Tuesday, November 11, 2025

भाजप व शिवसेना एकमेकासमोर येऊन लढणार ; 31 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष असे 32 जण निवडून आणण्याचा कराडच्या भाजपच्या मेळाव्यात संकल्प ; कराड नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापू लागले...

वेध माझा ऑनलाईन
आमच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या आणि मित्र पक्षांच्या मागण्या यांचा मेळ कसा घालायचा हा आमच्यापुढे मोठा प्रश्न आहे... तो नाही सुटला तर आम्ही भाजप म्हणूनच लढणार असल्याचे सांगत भाजप स्वबळावर लढणार... असे आमदार डॉ अतुल भोसले यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत... दरम्यान 31 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असे  32 जण भाजप चे निवडून आणायचे असा निर्धार व संकल्प आजच्या भाजप च्या मेळाव्यात करण्यात आला... म्हणजेच शिवसेना आणि भाजप या निवडणुकीत  एकमेकांसमोर येऊन लढणार हे आता स्पष्ट झाले आहे

कराडमधील विठ्ठल चौकातील बाबूभाई पदमसी हॉल याठिकाणी आज भाजप चा मेळावा पार पडला या मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते

यावेळी आमदार डॉ अतुल भोसले म्हणाले... भाजप च्या माध्यमातून कराड शहरासाठी व परिसरासाठी भरगोस निधी आला आहे त्यातून शहरातील पाणी रस्ते वीज तसेच भविष्यातील शहरातील अनेक अडचणी दूर होऊन शहर विकसनशील होण्यासाठी मदत होणार आहे...कराड शहर झोपडपत्तीमुक्त करण्याचे माझे स्वप्न आहे...कराडचे स्टेडियम लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले 
कराडच्या निवडणुकीतून भाजपचा नगराध्यक्ष निवडून द्यायचा व सर्व नगरसेवक निवडून आणण्याबाबत या मेळाव्यात संकल्प करण्यात आला

दरम्यान नगराध्यक्षपदासाठी अण्णा पावसकर, जयवन्त पाटील अरुण जाधव  अतुल शिंदे व बंडा काका डूबल हे इच्छुक आहेत असे त्यांनी सांगितले

यावेळी शहर अध्यक्ष सौ सुषमा लोखंडे
विक्रम पावसकर, अरुण जाधव शिवाजी पवार तात्या स्मिता हुलवान माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, रोहिणी शिंदे इंद्रजित गुजर सुहास जगताप आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक अतुल शिंदे यांनी केले
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली
मेळाव्यास शहरातील युवा तसेच महिलावर्गासह व्यापारीवर्ग भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व इच्छुक नगरसेवक तसेच पदाधिकारी कार्यकर्ते महिला व युवावर्ग खूपच मोठ्या संख्येने उपस्थित होता



Monday, November 10, 2025

आजच्या कराडातील भाजपच्या मेळाव्यात आमदार अतुल भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे राजकीय भूकम्प होणार का ?

वेध माझा ऑनलाईन।
आज सायंकाळी 5 वाजता भाजप ने आपल्या पक्षाचा मेळावा आयोजित केला असल्याचे काल पक्ष कार्यालयातून सांगण्यात आले आहे या मेळाव्यात भाजप आपली निवडणुकीतील भूमिका आज स्पष्ट करेल आणि भाजप आपला नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार देखील आज जाहीर करेल आणि हे होत असताना आज शहरातील उरलेल्या महत्वाच्या नेत्यांचे पक्ष प्रवेश होतील का? आणि डॉ अतुल भोसले यांनी संगीतल्याप्रमाणे गावच्या राजकारणात आज भूकम्प होईल का ? अशी गावात चर्चा सुरू आहे

आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाचे गावात न भूतो न भविष्यती असे राजकीय वातावरण झाले आहे... जो तो भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहे... यापूर्वी बरेच दिगग्ज पुढार्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून अतुल भोसले यांचे हात बळकट केले आहेत...
 त्याच पार्शवभूमीवर आमदार अतुल भोसले काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की... आजपर्यंत शहराच्या राजकारणात धक्के दिले आता कराडच्या राजकारणात भूकम्प करणार...त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय? याबद्दल शहरात जोरात चर्चा असतानाच आज भाजप ने आयोजित केलेल्या मेळाव्यात त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ कळेल का ? म्हणजेच  आमदार अतुल भोसले यांनी गेले महिनाभर ज्याप्रमाणे गावात आपल्या नेतृत्वाखाली अनेक पक्ष प्रवेश करून घेतले त्याचप्रमाणे काही पक्षप्रवेश मागे ठेवले आहेत अशी चर्चा आहे...ते पक्षप्रवेश करूनच ते आज शहरात भूकम्प करणार आहेत... असे बोलले जात आहे... तो भूकम्प आज त्यांच्या मेळाव्यात होणार का?... अशी चर्चा आहे.. आणि यानिमित्ताने या मेळाव्यात कोण, कोण प्रवेश करणार ? याबाबतही शहरात चर्चा आहे

Sunday, November 9, 2025

राजेंद्रसिह यादव शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचेे उमेदवार म्हणून जाहीर ; संपर्क प्रमुख शरद कणसे यांनी केली घोषणा ; ही निवडणूक शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असल्याचे झाले स्पष्ट ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने कराडचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून राजेंद्रसिह यादव यांच्या नावाची घोषणा काल करण्यात आली शिवसेनेच्या वतीने जाहीर मेळाव्यात संपर्क प्रमुख शरद कणसे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली एकूणच यानिमित्ताने शिवसेना ही निवडणूक स्वतंत्रपणे लढणार हे काल स्पष्ट झाले...
दरम्यान... मला या निवडणुकीत अडचणीत आणले, खिंडीत गाठले अशा चर्चा सुरू आहेत पण लक्षात ठेवा... मी सिह आहे...आणि सिह जंगलाचा राजा असतो...मला अडचणीत आणण सोपं नाही...संघर्ष पाचवीला पूजलाय...आणि लढणं रक्तात आहे.. श्वासात श्वास असे पर्यंत धनुष्यबाणासाठी लढणार...असे सांगत राजेंद्र यादवांनी शिवसेनेच्या मेळाव्यात सिहगर्जना करत... कारभारी चांगला असेल तर शहराचा कारभार चांगला होतो असे सांगितले शहराला कोणा विदुषकाच्या  हातात देऊ नका, शहराचा विकास नाही तर शहराची सर्कस होईल असा टोलाही त्यांनी लगावला.
ते म्हणाले 56 सालापर्यंत कराडला पाण्याची टंचाई येणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे यापूर्वी शहरासाठीच्या अनेक सुविधांचा विचार करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भरगोस निधी आणत शहराचा विकास साधला आहे यापुढेही विकासाची गंगा पुढे न्यायची आहे त्यासाठी सर्वांनी सज्ज रहा

संपर्क प्रमुख कणसे म्हणाले...
राजेंद्रसिह यादव यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी शहराच्या विकासासाठी 100 कोटी मागितले होते मात्र एकनाथ शिंदे यांनी 209 कोटी या शहराला दिले आमची भाजप बरोबर युतीसाठी चर्चा सुरू आहे परंतु युती झाली नाही तर मात्र आपल्या ताकदीवर ही निवडणूक आपण लढायला तयार आहोत हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायचे आहे
राजेंद्रसिह यादव हे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत असेही त्यांनी यावेळी जाहीर करून टाकले
यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तसेच शहराध्यक्ष व उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या प्रस्ताविक प्रा सचिन पाटील यांनी केले सुलोचना पवार यांनी आभार मानले


Saturday, November 8, 2025

पत्रकारांना थातुरमातुर उत्तरे देत पत्रकार परिषद गुंडाळण्याचा मनोहरभाऊंचा प्रयत्न ;

