Thursday, July 20, 2023

एकनाथ शिंदेना जागेवर बसून माहिती मिळणं सहज शक्य होत , पण दरड कोसळली तिथे शिंदे स्वतः गेले, आणि जिंकली सर्वांची मने;

वेध माझा ऑनलाईन। रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी बुधवारी रात्री दरड कोसळली. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खालापूरजवळ असणाऱ्या इर्शाळगडाजवळ बुधवारी रात्री दरड कोसळली यामध्ये गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी मधील अनेक घरे जमीनदोस्त झाली. यामध्ये 16 जणांनी आपला जीव गमावला. ह्या वाडीपर्यंत पोहण्यासाठीवचा रस्ता खूप कठीण आहे. आणि पावसाळ्यात या रस्त्याने प्रवास कारण खूपच कठीण. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या ठिकाणावर जाऊन सर्व पाहणी करण्याचा निर्णय घेतला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या घटनेची माहिती त्यांना जागेवर बसून मिळणं सहज शक्य होत. पण तरीही त्याठिकाणी जायचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे प्रशासनाच्या बचाव कार्याला आपोआप वेग आला. मुख्यमंत्र्यांच्या या वागण्यामुळे त्यांनी सामान्य माणसांची मने जिंकली आहेत.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी हे डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. खालापूर तालुक्यातून मालवली गावातून इर्शाळवाडीकडे जाता येत. पण इथे जाण्याचा रस्ता हा अरुंद व निसरडा आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यातच सतत सुरू असणारा पाऊस त्यामुळे कोणतेही वाहन त्या ठिकाणी घेऊन जाणे अशक्य आहे. मुख्यमंत्र्यांची गाडी तिथे पोहचू शकत नव्हती. पण तरीही दुर्घटना घडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भर पावसात वाडीपर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला. वाडीमध्ये पोहचून त्यांनी तेथील सर्व चौकशी करत स्थानिक लोकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

No comments:

Post a Comment