Tuesday, August 31, 2021

आज आणि उद्या काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता ...

वेध माझा ऑनलाइन
छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने तसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात 31 आॅगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर ठाणे आणि रायगडला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.


मराठवाड्यात आज आणि उद्या सर्वत्र पावसाचा अंदाज, लातूर आणि उस्मानाबादसाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात 31 आॅगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.

उद्या नाशिकसाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात 30 आॅगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाचा शक्यता आहे. संपूर्ण विदर्भासाठी आज आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज तर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपुरमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे

*416 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 10 बाधितांचा मृत्यू 234 जणांना दिला आज डिस्चार्ज...

  सातारा दि.31 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  416  नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून 10  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे. जावली 2 (9814),  कराड 61 (37866), खंडाळा 12 (13822), खटाव 69 (24265), कोरेगांव 32 (20990), माण 48 (16863),  महाबळेश्वर  2 (4587), पाटण  7 (9948), फलटण  107 (34822), सातारा  64 (49268), वाई 7  (15352) व इतर 5 (1901) असे  आज अखेर एकूण 239508 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.   तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या कराड 4,  माण 1, फलटण 1,  सातारा  1, वाई 3 अशी असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6022 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत  234  जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 1797608*
*एकूण बाधित –239508*
*घरी सोडण्यात आलेले 227141*
*मृत्यू -6022*
*उपचारार्थ रुग्ण- 9711*

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले ठाण्यातील ऑक्सीजन प्रकल्पाचे लोकार्पण - राज्य सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही - मुख्यमंत्री

ठाणे
राज्य सरकार हे कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल,असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की, केंद्राने देखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे. 

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गोकुळाष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत ‘आरोग्य उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्यावतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आज ठाणे शहरातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 

कार्यक्रमास नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार श्री. सरनाईक यांच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी  मीरा भाईंदर येथे पहिल्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. 

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची जाणीव आहे. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. मात्र कोरोना निर्बंधासाठीचे  नियम मोडून आंदोलने केली जात आहेत. आंदोलन करायचेच असेल तर कोरोना विरुद्ध करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे.  त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे  हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सध्या आमदार सरनाईक कोरोना विरोधात जे आंदोलन करताहेत तसे करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या कामासाठी नेहमीच निधी मिळाला आहे येथून पुढेही निधी मिळेल याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी प्राणवायूचा प्रकल्प सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्री. सरनाईक यांचे अभिनंदन केले.

*तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना निर्बंधाचे पालन करा- पालकमंत्री एकनाथ शिंदे*

नगरविकास मंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची सर्वांधिक गरज भासली. उत्पादनापेक्षा मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र जिल्हा नियोजन विकास निधी आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसरातील महापालिकांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे पीएसए प्लांट उभारले आहेत. त्यामाध्यमातून गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी मदत होईल. सध्या  कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत असल्याचे सांगत संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

*कोरोना लढाईतील ठाणेकरांच काम मार्गदर्शक- खासदार संजय राऊत*

खासदार श्री. राऊत यावेळी म्हणाले, जे कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम पाळत नाहीत ते त्याच्या संसर्गाला आमंत्रण देतात. रुग्ण वाढले की ऑक्सिजनची मागणी वाढते त्यावेळी अशा प्रकारच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची गरज भासते. कोरोना लढाईत ज्याप्रकारे काम ठाणेकरांनी काम केलं आहे ते मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार श्री. सरनाईक यांनी प्रास्ताविक केले. नगरसेविका परिषा सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

