Friday, July 21, 2023

चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ;कराड अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल;

वेध माझा ऑनलाईन। आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पाटण तालुक्यातील रुलवे येथील संतोष चंद्रू थोरात याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. एस. होरे यांनी ही शिक्षा आज (शुक्रवारी) सुनावली. 

29 डिसेंबर 2021 रोजी पाटण तालुक्यातील रुवले येथे ही घटना घडली होती. आरोपीच्या पीडित मुलगी एकटीच खेळत असताना आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून तिला निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. व तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मुलीचा मृतदेह नजीकच्या ओघळीतील झुडपात सुमारे 30 फूट खोल फेकून दिला होता

Thursday, July 20, 2023

एकनाथ शिंदेना जागेवर बसून माहिती मिळणं सहज शक्य होत , पण दरड कोसळली तिथे शिंदे स्वतः गेले, आणि जिंकली सर्वांची मने;

वेध माझा ऑनलाईन। रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी बुधवारी रात्री दरड कोसळली. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खालापूरजवळ असणाऱ्या इर्शाळगडाजवळ बुधवारी रात्री दरड कोसळली यामध्ये गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी मधील अनेक घरे जमीनदोस्त झाली. यामध्ये 16 जणांनी आपला जीव गमावला. ह्या वाडीपर्यंत पोहण्यासाठीवचा रस्ता खूप कठीण आहे. आणि पावसाळ्यात या रस्त्याने प्रवास कारण खूपच कठीण. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या ठिकाणावर जाऊन सर्व पाहणी करण्याचा निर्णय घेतला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या घटनेची माहिती त्यांना जागेवर बसून मिळणं सहज शक्य होत. पण तरीही त्याठिकाणी जायचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे प्रशासनाच्या बचाव कार्याला आपोआप वेग आला. मुख्यमंत्र्यांच्या या वागण्यामुळे त्यांनी सामान्य माणसांची मने जिंकली आहेत.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी हे डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. खालापूर तालुक्यातून मालवली गावातून इर्शाळवाडीकडे जाता येत. पण इथे जाण्याचा रस्ता हा अरुंद व निसरडा आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यातच सतत सुरू असणारा पाऊस त्यामुळे कोणतेही वाहन त्या ठिकाणी घेऊन जाणे अशक्य आहे. मुख्यमंत्र्यांची गाडी तिथे पोहचू शकत नव्हती. पण तरीही दुर्घटना घडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भर पावसात वाडीपर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला. वाडीमध्ये पोहचून त्यांनी तेथील सर्व चौकशी करत स्थानिक लोकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर मतदारसंघात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर.

वेध माझा ऑनलाईन। राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या शनिवार दिनांक २९ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर मतदार संघातील नागठाणे, रहिमतपूर, पुसेसावळी, उंब्रज, मसूर व ओगलेवाडी आदी ठिकाणी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आमदार श्री  बाळासाहेब पाटील वाढदिवस समितीच्या वतीने देण्यात आली.

सदरचे शिबिर रविवार दिनांक २३ जुलै रोजी नागठाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये, सोमवार दिनांक २४ जुलै रोजी उंब्रज येथील  श्रीराम मंगल कार्यालय शिवडे फाटा येथे, मंगळवार दिनांक २५ जुलै रोजी रहिमतपूर, बाजारपेठ  येथील विरशैव लिंगायत मठ येथे,  बुधवार दिनांक २६ जुलै रोजी वडगाव ज.स्वा येथील सांस्कृतिक भवन मध्ये, दिनांक २७ जुलै रोजी मसूर येथील सिद्धेश मंगल कार्यालय येथे व दिनांक २८ जुलै रोजी ओगलेवाडी येथील मयूर मल्टीपर्पज हॉल येथे सकाळी १०.०० ते दु.३.०० वाजेपर्यंत पार पडणार आहे.

सदर शिबिरासाठी सह्याद्री मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कराड, सातारा व पुणे येथील तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहून आरोग्य तपासणी करणार आहेत.

