Monday, February 13, 2023

पृथ्वीराज बाबांचा कराड दक्षिणसाठी 7 कोटी 75 लाखाचा निधी ;

वेध माझा ऑनलाईन  ;  माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण साठी जिल्हा नियोजन मधून 7 कोटी 75 लाख रु. इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रस्ते, पथदिवे, वस्त्यांचे विद्युतीकरण, शाळेच्या खोल्या बांधणे, ओढ्यावर साकव बांधणे, साठवण बंधारे, ग्राम तलाव दुरुस्त करणे, सोलर दिवे बसवणे, ग्रामपंचायत तसेच स्मशानभूमी यांना संरक्षण भिंत बांधणे, सामाजिक सभागृह बांधणे, बंदिस्त गटार करणे, स्मशानभूमी सुधारणा करणे, खडीकरण व काँक्रिटीकरण इत्यादी विविध विकास कामे या निधीमधून होणार आहेत.

या मंजूर निधीमधून येणपे येथे वाढीव वस्तीमध्ये जादा पोल उभारणेसाठी रु. ८ लाख, धोंडेवाडी गावठाणमध्ये नवीन डीपी उभारणेसाठी - रु. ५ लाख, वहागाव येथील स्ट्रीट लाईटसाठी ४५ पोल उभारणेसाठी-रु. १० लाख, वडगाव हवेली येथील एस टी स्टॅन्ड पाठीमागील वस्तीतील धोकादायक विद्युत तारा स्थलांतरित करणेसाठी रु. ३ लाख, सैदापूर येथे संगम कॉलोनी येथे अंडरग्राउंड केबल करून मिळणेबाबत-रु. ५ लाख, घोगाव येथील नायकवडी वस्ती येथे नवीन डीपी बसविणेकरीता-रु. २ लाख, कोयनावसाहत येथील शिवराज हौसिंग सोसायटी रस्ता पथदिवे बसविण्यासाठी-रु. ५ लाख, वारुंजी ता. कराड येथील धोकादायक पोल रस्त्यावरून स्थलांतर करणे व वाढीव वस्तीपर्यंत नवीन विद्युत पुरवठा करणेसाठी -रु. ५ लाख, पोतले येथे वाढीव वस्ती विद्युतीकरण करणे - रु. ४ लाख, सवादे येथील वाढीव वस्ती विद्युतीकरण करणे - रु. ४ लाख, उंडाळे येथील गट न ९६५ मधील ११ केव्ही लाईनचे ५ पोळ शिफ्ट करणे-रु. ३.५० लाख, ओंड येथे वाढीव वस्ती विद्युतीकरण करणे-रु. ५ लाख, नांदगाव येथे वाढीव वस्ती विद्युतीकरण करणे-रु. ५ लाख, खुबी येथील रहिवासी भागातून घरावरून गेलेली ११ केव्ही उच्च दाब वाहिनी स्थलांतरित करणे-रु. २ लाख, धोंडेवाडी येथील बेघर वसाहत येथे नवीन रोहित्र उभारणे-रु. ४ लाख, येणपे येथे वाढीव वस्ती विद्युतीकरणसाठी अतिरिक्त १०० केव्हीचे रोहित्र उभारणे-रु. ७.५० लाख, कासारशिरंबे येथील ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन खोल्या बांधणेसाठी-रु. १७.९२ लाख, शेळकेवाडी येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे-रु. ५ लाख, उंडाळे येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे-रु. ५ लाख, पाटीलवाडी (म्हा.)-रु. ५ लाख, तुळसण येथे मागासवर्गीय वस्तीकडे जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधणे-रु. ३५.१७ लाख, काटेकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या १ खोली बांधणीसाठी-रु. ११.८२ लाख, काले येथील जिल्हा परिषद शाळेच्या ३ खोली बांधणीसाठी रु. ३५.४६ लाख, कोडोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या २ खोली बांधणीसाठी २३.६४ लाख, खुबी येथील जिल्हा परिषद शाळेच्या ४ खोली बांधणीसाठी ३९.६४ लाख, नांदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या २ खोली बांधणीसाठी २३.६४ लाख, पेरले येथील जिल्हा परिषद शाळेच्या २ खोली बांधणीसाठी शिंगणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या १ खोली बांधणीसाठी ११.८२ लाख, शेणोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या १ खोली बांधणीसाठी ११. ८२ लाख, साळशिरंबे येथील जिल्हा परिषद शाळेच्या १ खोली बांधणीसाठी ११.८२ लाख, विठोबाचीवाडी येथील जि प शाळेची खोली दुरुस्ती साठी - रु. ३ लाख, कापील येथे जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु. ३ लाख, गोंदी येथील जि प शाळेच्या ४ खोल्या दुरुस्ती करणेसाठी रु. १० लाख, कापील जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु. ३ लाख, कार्वे जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु.६ लाख, गोंदी जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु.२.५० लाख, चचेगाव जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु.२ लाख, पाचपुतेवाडी जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु.४.५० लाख, प्रतिभानगर (काले) जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु.३ लाख, विठोबाचीवाडी जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु.७ लाख, कापील येथील जि.प.प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणेसाठी रु. ३ लाख, कार्वे येथील जि.प.प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणेसाठी रु. ३ लाख, गोंडी येथील जि.प.प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणेसाठी रु. १० लाख, घारेवाडी येथील साठवण बंधारा बांधणेसाठी रु. २४ लाख, शेवाळेवाडी (येवती) येथील साठवण बंधारा बांधणीसाठी रु. १७ लाख, चौगुलेमळा येथील ग्रामपंचायत संरक्षणभिंत बांधणीसाठी रु. ५ लाख, पवारवाडी (तारूख) येथे अंतर्गत रस्ता सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख, बेलवडे बु. येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख, महारुगडेवाडी येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख, शेणोली येथील स्मशानभूमी अंतर्गत काँक्रिटीकरण व शेड बांधणीसाठी रु. १० लाख, शेळकेवाडी (म्हा) येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख, हणमंतवाडी (येवती) येथील ओढ्याकाठी संरक्षणभिंत बांधणीसाठी रु. ५ लाख, कासारशिरंबे येथील स्मशानभूमी सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख, घोणशी येथील स्मशानभूमीला संरक्षक भिंत बांधणीसाठी रु. ५ लाख, खोडशी येथील दफनभूमी सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख, आणे येथील स्मशानभूमीसह कंपाउंड गेट बसविणेसाठी रु. ५ लाख, पाचवड येथील स्मशानभूमीचे पेव्हर ब्लॉक बसविणेसाठी रु. ५ लाख, किरपे येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणेसाठी रु. ५ लाख, वहागाव येथील ग्रामपंचायत कार्यालय बांधणीसाठी रु. १२ लाख, वडगाव हवेली येथील बंदिस्त गटर बांधणीसाठी रु. १० लाख, गोळेश्वर येथे बंदिस्त गटर बांधणीसाठी रु. ५ लाख, आटके येथे बंदिस्त गटर बांधणीसाठी रु. ५ लाख, वारुंजी येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणेसाठी रु. १० लाख, कार्वे येथील अंतर्गत आर सी सी गटर सह रस्ता काँक्रिटीकरण करणेसाठी रु. ५ लाख, शेरे येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणेसाठी रु. १० लाख, विंग येथील अंतर्गत रास्ता काँक्रिटीकरण आर सी सी गटर करणेसाठी रु. ५ लाख, कार्वे येथील धानाई मंदिर परिसर सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख, घारेवाडी येथील धुळेश्वर देवस्थान परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी पाझर तलाव ते मंदिरापर्यंत रस्ता सुधारणा करणे व पिण्याच्या टाकी व पाईपलाईन साठी रु. ८ लाख, पाचवडेश्वर-नारायणवाडी येथे पाचवडेश्वर मंदिर लगत उत्तर बाजूस संरक्षक भिंत बांधणे व मंदिर परिसर सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख, रेठरे खुर्द येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरचा परिसर सुधारणा करणेसाठी रु. १५ लाख, वानरवाडी येथील ओढ्यावर साकव बांधणे रु. ३५.३७ लाख, सवादे येथील ओढ्यावर साकव बांधणेसाठी रु. ३३ लाख, रा.मा. ४ ते वहागाव घोणशी कोपर्डे हवेली पार्ले बनवडी रस्ता इजिमा १२५ सुधारणा करणेसाठी (आरसीसी गटर सह) रु. ४० लाख, कपिल कोडोली इजिमा ११९ सुधारणा करणेसाठी (आरसीसी गटरसह) रु. ३० लाख, येवती घराळवाडी मस्करवाडी चव्हाणवाडी धामणी डाकेवाडी निवी रस्ता इजिमा १३० कराड हद्द सुधारणा करणेसाठी रु. २५ लाख, बोत्रेवाडी, जिंती, शेवाळवाडी ग्रामा ३०३ सा क्र ०/०० ते २/०० सुधारणा करणेसाठी रु. ३० लाख, काले बेंदमळा, धोंडेवाडी रस्ता ग्रामा २८२ सा क्र ०/०० ते २/०० सुधारणा करणेसाठी रु. २५ लाख, प्रजिमा ५५ शिंगणवाडी, कोळे, पाटीलमळा, कराळवाडी ते आणे जोडरस्ता (भाग-आणे ते विकासनगर) सुधारणा करणे रु. ३० लाख, चचेगाव, येरवळे, पोतले, काळेपाणंद रस्ता ग्रामा १६२ (चचेगाव भाग) सुधारणा करणेसाठी रु. २० लाख असा एकूण ७ कोटी ७५ लाख रुपये इतका भरघोस निधी कराड दक्षिण साठी जिल्हा नियोजन मधून आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून या निधीमधून कराड दक्षिण मधील गावांमध्ये हा निधी मिळाला असून लवकरच हि सर्व कामे सुरु होतील.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासाठी १ कोटी ३३ लाखांचा निधी...

वेध माझा ऑनलाईन - कराड शहराला २०१९ व २०२१ च्या पुराचा फटका बसला होता. यामध्ये पाण्याचा निचरा न झाल्याने शहरात ठीकठिकाणी पाणी साठल्याचे आढळून आले होते. यासाठी आ. चव्हाण यांच्या प्रयत्नातून शनिवार पेठ लाहोटी प्लाझाची पश्चिम बाजू ते पूर्वेस कृष्णा कोयना ऑटोमोबाईल चे दक्षिणेस हॉटेल संगम वाईन शॉप इथपर्यंत बंदिस्त आर सी सी गटर करणे तसेच प्लॉट नंबर ४६७/५ ते पश्चिमेस प्लॉट नंबर ४६७ चे कोपऱ्यावरून महालक्ष्मी भंगार दुकानापर्यंत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी बंदिस्त पाईपलाईन करणे या कामासाठी अंदाजपत्रकीय रक्कम १ कोटी ३३ लाख इतकी मंजूर झाली असून या कामांचा भूमिपूजन समारंभ स्व. यशवंतराव चव्हाण बहूउद्देशीय सभागृह नजीक आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके, अभियंता ए आर पवार, कराड शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष ऋतुराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल चव्हाण, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, श्रीकांत मुळे, सिद्धार्थ थोरवडे, फारूक पटवेकर, भास्कर देवकर, संजय चव्हाण, डॉ. सतीश शिंदे, ललित राजापुरे, राकेश पवार, रोहन विभुते, रमेश वायदंडे, साहेबराव शेवाळे, बंडा शिंदे आदींच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 *यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* कराड शहरात महापुरामुळे विविध ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे सद्याच्या असणाऱ्या पाणी निचरा होण्याच्या पद्धतीत बदल करून मोठ्या आकाराच्या बंदिस्त पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा सहजपणे होण्यास मदत होईल. महापुराच्या पाण्याने शहरातील विशेष करून कोल्हापूर नाका पोपटभाई पेट्रोल पंप, महालक्ष्मी भंगार परिसरातील पावसाळ्यातील मोठी समस्या बंदिस्त पाईपलाईनने मिटणार आहे. या कामाची शासनाच्या वरिष्ठ पातळीवरून पाहणी झाली असून त्यामुळेच अशा कामांना प्राधान्य देऊन दर्जेदार काम होण्याकडे लक्ष राहील. 