वेध माझा ऑनलाईन
मलकपूरचे एकेकाळचे काँग्रेसचे नेते मनोहर शिंदे हे सध्या भाजप शी जवळीक करत असून ते लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे ते पृथ्वीराज चव्हाण याना सोडून देत आता आमदार डॉ अतुल भोसले यांच्याशी जवळीक करताना दिसत आहेत त्यांच्या याच पक्षप्रवेशाच्या पर्शवभूमीवर माहिती देण्यासाठी त्यांनी आज संगम हॉटेल येथे पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे सरळ उत्तर दिले नाही केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली आणि ही पत्रकार परिषद गुंडाळतच संपवली मात्र पत्रकारांनी त्यांची भम्पक उत्तरे ऐकून त्यांना शेवटी चांगलेच सुनावले व्यवस्थित उत्तरे द्यायची असतील तरच पत्रकारांना बोलवा असा सल्लाही त्यांना पत्रकारांनी दिला त्यावेळी याठिकाणी थोडा वादही झाला मात्र त्यांचा राजकीय फायदा होऊ शकतो अशा प्रश्नाची उत्तरे मात्र त्यांनी यावेळी दिली

मनोहर शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा राजकीय वापर करत मलकापुरात आपले राजकीय बस्तान बसवले गेली 20 वर्षे त्यांनी पृथ्वीराजबाबा यांच्या नावावर राज्यभर स्वतःची ओळख करून घेतली... व मलकापूर मध्ये मोठा निधी उपलब्ध करून घेतला त्यामुळे पर्यायाने सातत्याने मलकापूर चा विकास होत गेला... ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल किंवा आता नगरपरिषदेमध्ये मलकापुचे विलीनीकरण झाले आहे हे होण्यासाठी पृथ्वीराजबाबा यांचा मोलाचा वाटा आहे हे कोणीही नाकारणार नाही... मलकापूरचा विकास आणि त्यामागचे कारण नगरपरिषदेच्या माध्यमातून पहायचे झाल्यास त्याचे उत्तर फक्त आणि फक्त पृथ्वीराजबाबा हेच असेल...आज आहे...मात्र हे सगळं आपल्यामुळे झालं आहे असा अविर्भाव दाखवत मनोहर शिंदे यांनी मलकापूरचे सर्वेसरवा आपणच असल्याचे भासवले... मात्र नगरपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस व पृथ्वीराजबाबा याचा वापर करून घेत आपले राजकारण केले अशी चर्चा असते...

सध्या त्यांनी काँग्रेस व पृथ्वीराजबाबा याना सोडचिठी देत ते भाजप च्या संपर्कात आहेत लवकरच ते भाजप मध्ये प्रवेश करतील असेही ठरले आहे... मलकापूर चे नेते आर आबा व प्रशांत चांदे यांनी यापूर्वी मलकापूर मध्ये प्रवेश केला आहे मनोहर शिंदे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांनी प्रवेश केल्याची आजही चर्चा असते... त्यांच्या सह अनेक कार्यकर्ते भाजप मध्ये गेले आहेत त्यामुळे मनोहर शिंदे यांना भाजप प्रवेश करण्याशिवाय आता पर्यायच नाही अशी परिस्थिती आसल्याने ते प्रवेश करत आहेत आशिही मलकापुरात चर्चा आहे...

दरम्यान त्यांच्या याच प्रवेशाच्या पर्शवभूमीवर माहिती देण्यासाठी त्यांनी संगम हॉटेल याठिकाणी पत्रकार परिषद बोलावली होती... 
त्यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारले की...
तुम्हाला पृथ्वीराजबाबा यांनी एवढं भरभरून दिल यरी तुम्ही त्यांना सोडून का चालला आहात?...

यापूर्वी काही दिवसापर्यंत तुम्ही कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट च्या कारभारावर सार्वजनीक टीका करत आले आहात, मग अचानक असे काय झालं की ज्यामुळे तुम्ही कृष्णा च्या डॉ अतुलबाबा यांचे नेतृत्व मान्य करत ज्यांनी आतापर्यंत मदत केली त्या पृथ्वीराजबाबाना सोडून जात आहात?