सदर शिबीरामध्ये हृदयरोग - इलेक्ट्रो कार्डिओग्राम (ECG), उच्च रक्तदाब, अस्थिरोग (आर्थो आणि फिजिओथेरेपी) मधुमेह - रक्तातील साखर तपासणी, साखर वाढीमुळे होणारे आजार, नेत्ररोग, तसेच कॅन्सर संदर्भात तपासणी व मार्गदर्शन आणि स्त्री रोगावरील मार्गदर्शन व प्रथोमपचार इ. तसेच महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन सुविधा संदर्भात माहिती देण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर व स्टाफ उपस्थित राहणार आहेत, तरी गरजुंनी याचा लाभ घ्यावा, अशी विनंती आमदार श्री. बाळासाहेब पाटील वाढदिवस समिती यांच्यावतीने करण्यात आली आहे.
आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर मतदारसंघात विविध  ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर.*

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या शनिवार दिनांक २९ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर मतदार संघातील नागठाणे, रहिमतपूर, पुसेसावळी, उंब्रज, मसूर व ओगलेवाडी आदी ठिकाणी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आमदार श्री  बाळासाहेब पाटील वाढदिवस समितीच्या वतीने देण्यात आली.

सदरचे शिबिर रविवार दिनांक २३ जुलै रोजी नागठाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये, सोमवार दिनांक २४ जुलै रोजी उंब्रज येथील  श्रीराम मंगल कार्यालय शिवडे फाटा येथे, मंगळवार दिनांक २५ जुलै रोजी रहिमतपूर, बाजारपेठ  येथील विरशैव लिंगायत मठ येथे,  बुधवार दिनांक २६ जुलै रोजी वडगाव ज.स्वा येथील सांस्कृतिक भवन मध्ये, दिनांक २७ जुलै रोजी मसूर येथील सिद्धेश मंगल कार्यालय येथे व दिनांक २८ जुलै रोजी ओगलेवाडी येथील मयूर मल्टीपर्पज हॉल येथे सकाळी १०.०० ते दु.३.०० वाजेपर्यंत पार पडणार आहे.

सदर शिबिरासाठी सह्याद्री मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कराड, सातारा व पुणे येथील तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहून आरोग्य तपासणी करणार आहेत.

सदर शिबीरामध्ये हृदयरोग - इलेक्ट्रो कार्डिओग्राम (ECG), उच्च रक्तदाब, अस्थिरोग (आर्थो आणि फिजिओथेरेपी) मधुमेह - रक्तातील साखर तपासणी, साखर वाढीमुळे होणारे आजार, नेत्ररोग, तसेच कॅन्सर संदर्भात तपासणी व मार्गदर्शन आणि स्त्री रोगावरील मार्गदर्शन व प्रथोमपचार इ. तसेच महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन सुविधा संदर्भात माहिती देण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर व स्टाफ उपस्थित राहणार आहेत, तरी गरजुंनी याचा लाभ घ्यावा, अशी विनंती आमदार श्री. बाळासाहेब पाटील वाढदिवस समिती यांच्यावतीने करण्यात आली आहे.

कराड पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मुख्याधिकारी खंदारे यांच्या आश्वासनानंतर मागे ;

वेध माझा ऑनलाईन ;
कराड पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मुख्याधिकारी खंदारे यांच्या आश्वासनानंतर आज मागे घेण्यात आले मुख्याधिकारी शंकर खंदारे हे कराडला रुजू  झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या या पालिका  कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यशस्वीरित्या त्यांनी मागे घ्यायला लावले त्याकरिता त्यांनी कर्मचाऱ्यांना काही वेतन रकमेचा चेक देत उर्वरित रक्कम लवकरच देण्याचे आश्वासन दिले व हे आंदोलन मागे 
घेण्याची विनंती केली कर्मचाऱ्यांनी देखील आंदोलन मागे घेतले खंदारे यांच्या या इन्स्टंट निर्णय क्षमतेचे कराडात कौतुक होताना दिसतंय

कराड नगरपरिषद जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांनी आज जलशुद्धी केंद्राच्या ऑफिसच्या बाहेरच आजपासूनच काम बंद आंदोलन पुकारले होते तसेच तोडगा न निघाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता 

दरम्यान कराड पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे याना ही बाब समजली तेव्हा ते साताऱ्यात होते तातडीने ते साताऱ्याहून कराडला आले कर्मचारी जिथे काम बंद आंदोलन करत होते त्याठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांना भेटले त्यावेळी त्यांनी  पालिकेतील आपल्या ऑफिसमध्ये या कर्मचाऱ्यांना बोलावून घेत त्यांनी एक धनादेश देखील कर्मचाऱ्यांना सुपूर्त केला तसेच पुढच्या आठवड्यात उरलेल्या पगाराच्या रकमेच्या तरतुदींचे आश्वासन दिले व हे आंदोलन मागे घेण्यासाठी विंनती केली कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्या शब्दाला मान देत आजच सुरू केलेले हे आंदोलन आजच मागे घेतले 