या बंदिस्त गटारांमुळे पुरात जे पाणी मोठ्या प्रमाणात साचून वाहतूक कोंडी व रोगराई होत होती तसेच नागरिकांना जो त्रास होत होता तो या मोठ्या बंदिस्त गटारांमुळे बंद होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी यानिमित्त आ. चव्हाण यांचे आभार मानले.

भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीसपदी सुदर्शन पाटसकर यांची निवड

वेध माझा ऑनलाईन - भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस (महमंत्री)पदी कराडच्या सुदर्शन पाटस्कर यांची नुकतीच निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश महामंत्री विक्रांतदादा पाटील भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहूल भैय्या लोणीकर यांच्या उपस्थिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पाटसकर याना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. 

दरम्यान आपल्या निवडीबद्दल बोलताना सुदर्शन पाटसकर म्हणाले की, वडीलांचा सामाजिक कार्याचा वारसा घेवून व भाजपा प्रदेश नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही पक्षाच्या माध्यमातून राज्यातील युवकांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. प्रदेश नेतृत्वाने माझ्यावर टाकलेला विश्वास व ही नवी जबाबदारी नक्कीच सार्थ ठरवेन.

सुदर्शन यांची सुरवातीपासूनच पक्षाप्रती असणारी निष्ठा व सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत असणारी त्यांची तळमळ पाहून पक्षनेतृत्वाकडून प्रथम 2014 ला भाजयुमो कराड शहराध्यक्ष ते 2016 भाजयुमो प्रदेश चिटणीस  2021 प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वयक म्हणून त्यांना जबाबदारी दिली याबरोबरच  कोल्हापूर जिल्हा ग्रामीण व पुणे शहर, पिंपरी चिंचवड प्रभारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले
सुदर्शन हे सामाजिक क्षेत्रातील कामातही अग्रेसर दिसतात. आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या शस्त्रक्रिया करून अनेक सर्वसामान्य लोकांना नवसंजीवनी देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले आहे. जिल्हा मुद्रा योजना कमिटीवर असताना अनेक युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. समाजातील वेगवेगळ्या विषयांतर्गत युवक, विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरीक, खेळाडू अशा सर्वच घटकांसाठी सदैव शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी ते तत्पर असतात.  त्यांच्या याच संघटनात्मक व सामाजिक कार्याची दखल घेत भाजपच्या प्रदेश नेतृत्वाकडून सुदर्शन पाटसकर यांची भाजयुमो प्रदेश सरचिटणीस(महमंत्री) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Sunday, February 12, 2023

वेध माझा ऑनलाईन -  कराडमधील रेफ्रिजरेशन व्यवसायिक केशव उर्फ

राजीनाम्यापूर्वी पृथ्वीराजबाबांची कोष्यांरींवर टीका, आणि राजीनामा दिला तरी टीका...मग,...काँग्रेससह इतर पक्षातील काहीजण वादग्रस्त बोलले होते...त्यांच्या बाबत बाबांचे आजही मौन का? जनतेत चर्चा;