*ऑक्सिजन प्रकल्पाविषयी*
आमदार सरनाईक यांनी आपल्या ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणेकर नागरिकांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. मंगळवार ३१ ऑगस्ट रोजी गोपाळकाला असून त्या दिवशी उत्सवाचे मोठे आयोजन न करता 'आरोग्य उत्सव' अंतर्गत हा ऑक्सिजन प्लांट लोकांच्या सेवेसाठी अर्पण केला जाणार आहे.
प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्टने - ठाणे शहरात, रेमंड कंपनी समोर, विहंग पाम क्लब येथे हा कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. ठाण्यातील हा ऑक्सिजन प्लांट सुरु होत असून दिवस-रात्र या प्लांटमधून आपल्या शहराला ऑक्सिजन सेवा मिळणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित ऑपरेटर, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. हवेतून ऑक्सिजन निर्माण करून त्याचे फिल्टरेशन करून ते सिलेंडरमध्ये भरले जाणार आहे. या  प्लांटमधून  १२० सिलेंडर ऑक्सिजन दिवसाला मिळणार आहे. हे ऑक्सिजन जनतेला विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
हा ऑक्सिजन  प्लांट लोकांसाठी २४ तास सुरु राहील. रिकामे सिलेंडर घेऊन येणाऱ्या नागरिकांना भरलेले ऑक्सिजन सिलेंडर येथून दिले जाईल. तसेच ज्यांच्याकडे सिलेंडर नसेल त्यांना डिपॉजिट घेऊन मोफत ऑक्सिजन सिलेंडर देण्याची ही योजना आमदार सरनाईक यांनी तयार केली आहे. दररोज निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा पालिका, सरकारी हॉस्पिटल तसेच गरज पडल्यास खासगी हॉस्पिट्लनाही केला जाईल. कोरोना पूर्णपणे हद्दपार होईपर्यंत व त्यानंतरही ही ऑक्सिजन सेवा सुरु राहणार आहे. 

००००

नांदगाव च्या तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश पाटील जयवंत मोहिते यांची उपाध्यक्षपदी निवड

 कराड 
नांदगाव येथील ग्रामसभा सोमवार (दि 30) रोजी गोंधळात पार पडली. सभेमध्ये तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गणेश पाटील तर उपाध्यक्षपदी जयवंत मोहिते यांची बहुमताने निवड करण्यात आली. विरोधी उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले.

             कोरोना महामारीमुळे नांदगाव ची लांबलेली पहिली ग्रामसभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये तंटामुक्तीसह अन्य समितींच्या निवडी होणार असल्याने ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी 11:30 वाजता सुरू झालेली ग्रामसभा दुपारी 3:30 पर्यंत चालली. पण ग्रामस्थ ठिय्या मांडून बसले होते.

              सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच हंबीर पाटील होते. मात्र तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष निवडीवरून बरीच ताणाताणी झाल्यानंतर त्यांनी मधूनच हे अध्यक्षपद सोडले. उपसरपंच अधिकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पुढे सुरू राहिली .यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे,  अमोल कांबळे, डॉ. शुभांगी माळी, अनिता पाटील, गौरी मोरे, ग्रामसेवक मोहन शेळके यांची उपस्थिती होती. सभेमध्ये बहुमताने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडण्यात आले .

             निवडीनंतर दक्षिण मांड  व्हॅली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वि. तु. सुकरे- गुरुजी यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते पोपटराव पाटील, शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सतीश कडोले,  माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील, डॉ. नरेंद्र माळी, हितेश सूर्वे,  दत्तात्रय माटेकर, सागर कुंभार, विजय पाटील, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष जगन्नाथ पाटील, शिवाजी माळी, अरविंद पाटील, अधिकराव पाटील, विलास माटेकर, सयाजी शिंदे, अशोक शिंदे, संग्राम पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

                या निवडी यशस्वी करण्यासाठी युवा नेते पोपट  पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक टी. के. पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे  माजी अध्यक्ष हिंदुराव पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक जगन्नाथ माळी, दिनकरराव पाटील, विजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.

 

Monday, August 30, 2021

469 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 4 बाधितांचा मृत्यू 633 जणांना दिला आज डिस्चार्ज

  सातारा दि.30(जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  469 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून 4 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.  आजअखेर एकूण 239092 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित झाले असून   एकूण 6012  कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
तसेच जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत  633  जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 1787280*
*एकूण बाधित –239092*
*घरी सोडण्यात आलेले 226907*
*मृत्यू -6012*
*उपचारार्थ रुग्ण- 9529*

                                                                0000

नारायण राणे कोर्टात का आले नाहीत?... राणेंच्या वकिलानी केला खुलासा...


वेध माझा ऑनलाइन
केंद्रीय मंत्री नारायण राणे सोमवारी रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजर राहू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राणे यांना काही दिवस पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान राणे यांचे वकील राणेच्या वतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. राणे यांना बरे वाटत नसल्याने ते येऊ शकत नाहीत असे त्यांनी यावेळी पोलिसांना सांगितले.

सकाळी, राणे यांच्या आगमनाच्या अपेक्षेने पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाजवळ पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला होता. चिकणे यांच्यासोबत भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते. राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती, कारण त्यांनी मी असतो तर मुख्यमंत्र्यांना कानाखाली चढवली असती, असं विधान केलं होतं. त्यांना मंगळवारी रात्री रायगडमधील महाड येथे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने राणे यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करताना ३० ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर रोजी अलिबाग (रायगड) येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.राणे यांच्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रात चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राज्यभरात राजकीय वाद आणि निदर्शने झाली.