आर आबा आणि प्रशांत चांदे यांच्यासह अनेकजण तुम्हाला सोडून गेले त्यामुळे नाईलाज म्हणून एकटे पडल्यामुळे आता तुम्ही भाजपमध्ये जात आहात का?

ज्या भाजप-सेनेला तुम्ही घटना बाह्य सरकार असे संबोधत होता त्याच सरकारच्या  घटक पक्षात तुम्ही आता चालला आहात ?...असे का? 

तुम्ही पृथ्वीराजबाबा आणि डॉ अतुलबाबा यांच्यापैकी कोणाला विकासाचा चेहरा मानता?

तुम्ही भाजप मध्ये गेला आणि सत्ता विरोधकांची आली तर मलकापुरच्या विकासासाठी तुम्ही विरोधकांना सहकार्य करणार का?

भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्ही काही अटी घातल्या आहात की विनाअट भाजप मध्ये चालले आहात?

असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले मात्र केवळ थातुरमातुर आणि फालतू उत्तरे देत त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळण्याचा प्रयत्न केला तोही हाणून पाडत पत्रकारांनी त्यांची भम्पक उत्तरे ऐकून शेवटी त्यांना चांगलेच सुनावले व्यवस्थित उत्तरे द्यायची असतील तरच पत्रकारांना बोलवा अशी भम्पक उत्तरे दिली तर आम्ही बातमी काय करायची? असा सवालही पत्रकारांनी त्यांना केला... 
  
राजकीय फायदा होऊ शकतो अशा प्रश्नाची उत्तरे मात्र त्यांनी यावेळी दिली...
एकूणच ही पत्रकार परिषद... पत्रकार आणि मनोहर शिंदे यांच्यात अधूनमधून झालेल्या वादाने वादळी ठरली
 

मलकापूर नगरपरिषद निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीने लढवणार, प्रभागनिहाय चाचपणी सुरु - नामदेवराव पाटील

वेध माझा ऑनलाईन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर झाल्या असून मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीने लढवणार असल्याचे प्रतिपादन कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी व्यक्त केले. मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पक्ष सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्याने मलकापूर शहरात निर्माण झालेल्या आकस्मिक परिस्थितीला सामोरे जात आगामी निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीने लढवणार असून यासाठी मित्र पक्षांसोबत चर्चा करून समन्वयाने निर्णय घेतला जाईल असेही नामदेवराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

मलकापूर शहराचा नियोजनबद्ध विकास हा आदरणीय पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्याच दूरदृष्टीने झालेला आहे. यामध्ये देशभर नावलौकिक मिळवलेली मलकापूरची २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना असेल, ड्रेनेज सुविधा, मलकापूर नगरपरिषदेची सुसज्ज इमारत अंतर्गत रस्ते तसेच याचप्रमाणे शहराचा नियोजनबद्ध विकास अशा अनेक योजना आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून मलकापूर शहरात राबविल्या गेल्या. 

मलकापूरचे आणि पृथ्वीराज बाबांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळे मलकापूर नगरपालिकेची निवडणूक पृथ्वीराज बाबांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष ताकदीने लढेल तसेच मलकापूर शहरात प्रभागनिहाय चाचपणी सुरु असून अनेक इच्छुकांनी पक्षाकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच मलकापूर शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशा परिस्थितीत पक्षाच्या पाठीशी ताकदीने साथ देण्याचे आवाहन सुद्धा यावेळी कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी केले.

Friday, November 7, 2025

काँग्रससाठी महाविकास आघाडीचा पर्याय विचाराधीन ; युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे विधान ; भाजप ला पराभूत करण्याची ताकद काँग्रेसमध्ये... शहराध्यक्ष ऍड अमित जाधव ;

वेध माझा ऑनलाईन।
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाटण कॉलनी येथील निवासस्थानी आयोजित बैठकीत कराड नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची प्रभागनिहाय कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक पार पडली.

बैठकीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, राहुल चव्हाण, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऍड. अमित जाधव, माजी अध्यक्ष ऋतुराज मोरे, माजी नगराध्यक्षा अर्चना पाटील, जेष्ठ नेते विठ्ठलराव शिखरे, माजी नगरसेवक अशोक कोळी, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, सिद्धार्थ थोरवडे, श्रीकांत मुळे, हणमंत घाडगे तसेच पै. अक्षय सुर्वे, ज्ञानदेव राजापूरे, विश्वाजीत दसवंत, साहेबराव शेवाळे, नितीन ओसवाल, जितेंद्र ओसवाल, सुनील शिंदे, शरद गाडे, इरफान सय्यद, डॉ. मधुकर माने, ऍड. इरशाद खैरतखान, विक्रम देशमुख, योगेश लादे आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

शहरातील प्रभागनिहाय काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते
युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, “कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्वबळाची तयारी केली आहे. मात्र, महाविकास आघाडीचा पर्यायही विचाराधीन आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालीच रणनिती आणि अंतिम निर्णय घेतला जाईल.”
बैठकीदरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्याचा आग्रह नोंदवला.
युवानेते इंद्रजीत चव्हाण म्हणाले “कराड शहराने आमच्या चव्हाण कुटुंबावर सदैव प्रेम दाखवले आहे. आपले  नेते व मार्गदर्शक पृथ्वीराज चव्हाण यांनी कधीही सत्तेसाठी नव्हे, तर सेवेसाठी राजकारण केले. त्यांच्या कार्यकाळात पक्षाचा विचार जपत जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.” 
पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण यांनी निवडणुकीसंबंधी तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती दिली.  “कराड शहराने नेहमी काँग्रेसला भरघोस मतदान दिले आहे. आगामी निवडणुकीतही काँग्रेसला निश्चित यश मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 भाजपचा पराभव करण्याची ताकद केवळ काँग्रेस मध्येच-  ऍड. अमित जाधव
काँग्रेस हा समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन जाणारा पक्ष आहे. कराड शहरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक विकास कामे केली असून त्या आधारे निवडणुकीला काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर सामोरे जाण्यासाठी कार्यकर्ते तयार आहेत. कराड नगरपालिका निवडणुकीत भाजप ला पराभूत करण्याची ताकद केवळ काँग्रेस पक्षाकडेच आहे.

बैठकीच्या शेवटी राहुल चव्हाण, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, इरफान सय्यद, शरद गाडे, अक्षय सुर्वे, अमित माने आदींसह अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली मते मांडली. सूत्रसंचालन ऍड. नरेंद्र चिंगळे यांनी केले व आभार जितेंद्र ओसवाल यांनी मानले.

Wednesday, November 5, 2025

कराड पालिका निवडणुकीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर एकत्र येण्याचे बाळासाहेब पाटील यांचे संकेत ;म्हणाले...समविचारी मंडळी बरोबर आली तर गावाच्या विकासासाठी त्यांना बरोबर घेऊन काम करण्याची आमची मानसिकता ;

वेध माझा ऑनलाईन
लोकशाही आघाडी शहरातील सर्व प्रभागमध्ये आपले उमेदवार देण्यास सक्षम आहे याबाबद्दल कोणी मनात शंका बाळगण्याचे कारण नाही मात्र समविचारी मंडळी बरोबर आली तर गावाच्या विकासासाठी त्यांना बरोबर घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे... समविचारी असणार्यांशी आपण चर्चाही करणार असल्याचे सांगत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी या निवडणुकीत जुळवून घेण्याचे संकेत दिले!
शहराच्या शांततामय सहजीवनासाठी "माझं गाव कराड...मी गावासाठी'... ही संकल्पना आपल्याला राबवायची आहे असे आवाहन करत आपण या निवडणुकीत तरुणांना संधी देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले 

