वेध माझा ऑनलाईन - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपला राजीनामा आज दिला आहे राज्यपाल कोशारी याना वादग्रस्त विधानामुळे राजीनामा द्यावा लागला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे त्याच दरम्यानच्या काळात काँग्रेसचे काही जण वादग्रस्त विधान करत होते तरीही पृथ्वीराज बाबा त्यांच्या त्या वादग्रस्त बोलण्यावर आजही मौन बाळगून आहेत बाबांनी कोशारी दोषी आहेत हे सांगताना काँग्रेस व इतर पक्षातील वादग्रस्त बोलणारे देखील किती दोषी आहेत? हेही तेवढेच ओरडून सांगायला हवे अशी चर्चा यांनीमित्ताने सूरु आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधाने केली होती त्याचदरम्यान राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीही वादग्रस्त विधान करत तेही या वादात अडकले होते त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत होते कालांतराने त्त्यानी स्वतः निवृत्तीची इच्छा व्यक्त केली होती व आपला राजीनामा केंद्राकडे सोपवला होता त्याच पाश्र्वभूमीवर आज त्यांचा राजिनामा मंजूर करण्यात आला आहे परंतू त्याचदरम्यान अन्य राजकीय पक्षातील काहीजण वादग्रस्त बोलले त्यांचे काय ? त्यांच्या बाबतीत कोणता निर्णय होणार ?त्यांच्या बोलण्यावर काँग्रेस व इतर पक्ष काहीच का बोलत नाहीत ? चूक कोणाचीही असो ती चूकच असते... या न्यायानुसार त्या इतरही वादग्रस्त नेत्यांच्या बोलण्याबाबत कोणता न्याय होणार हेही काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण
तसेच त्या-त्या पक्षाच्या नेत्यांनीही आतातरी जनतेला सांगीतले पाहिजे... आता भाजप ने कोशारी बाबत निर्णय घेतला...तसा इतर पक्षातील वादग्रस्त बोलणाऱ्या नेत्यांबाबतही त्या त्या पक्ष नेतृत्वाने निर्णय घेऊन त्यांचाही सोक्षमोक्ष लवकरात लवकर लावला पाहिजे अशीही आता चर्चा आहे
दरम्यान कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्र्रपतींनी आज मंजूर केला. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त गेली आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारावा अशी मागणी विरोधी पक्षाकडून अनेकवेळा करण्यात आली. तसे पाहिले तर राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. आणि त्यांना स्वतः चे फार अधिकार नाहीत.
एक संविधानिक पद आहे. तरी या पदावर असलेल्या व्यक्तीने सरकारमधील कामकाजात हस्तक्षेप करणे हे अपेक्षित नाही. परंतु कोश्यारी स्वतः एक मुख्यमंत्री होते. ते अनेक वर्षे राजकारणातही होते. त्यामुळे ते सक्रिय राजकारणापासून बाहेर जाऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात आल्यावर देखील त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात वादग्रस्त विधाने केली. आणि स्वतः वर आक्षेप ओढवून घेतला असेही पृथ्वीराज बाबा म्हणाले दरम्यान कोशारी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचे स्पष्टीकरण भाजप ने दिले आहे
No comments:
Post a Comment