गणेशोत्सव साध्या पद्धतीने व पर्यावरण पुरक साजरा करा - जिल्हाधिकारी

वेध माझा ऑनलाइन
सातारा दि.30 (जिमाका):  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा गणेशोत्सव जिल्ह्यात साध्या पद्धतीने व पर्यावरण पुरक असा साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सवाबाबत बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा  पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुट व घरगुती गणपतीकरिता 2 फुटांच्या मार्यादेत असावी. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्ती ऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तींचे पुजन करावे. मुर्ती शाडुची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीत विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. 
जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आरती, भजन, किर्तन तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्री गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी. मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात   यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीने विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत केले आहे.
00000

राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा दमदार पावसाची शक्यता...

वेध माझा ऑनलाइन
राज्यातील शेतकरी अनेक दिवसांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत. हवामान विभागानं आज राज्यात ठिकठिकाणी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात आज धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, लातूर, नांदेड , उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात देखील पाऊस होईल, अशी माहिती हवामानतज्ज्ञ के.ए.एस होसाळीकर यांनी दिली आहे. तर , राज्यात आज सकाळपासून जळगाव, नंदूरबार आणि औरंगाबाद दिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे.

विविध जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट

हवामान विभागानं सोमवारी परभणी जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर,रत्नागिरी, जळगाव, बुलडाणा, जालना, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

31 ऑगस्टला रायगड, ठाणे आणि नाशिकला अ‌ॅलर्ट

मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर, 1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

नाशिकला दमदार पावसाची प्रतीक्षा

नाशिक जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही 65 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा 12 टक्के कमी आहे. दमदार पाऊस न झाल्यास आरक्षणाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गंगापूर आणि दारणा समूहात मात्र समाधानकारक पाणीसाठा असल्यानं नाशिककरांच्या पाण्याचा प्रश्न सध्यासाठी सुटला आहे.

शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

महाराष्ट्रात यंदाचा मान्सून असमान राहिला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यात मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांसमोर पीक जगवण्याचं आणि दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं होतं. साधारणपणे जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसानं जोरदार हजेरी लावली होती. मात्र, त्याचवेळी उत्तर महाराष्ट्रात पावसानं दडी मारलेली होती. आता हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास शेतकऱ्यांसमोरील पाण्याची अडचण दूर होणार आहे.

आता मंदिरे खुली करा ; कराड शहर भाजपची मागणी ; विठ्ठल मंदिरात केले शंखनाद आंदोलन...

वेध माझा ऑनलाइन
कराड
 राज्यभरातील सर्व मंदीरे खुली करण्यासाठी येथील शहर भाजतर्फे शंखनाद आंदोलन करण्यात आले. येथील शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या नेतृत्वाखाली येथील विठ्ठल मंदीरात शंखनाद आंदोलन झाले. यावेळी टाळमृदंगाचा गजर करत आंदोलनकर्त्यांनी येथील मारूती बुवा मठाच्या बाहेर आंदोलन केले. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, श्री पेंढारकर, सुदर्शन पाटस्कर, उमेश शिंदे, रूपेश मुळे, प्रमोद शिंदे, विवेक भोसले, सागर लादे, रूपेंद्र कदम, सागर लादे, विश्वनाथ फुटाणे, उल्हास बेंद्रे, मोहन पुरोहीत, विशाल कुलकर्णी, निखील शाह, नितीन शाह, शैलेश गोंदकर, सागर लाखे, सुहास चक्के यांच्यासह मारूती बुवा मटातील सर्व वारकरी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मंदीरासमोर टाळ मृदंगाचा गजर करण्यात आला. 

