वेध माझा ऑनलाईन - कराड शहराला २०१९ व २०२१ च्या पुराचा फटका बसला होता. यामध्ये पाण्याचा निचरा न झाल्याने शहरात ठीकठिकाणी पाणी साठल्याचे आढळून आले होते. यासाठी आ. चव्हाण यांच्या प्रयत्नातून शनिवार पेठ लाहोटी प्लाझाची पश्चिम बाजू ते पूर्वेस कृष्णा कोयना ऑटोमोबाईल चे दक्षिणेस हॉटेल संगम वाईन शॉप इथपर्यंत बंदिस्त आर सी सी गटर करणे तसेच प्लॉट नंबर ४६७/५ ते पश्चिमेस प्लॉट नंबर ४६७ चे कोपऱ्यावरून महालक्ष्मी भंगार दुकानापर्यंत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी बंदिस्त पाईपलाईन करणे या कामासाठी अंदाजपत्रकीय रक्कम १ कोटी ३३ लाख इतकी मंजूर झाली असून या कामांचा भूमिपूजन समारंभ स्व. यशवंतराव चव्हाण बहूउद्देशीय सभागृह नजीक आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके, अभियंता ए आर पवार, कराड शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष ऋतुराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल चव्हाण, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, श्रीकांत मुळे, सिद्धार्थ थोरवडे, फारूक पटवेकर, भास्कर देवकर, संजय चव्हाण, डॉ. सतीश शिंदे, ललित राजापुरे, राकेश पवार, रोहन विभुते, रमेश वायदंडे, साहेबराव शेवाळे, बंडा शिंदे आदींच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* कराड शहरात महापुरामुळे विविध ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे सद्याच्या असणाऱ्या पाणी निचरा होण्याच्या पद्धतीत बदल करून मोठ्या आकाराच्या बंदिस्त पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा सहजपणे होण्यास मदत होईल. महापुराच्या पाण्याने शहरातील विशेष करून कोल्हापूर नाका पोपटभाई पेट्रोल पंप, महालक्ष्मी भंगार परिसरातील पावसाळ्यातील मोठी समस्या बंदिस्त पाईपलाईनने मिटणार आहे. या कामाची शासनाच्या वरिष्ठ पातळीवरून पाहणी झाली असून त्यामुळेच अशा कामांना प्राधान्य देऊन दर्जेदार काम होण्याकडे लक्ष राहील.
या बंदिस्त गटारांमुळे पुरात जे पाणी मोठ्या प्रमाणात साचून वाहतूक कोंडी व रोगराई होत होती तसेच नागरिकांना जो त्रास होत होता तो या मोठ्या बंदिस्त गटारांमुळे बंद होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी यानिमित्त आ. चव्हाण यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment