कराड पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मुख्याधिकारी खंदारे यांच्या आश्वासनानंतर आज मागे घेण्यात आले मुख्याधिकारी शंकर खंदारे हे कराडला रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या या पालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यशस्वीरित्या त्यांनी मागे घ्यायला लावले त्याकरिता त्यांनी कर्मचाऱ्यांना काही वेतन रकमेचा चेक देत उर्वरित रक्कम लवकरच देण्याचे आश्वासन दिले व हे आंदोलन मागे
घेण्याची विनंती केली कर्मचाऱ्यांनी देखील आंदोलन मागे घेतले खंदारे यांच्या या इन्स्टंट निर्णय क्षमतेचे कराडात कौतुक होताना दिसतंय
कराड नगरपरिषद जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांनी आज जलशुद्धी केंद्राच्या ऑफिसच्या बाहेरच आजपासूनच काम बंद आंदोलन पुकारले होते तसेच तोडगा न निघाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता
दरम्यान कराड पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे याना ही बाब समजली तेव्हा ते साताऱ्यात होते तातडीने ते साताऱ्याहून कराडला आले कर्मचारी जिथे काम बंद आंदोलन करत होते त्याठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांना भेटले त्यावेळी त्यांनी पालिकेतील आपल्या ऑफिसमध्ये या कर्मचाऱ्यांना बोलावून घेत त्यांनी एक धनादेश देखील कर्मचाऱ्यांना सुपूर्त केला तसेच पुढच्या आठवड्यात उरलेल्या पगाराच्या रकमेच्या तरतुदींचे आश्वासन दिले व हे आंदोलन मागे घेण्यासाठी विंनती केली कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्या शब्दाला मान देत आजच सुरू केलेले हे आंदोलन आजच मागे घेतले
दरम्यान सी ओ खंदारे यांच्या कराडमध्ये रुजू झाल्यानंतर ही पहिलीच अशी वेळ आली होती की त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच पालिका अंतर्गत कर्मचारी वर्गाच्या आंदोलनाला त्यांना स्वतःला तोंड द्यावे लागले असते मात्र त्यांनी एकूनच या सर्व प्रकाराला ज्या पद्धतीने आपल्या घेतलेल्या योग्य आणि इन्स्टंट निर्णयामुळे हाताळले त्याचे कौतुक शहरात होताना दिसत आहे
No comments:
Post a Comment