यावेळी भुमिका मांडताना शहराध्यक्ष बागडी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने गेल्या पाच महिन्यात धार्मिक स्थळे बंद ठेवले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार थांबले आहेत. त्यामुळे त्यावर जगणाऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. अन्य सर्व व्यवहार सुरळीत असताना केवळ मंदीरेच बंद का आहेत, याचा जाब सरकारला विचारयाल हवा. सर्व मंदीरे खुली करावीत, यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर असे आंदोलन करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून कऱ्हाडमध्येही आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाची दखल घेवून सरकारने मंदीर खुली करावीत, अशी आमची मागणी आहे

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची कृष्णा हॉस्पिटलला सदिच्छा भेट


वेध माझा ऑनलाइन
कराड,
कोरोना महामारीमध्ये लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा हॉस्पिटलने अग्रेसरपणे केले आहे. हजारो लोकांसाठी कृष्णा हॉस्पिटल आधारवड बनले आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले. सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी कृष्णा हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

कृष्णा हॉस्पिटलमध्ये आगमन होताच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी श्री. आठवले यांचे स्वागत केले. तसेच कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने श्री. आठवले यांच्या हस्ते डॉ. भोसले यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी श्री. आठवले म्हणाले, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी लावलेले हे रोपटे आता वटवृक्ष बनले आहे, जे गोरगरीबांना आधार देत आहे. कोरोनाच्या काळात कृष्णा हॉस्पिटलमधून सुमारे ७,००० रुग्ण बरे झाले. याठिकाणी दाखल होणारे रुग्ण कुठल्याही जातीचे असो, धर्माचे असो, कोणत्याही पक्षाचे असो अथवा गरीब, कष्टकरी, मजूर किंवा मध्यमवर्गीय असो. सर्वांनाच चांगल्याप्रकारे सुविधा आणि सेवा देण्याचे काम कृष्णा रुग्णालय करत आहे. कोरोना काळात रुग्णांकडून एकही रुपया न घेता, त्यांच्यावर उपचार केले व त्यांना कोरोनामुक्त केले. त्यामुळे या संस्थेबद्दल मला नितांत आदर आहे. चांगल्या कामाला माझा नेहमीच पाठिंबा राहिला असून, केंद्रीय स्तरावर लागणाऱ्या कोणत्याही मदतीसाठी मी सदैव तयार आहे.

याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, सचिन बनसोडे, आप्पासाहेब गायकवाड, जयवंत विरकायदे, युवराज काटरे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, जितेंद्र पाटील, बाजीराव निकम, जयवंतदादा जगताप, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, मलकापूरचे नगरसेवक आबा सोळवंडे, बाळासाहेब घाडगे, नारायण शिंगाडे, रामभाऊ सातपुते, संजय पवार, दिगंबर वास्के, डॉ. सारिका गावडे, संतोष हिंगसे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 


बनुबाईंना अश्रू अनावर..!

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे नेतृत्व मानून काम करणाऱ्या शेरे गावच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती बनुबाई येवले यांना कृष्णा हॉस्पिटल येथे मंत्री आठवले भेटल्यावर, त्यांनी येवले यांची विचारपूस करताच बनुबाईंना अश्रू अनावर झाले. त्यांनी रडत-रडतच  ‘अतुलबाबांच्यामुळे माझा जीव वाचला’ असे आठवलेंना सांगितले. आजारपणात कृष्णा हॉस्पिटल माझ्या मदतीला कायमच असते, अशी भावना यावेळी बनुबाईंनी व्यक्त करून दाखवली.


Sunday, August 29, 2021

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची आज पोलिसांसमोर पहिली हजेरी, अलिबागमध्ये बंदोबस्त वाढवला, संपूर्ण घडामोडींकडे महाराष्ट्राचं लक्ष...

वेध माझा ऑनलाइन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांचा सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार राणेंना 30 ऑगस्टला अलिबाग पोलिसांत हजेरी लावण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे नारायण राणे आज अलिबाग पोलीस ठाण्यात एनसीपीकडे हजेरी लावण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?
केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. त्याच टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी राणेंना अटक केली होती. विशेष म्हणजे राणे यांनी अटकपूर्व जामीनसाठी देखील अर्ज केला होता. पण त्यांचा तो अर्ज फेटाळण्यात आला होता. अखेर महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या कोर्टासमोर झालेल्या सुनावणीत नारायण राणे यांना दिलासा मिळाला होता. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर महाड कोर्टाकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर बचाव पक्षाकडून राणे यांना जामीन देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांना काही अटीशर्ती ठेवून जामीन मंजूर केला.


कोर्टात नेमकं काय घडलं होतं?
महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सुमारे एक तास सुनावणी पार पडली होती. जवळपास पाऊण तास दोन्ही बाजूचा युक्तिवाद चालला. त्यानंतर 15 मिनिटांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांचा जामीन मंजूर केला. नारायण राणे यांच्या एका विधानामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. राणेंचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला. महाड पोलिसांनी नारायण राणे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांची ही मागणी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळालं होतं.