वेध माझा ऑनलाईन - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपला राजीनामा आज दिला आहे राज्यपाल  कोशारी याना  वादग्रस्त विधानामुळे राजीनामा द्यावा लागला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे त्याच दरम्यानच्या काळात काँग्रेसचे काही जण वादग्रस्त विधान करत होते तरीही पृथ्वीराज बाबा त्यांच्या त्या वादग्रस्त बोलण्यावर आजही मौन बाळगून आहेत बाबांनी कोशारी दोषी आहेत हे सांगताना काँग्रेस व इतर पक्षातील वादग्रस्त बोलणारे देखील किती दोषी आहेत? हेही तेवढेच ओरडून सांगायला हवे अशी चर्चा यांनीमित्ताने सूरु आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधाने केली होती त्याचदरम्यान राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीही  वादग्रस्त विधान करत तेही या वादात अडकले होते त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत होते कालांतराने त्त्यानी स्वतः निवृत्तीची इच्छा व्यक्त केली होती व आपला राजीनामा केंद्राकडे सोपवला होता त्याच पाश्र्वभूमीवर आज त्यांचा राजिनामा मंजूर करण्यात आला आहे परंतू त्याचदरम्यान अन्य  राजकीय पक्षातील काहीजण वादग्रस्त बोलले त्यांचे काय ? त्यांच्या बाबतीत कोणता निर्णय होणार  ?त्यांच्या बोलण्यावर काँग्रेस व इतर पक्ष काहीच का बोलत नाहीत ? चूक कोणाचीही असो ती चूकच असते... या न्यायानुसार त्या इतरही वादग्रस्त नेत्यांच्या बोलण्याबाबत कोणता न्याय होणार हेही काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण
तसेच त्या-त्या पक्षाच्या नेत्यांनीही आतातरी जनतेला सांगीतले पाहिजे... आता भाजप ने कोशारी बाबत निर्णय घेतला...तसा इतर पक्षातील वादग्रस्त बोलणाऱ्या नेत्यांबाबतही त्या त्या पक्ष नेतृत्वाने निर्णय घेऊन त्यांचाही सोक्षमोक्ष लवकरात लवकर लावला पाहिजे  अशीही आता चर्चा आहे
दरम्यान कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्र्रपतींनी आज मंजूर केला. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त गेली आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारावा अशी मागणी विरोधी पक्षाकडून अनेकवेळा करण्यात आली. तसे पाहिले तर राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. आणि त्यांना स्वतः चे फार अधिकार नाहीत.
एक संविधानिक पद आहे. तरी या पदावर असलेल्या व्यक्तीने सरकारमधील कामकाजात हस्तक्षेप करणे हे अपेक्षित नाही. परंतु कोश्यारी स्वतः एक मुख्यमंत्री होते. ते अनेक वर्षे राजकारणातही होते. त्यामुळे ते सक्रिय राजकारणापासून बाहेर जाऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात आल्यावर देखील त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात वादग्रस्त विधाने केली. आणि स्वतः वर आक्षेप ओढवून घेतला असेही पृथ्वीराज बाबा म्हणाले दरम्यान कोशारी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचे स्पष्टीकरण भाजप ने दिले आहे

कार्वे येथील आयोजित बैलगाडी शर्यतींना राजेंद्रसिंह यादव यांच्या उपस्थितीत सुरुवात ;

वेध माझा ऑनलाईन - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनांथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कावेँ येथे बैलगाड्यांच्या शर्यतींची सुरुवात मुख्यमंत्री शिंदे गटाचे कराडचे नेते  राजेंद्रसिंह यादव यांच्या उपस्थितीत करण्यात आली
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना कराड तालुका प्रमुख सुयँकांत पाटील उपस्थित होते त्याचबरोबर संयोजक कमेटी राजेंद्रसिहं यादव मित्र परिवाराचे सभासद, तसेच विनोद पवार ,पावर  ग्रुप कराड सुरेश सिंघण, दादासो भोसले, तानाजी देशमुख ,सचिन गायकवाड, संतोष खराडे अनिल जाधव ,सचिन थोरात ,परेश माने गणेश आवळे, जोंटी थोरात, रोहित नलवडे, बंडा पाटील प्रवीण यादव माधव पिसे तसेच सातारा, कराड, सांगली पुणे या परिसरातील बैलगाड्या शौकीन  आणि बैलगाडा  मालक आपल्या बैलगाड्या घेऊन उपस्थित होते. या भव्य बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे उपस्थित सर्व बैलगाडी शौकिन व प्रेक्षकांचे यशवंत विकास आघाडी व शिंदे गटाकडून आभार मानण्यात आले आहेत.

Saturday, February 11, 2023

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर ; कोण आहेत राज्याचे नवे राज्यपाल ? ; वाचा बातमी ...

वेध माझा ऑनलाईन - आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर करण्यात आला आहे. आपल्याला राज्यपाल पदातून मुक्त करण्यात यावं अशी विनंती काही दिवसांपूर्वी कोश्यारी यांनी केली होती. त्याला राष्ट्रपती कडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यांमुळे आता त्यांना पदावरून पायउतार व्हाव लागणार आहे. रमेश बैस हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. कोश्यारी यांच्यासह देशभरातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल बदलण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यांनतर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले होते. राज्यापालांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात होती. छत्रपतींचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे यांनी सुद्धा कोश्यारी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतला होती. त्यातच राज्यपालांनी स्वतःच मला पदमुक्त करावं अशी मागणी केल्यांनतर अखेर केंद्राने त्यांना मंजुरी दिली आहे.