कराड पालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे त्या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी सायंकाळी 6 वाजता सारडा लॉन याठिकाणी लोकशाही आघाडीचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते
यावेळी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील माजी अध्यक्ष सुभाषकाका पाटील माजी नगरसेवक सौरभ पाटील, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे, माजी नगराध्यक्षा ऍड विद्याराणी साळुंखे, सौ हिंगमीरे तसेच सर्व माजी नगरसेवक,नगरसेविका, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

माजी मंत्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले...
कराड गावाला ऐतिहासिक आणि राजकीय परंपरा आहे आपलं गाव म्हणजे कोकण तसेच पंढरपूर सोलापूर भागाला जोडणारा मुख्य भाग आहे...कराड हे मोठ्या दळणवळणाचे केंद्र देखील आहे...पुण्यानंतर शिक्षणाचे माहेरघर म्हणून देखील कराडची ओळख आहे...
स्व यशवंतराव चव्हाण यांचाही वरदहस्त या शहराला मिळाला...हे माझं गाव आहे या भावनेने त्यांनी काम केलं...
कराडची सेवा स्व पी डी पाटील साहेबांनी 42 वर्षे नगराध्यक्ष म्हणून केली...स्व पी डी पाटील साहेबांनी विकासात्मक ड्रीष्टीकोन ठेवत शहराचा लौकिक वाढवला... त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन शहराचा विकास केला...सर्व लोकांचीही त्यांना साथ मिळाली...कालांतराने लोकशाही आघाडी म्हणून आपण पालिका राजकारणात पुढे आलो आणि शहराची सेवा करत आहोत...
आपल्या शहराला कृष्णा कोयनेचा आशीर्वाद आहे त्यामुळे याठिकाणी पिण्याच्या पाण्याची अडचण नाही, तसेच प्रदूषणही नाही... शहरातील रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज व्यवस्था चांगल्या अवस्थेत आहे... पालिकेची इमारत देखील चांगल्या अवस्थेत आहे... 
शहरात काम करत असताना लोकशाही आघाडीने शहराचा विकास  स्व पी डी पाटील साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सातत्याने केला आहे... पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना तसेच कोरोना काळातही लोकांसाठी लोकशाही आघाडीने चांगले काम केले आहे... 
मतदारसंघ पुनर्ररचनेनंतर मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कराड उत्तर चे प्रतिनिधित्व केले... मात्र आपल्या शहरासाठी काम करता आले नाही याची खंत मनात होती... शरद पवार साहेबांनी मधल्या काळात मला जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले, त्यामुळे मी शहराला भरगोस निधी देऊ शकलो... दुर्दैवाने मंत्रिपद अधिककाळ मिळाले नाही त्यामुळे अधिक काम करता आले नाही तरी त्या कालावधीत मला शहरासाठी भरीव काम करता आले असेही ते म्हणाले... 
समविचारी मंडळी बरोबर आली तर गावाच्या विकासासाठी त्यांना बरोबर घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे... असेही त्यांनी सांगितले ...
काल निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूका जाहीर केल्या आहेत...दुबार मतदानाचा मुद्दा यानिमित्ताने देशभर गाजला... काल कोर्टात याबाबतची याचिका फेटाळली गेली आणि सायंकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली... आता निवडणूक लागली आहे... आपल्याला कालांतराने राजकीय भाष्य करावे लागणार आहे...मात्र सध्या ती वेळ नाहीये... प्रत्येकाने आपला प्रभाग आणि मतदारयाद्या यावर लक्ष केंद्रित करत काम करायचं आहे... निवडणुकीदरम्यान काहीही वावड्या उठतील... त्याकडे लक्ष न देता... आपल्या आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचे आहेत... असेही ते यावेळी म्हणाले...

दरम्यान यावेळी उपस्थित 7 ते 8 मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत यावेळी आपली स्पष्ट मते मांडली...सूत्रसंचालन अडव्होकेट प्रताप पाटील यांनी केले, युवा नेते व राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी आभार मानले