तर दुसरीकडे नारायण राणे यांच्या वकिलांकडून राणे यांनी केलेलं विधान हे सार्वजनिकरित्या केलं होतं. त्यामुळे त्यामागे कुठलाही कट नव्हता असं म्हटलं. तसंच राजकीय हेतूने प्रेरित होऊन पोलिसांनी राणेंवर कलमं लावल्याचा गंभीर आरोपही राणेंच्या वकिलांनी केला. तसंच राणेंच्या अटकेसाठी पोलिसांकडून कुठलंही अटक वॉरंट देण्यात आलं नाही, असा युक्तिवादही करण्यात आला. तसंच राणेंच्या प्रकृतीचं कारण देत राणेंना जामीन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अखेर दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांना अटीशर्ती ठेवून परवानगी दिली होती.

नेमक्या अटी काय?
नारायण राणे यांना कोर्टाने महिन्यातून दोन वेळा पोलीस ठाण्यात दाखल होण्याचा आदेश दिला आहे. तसेच यापुढे असं आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याचा आदेश दिला. राणेंना पुन्हा तसं वक्तव्य करणार नसल्याचीदेखील ग्वाही दिली. तसेच राणेंना 30 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार राणे आज अलिबाग पोलीस ठाण्यात जाण्याची शक्यता आहे.

राज्यात नाईट कर्फ्यू लागणार? केंद्राच्या सूचनेनंतर मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता, राजेश टोपेंचं सूचक वक्तव्य...


वेध माझा ऑनलाइन

केरळमध्ये ओनम उत्सवामध्ये 30 ते 35 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली होती. केरळचा अनुभव पाहाता आपल्याला सावध होणे आणि काळजी घेणे गरजेचे आहे, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. केंद्रानं ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या अधिक प्रमाणात आहे, तिथं नाईट कर्फ्यू लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयानं नाईट कर्फ्यू आणि इतर सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी राज्य सरकार नक्कीच करेल.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या संदर्भात निर्णय घेतील, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सचा विचार
राज्यातील काही जिल्हे आणि शाळा जिथे पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत त्या बाबत टास्क फोर्सचा शाळा सुरू करण्याबत विचार सुरु आहे. तसेच 5 तारखे पर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण करण्याबाबत स्पेशल ड्राइव्ह घेणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.
शिक्षकांच्या लसीकरणासाठी मोहीम
शिक्षकांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकार विशेष मोहीम राबवणार आहे. 5 तारखे पर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण करण्याबाबत स्पेशल ड्राईव्ह घेणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत. राज्यातील काही जिल्हे आणि शाळा जिथे पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत त्या बाबत टास्क फोर्सचा शाळा आणि जिल्हे सुरू करण्याबत विचार सुरु आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांचं लसीकरण करुन घेणं आवश्यक असल्यानं यासंदर्भात राज्य सरकारकडून पावलं टाकण्यात येत आहेत.
केंद्रानं राज्य सरकारला नेमंक काय सांगितलं?
केंद्र सरकारनं महाराष्ट्र आणि केरळ सरकारला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण मोहीम, कोविड सुसंगत वर्तणूक याचं पालन करण्यास सांगितलं आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोनासंसर्गाचा दर आहे तिथं नाईट कर्फ्यू लावावा, असं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.

71 जणांना दिला आज डिस्चार्ज

 सातारा दि.29 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 71 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 1775183*
*एकूण बाधित – 238613*
*घरी सोडण्यात आलेले 226274*
*मृत्यू -6006*
*उपचारार्थ रुग्ण- 9693*
0000

424 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.29 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  424 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 7(9802),  कराड 62 (37767), खंडाळा 17 (13801), खटाव 51 (24114), कोरेगांव 28 (20905), माण 54 (16775),  महाबळेश्वर  4 (4585), पाटण  11 (9929), फलटण  90 (34604), सातारा  86 (49115), वाई 10 (15322) व इतर 4 (1894) असे आज अखेर एकूण 238613 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (218), कराड 3 (1159), खंडाळा 1 (192), खटाव  1 (595), कोरेगांव  0 (455), माण 0 (377), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (365), फलटण 1 (674), सातारा  5 (1444), वाई 3 (361) व इतर 0 (78), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6006 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                                0000

Saturday, August 28, 2021

585 जणांना दिला आज डिस्चार्ज

 सातारा दि.28 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 585 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 1760654*
*एकूण बाधित – 238189*
*घरी सोडण्यात आलेले 226203*
*मृत्यू -5991*
*उपचारार्थ रुग्ण- 9339*
0000

