2024

‘…तर मीच विधानसभा निवडणूक लढणार नाही’; अजित पवारांनी बारामतीकरांना टाकलं कोड्यात! माझी शेवटची निवडणूक असे म्हणून काहीजण मत मागतील, त्याला भुलू नका ; शरद पवारांवर केली टीका

वेध माझा ऑनलाईन। वास्तविक हा निकाल निवडणूक आयोगाने दिला. विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला. कागदपत्र काय आहेत यावर निकाल लागतो. खऱ्याचा, सत्याचा निकाल लागतो. हा निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारला आहे. आम्ही ऊतमात केला नाही. ही परिस्थिती यायला नको होती, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. इंडिया आघाडी काढली, पण राहिली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

माझी शेवटची निवडणूक आहे, असं म्हणून काही लोक तुम्हाला मतदान मागतील. पण त्यांचं ऐकू नका. त्यांना भुलू नका, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला होता. मात्र, अजित पवार यांनीच खुद्द आज मतदारांना सर्वात मोठं आवाहन केलं आहे. आम्ही जो उमेदवार देऊ त्याला विजयी करा. नाही तर उद्या मी विधानसभेला उभा राहणार नाही. मलाही माझे उद्योग आणि प्रपंच पडले आहेत. तुम्हीच जर मला साथ देणार नसाल तर काय?, असा सवालच अजित पवार यांनी केला. तेव्हा कार्यकर्त्यांमधून एकच वादा, अजितदादा असा नारा देण्यात आला. त्यावर अजितदादांनी हे मतपेटीतही दिसू द्या, असं आवाहन केलं. मात्र, अजितदादा यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांशी संवाद साधताना ही साद घातली आहे. आता मला ही बघायचं आहे. बारामती भावनेच्या पाठीशी उभे राहती की विकासाच्या मागे उभी राहते. बारामतीची आता खरी कसोटी आहे. जोपर्यंत महायुती एकत्र बसून कोण जागा लढणार हे ठरणार नाही तोपर्यंत उमेदवार जाहीर करत येणार नाही. आम्ही लवकरच बसू. तुम्ही एकमेकांशी संपर्क ठेवा. ज्यांना माझ्या बरोबर राहायचं आहे त्यांनी माझ्या बरोबर रहा. दबावात कोणी राहू नका, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
जेव्हा कोणाला अजित पवारांची गरज पडेल तेव्हा सांगतो अजित पवार काय ते, असा इशाराही अजितदादांनी यावेळी दिला. जर तुम्ही राष्ट्रवादी हे एक घर समजता तर मी अध्यक्ष झालो तर काय झालं? कोणी कोणाच्या पोटी जन्माला यावं हे माझ्या हाती आहे काय? मला माझ्या कुटुंबाने एकटं पाडलंय. तुम्ही पडू देऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं.