Saturday, February 17, 2024

कुटुंबात मी एकटा पडलोय अस म्हणत अजित पवार लोकांची सहानुभूती घेत आहेत ; ...बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखतात, आम्हाला भावनात्मक अपील करण्याची गरज नाही ; शरद पवार यांचा पुन्हा हल्लाबोल ;

वेध माझा ऑनलाईन। विरोधकांकडून ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते, त्यांची भाषणं पाहता बारामतीचे लोक नोंद घेतील, असे म्हणत शरद पवार यांनी बारामतीमधील अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळाव्यातून अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे
आम्ही भावनात्मक अपील करण्याचं कारण नाही. कारण बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखत आहेत. त्यामुळे आम्हाला भावनात्मक अपील करण्याची गरज नाही. पण विरोधकांकडून ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते, त्यांची भाषणं पाहता बारामतीचे लोक नोंद घेतील, असे म्हणत शरद पवार यांनी बारामतीमधील अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळाव्यातून अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. 
पुढे ते असेही म्हणाले की, उमेदवार कोणी असला तरी निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा अधिकार आहे. पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या मागे आहेत, आणि मीच एकटा आहे, असं भासवणं म्हणजेच लोकांना भावनिक करण्यासारखं आहे. लोकांची सहानुभूती मिळवण्याचं काम असल्याचे म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. अजित पवार यांनी आपल्याला परिवारात एकटं पाडण्यात आल्याची भावना व्यक्त करत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता.

 



No comments:

Post a Comment