दरम्यान सी ओ खंदारे यांच्या कराडमध्ये रुजू झाल्यानंतर ही पहिलीच अशी वेळ आली होती की त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच पालिका अंतर्गत कर्मचारी वर्गाच्या आंदोलनाला त्यांना स्वतःला तोंड द्यावे लागले असते मात्र त्यांनी एकूनच या सर्व प्रकाराला ज्या पद्धतीने आपल्या घेतलेल्या योग्य आणि इन्स्टंट निर्णयामुळे हाताळले त्याचे कौतुक शहरात होताना दिसत आहे


शरद पवारांना अजित पवारांचा आणखी एक धक्का ; नागालँडमधील राष्ट्रवादीचे सातही आमदारांचा अजित पवारांना पाठींबा ; शरद पवारांच्या अडचणी वाढल्या ;

वेध माझा ऑनलाईन। अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडली आहे. राज्यातील अनेक आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असून अजित पवारांनी पक्ष आणि पक्ष चिन्हावर देखील दावा केला आहे. अशातच आता शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का अजित पवारांनी दिला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादीचे सातही आमदार तसेच संपूर्ण प्रदेश कार्यकारिणीने अजित पवारांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे शरद पवारांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत.

अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारला पाठींबा जाहीर करत आठ मंत्र्यांसह सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी पक्ष आणि पक्षचिन्हावर देखील दावा केला आहे. तसेच शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन हटवित असल्याचे पत्र देखील त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केले आहे.
पक्षात फुट पडल्यानंतर दोन्ही गटांचे मुंबईत मेळावे पार पडले. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती.

दरम्यान विधिमंडळ अधिवेशनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीचे मंत्र्यांसोबत आणि आमदारांसोबत सोबत अशा दोन वेळा शरद पवारांची भेट घेत आशीर्वाद मागितला. तसेच यातून मार्ग काढावा असे देखील ते म्हणाले होते. मात्र यावर पवारांनी कोणतीच प्रतिक्रीया दिली नव्हती. त्यानंतर एनडीएच्या बैठकीला देखील अजित पवार दिल्लीला उपस्थित राहिले. यावेळी मोदी, शहा यांच्यासोबत खलबते झाली. अजित पवार यांचे बंड मोडून काढण्यात पवारांना 2019 साली यश आले होते. मात्र आताचे बंड शरद पवारांसाठी कसोटीचा काळ ठरले आहे.

एकीकडे शरद पवार इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीत सहभागी आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनी एनडीएच्या आघाडीसोबत आहेत. रविवारी दोन्ही आघाड्यांच्या बैठका पार पडल्या इंडियाची बैठक बंगळूरुमध्ये पार पडली याच बैठकीत युपीएचे नाव बदलून इंडिया करण्यात आले. तर दुसरीकडे दिल्लीत एनडीएची बैठक पार पडली या बैठकीला अजित पवार आणि प्रफुल पटेल उपस्थित होते. एनडीएची बैठक पार पडल्यानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत अजित पवार आणि प्रफुल पटेल यांची खलबते झाली.

त्यानंतर आज मोठी घडामोड घडून आली आहे. नागालॅडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आले आहेत. हे सातही आमदार तेथील भाजप सरकारसोबत आहेत. या आमदारांनी आणि नागालॅँड राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचे प्रसिद्धीपत्रक राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय प्रवक्ता ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी काढले आहे.

वेध माझा ऑनलाईन। 
रोजी शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी अशा "शासन आपल्या दारी" या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना व भारतीय जनता पार्टी युतीच्या वतीने ता.कराड येथील 'डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन' येथे करण्यात आले होते. याप्रसंगी  सातारा लोकसभा प्रभारी डॉ.अतुल (बाबा) भोसले तसेच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. विक्रम पावसकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतरावजी शेलार, उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सुलोचनाताई चंद्रकांत पवार, शिवसेना कराड उत्तर विधानसभा संघटिका विद्याताई शिंदे, शिवसेना कराड शहर प्रमुख राजेंद्र माने, शिवसेना महिला आघाडी कराड शहर प्रमुख आफरीनताई मनेर, भाजपा कराड शहर अध्यक्ष श्री.एकनाथ बागडी, शिवसेना तालुका अध्यक्ष श्री.काका जाधव, शिवसेना पदाधिकारी व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या योजनेद्वारे सध्याचे सरकार महाराष्ट्रात रामराज्याची संकल्पना रुजवत आहे. रामराज्याच्या प्रेरणेने आज महाराष्ट्र शासन समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे.* 🚩🚩🌷🌷🙏