Saturday, February 17, 2024

डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून रस्ते सुधारणेसह शाळा दुरुस्तीसाठी निधी मंजूर ; कालवडे येथे १५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन ;

वेध माझा ऑनलाईन। कालवडे (ता. कराड) येथे राज्य शासनाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून अंतर्गत रस्ता सुधारणेसाठी १० लाख रुपये आणि जिल्हा परिषद शाळा दुरूस्तीसाठी ५ लाख रुपये असा एकूण १५ लाख रुपयांचा विकासनिधी उपलब्ध झाला आहे. या विकासकामांचे भूमिपूजन डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णू थोरात होते. 

याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, दत्तात्रय देसाई, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद पाटील, बाबुराव यादव, हर्षवर्धन मोहिते, पैलवान दादासाहेब थोरात, उपसरपंच शुभम थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खात्याने व ग्रामविकास खात्याने कराड दक्षिण मतदारसंघात कोट्यवधींचा निधी दिला आहे. या विकासनिधीतून रस्ते, पूल अशी अनेक कामे मार्गी लागत आहेत. राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे कराड दक्षिण मतदारसंघाच्या विकासाकडे विशेष लक्ष असून, येत्या काळातही जास्तीत जास्त विकासनिधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यातून कालवडे गावातील विविध विकासकामांसाठीदेखील मोठा निधी देण्याची ग्वाही डॉ. भोसले यांनी दिली.

यावेळी दिनकर थोरात, धनाजीराव थोरात, उदयसिंह थोरात, रविराज थोरात, बालिश थोरात, विलास देसाई यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment