वेध माझा ऑनलाईन। आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पाटण तालुक्यातील रुलवे येथील संतोष चंद्रू थोरात याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. एस. होरे यांनी ही शिक्षा आज (शुक्रवारी) सुनावली.
29 डिसेंबर 2021 रोजी पाटण तालुक्यातील रुवले येथे ही घटना घडली होती. आरोपीच्या पीडित मुलगी एकटीच खेळत असताना आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून तिला निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. व तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मुलीचा मृतदेह नजीकच्या ओघळीतील झुडपात सुमारे 30 फूट खोल फेकून दिला होता
No comments:
Post a Comment