540 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.28 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  540 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 4 (9795),  कराड 99 (37705), खंडाळा 14 (13784), खटाव 83 (24063), कोरेगांव 55 (20877), माण 43 (16721),  महाबळेश्वर  2 (4581), पाटण  9 (9918), फलटण  88 (34514), सातारा  105 (48029), वाई 24 (15312) व इतर 14 (1890) असे आज अखेर एकूण 238189 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (215), कराड 2 (1158), खंडाळा 0 (192), खटाव  0 (594), कोरेगांव  0 (455), माण 0 (377), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (365), फलटण 0 (673), सातारा  0 (1438), वाई 0 (358) व इतर 0 (78), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5991 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                                0000

Friday, August 27, 2021

आज जिल्ह्यात 608 जणांना दिला डिस्चार्ज

 सातारा दि.27 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 608 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 1745235*
*एकूण बाधित – 237659*
*घरी सोडण्यात आलेले 225618*
*मृत्यू -5976*
*उपचारार्थ रुग्ण- 9384*
0000

595 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 9 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.27 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  595 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून  9 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 13 (9791),  कराड 42 (37606), खंडाळा 18 (13770), खटाव 70 (23980), कोरेगांव 72 (20822), माण 43 (16678),  महाबळेश्वर  3 (4579), पाटण  16 (9909), फलटण  128 (34426), सातारा  160 (48924), वाई 22 (15288) व इतर 8 (1876) असे आज अखेर एकूण 237649 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (215), कराड 2 (1157), खंडाळा 1 (190), खटाव  1 (594), कोरेगांव  2 (454), माण 1 (376), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (363), फलटण 1 (670), सातारा  0 (1435), वाई 0 (356) व इतर 0 (78), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5976 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                                0000

Thursday, August 26, 2021

अधिकाऱ्यांचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी ; राज्य मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय


वेध माझा ऑनलाइन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आज राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील हे अनुकंपा धोरण लागू करावे.
कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले असून अधिकारी संघटनांची देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला

या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून " महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम २०२१ तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे, यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होतील.
-----0-----

 
.


861 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 9 बाधितांचा मृत्यू ; 844 जणांना दिला आज डिस्चार्ज...

सातारा दि.25 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  861 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून  9 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 24 (9778),  कराड 90 (37564), खंडाळा 32 (13752), खटाव 108 (23910), कोरेगांव 94  (20750), माण 101 (16635),  महाबळेश्वर  4 (4576), पाटण  5 (9893), फलटण  181 (34298), सातारा  186 (48764), वाई 33 (15266) व इतर 3 (1868) असे आज अखेर एकूण 237054 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (214), कराड 2 (1153), खंडाळा 1 (189), खटाव  0(592), कोरेगांव  3 (452), माण 1 (375), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (362), फलटण 0 (666), सातारा  1 (1432), वाई 0 (356) व इतर 1 (78), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5957 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                              

844  जणांना दिला आज डिस्चार्ज

 जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 844 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 1730165*
*एकूण बाधित – 237054*
*घरी सोडण्यात आलेले 225010*
*मृत्यू -5957*
*उपचारार्थ रुग्ण- 9397*
0000                

Wednesday, August 25, 2021

633 जणांना दिला आज डिस्चार्ज

 सातारा दि.25 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 633 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 1713739*
*एकूण बाधित – 236193*
*घरी सोडण्यात आलेले 224166*
*मृत्यू -5927*
*उपचारार्थ रुग्ण- 9380*
0000

635 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि.25 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  635 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून  2  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 7 (9754),  कराड 80 (37474), खंडाळा 12 (13720), खटाव 59 (23802), कोरेगांव 95  (20656), माण 86 (16534),  महाबळेश्वर  6 (4572), पाटण  6 (9888), फलटण  106 (34117), सातारा  140 (48578), वाई 25 (15233) व इतर  13 (1865) असे आज अखेर एकूण 236193 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (212), कराड 2 (1148), खंडाळा 0 (187), खटाव  0(591), कोरेगांव  0 (448), माण 0 (373), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (362), फलटण 0 (660), सातारा  0 (1426), वाई 0 (356) व इतर 0 (76), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5927 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                                0000

Tuesday, August 24, 2021

नारायण राणे प्रकरणावर शरद पवारांनी दिली शेलक्या शब्दात प्रतिक्रिया...

वेध माझा ऑनलाइन
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आयोजित पत्रकारपरिषदेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. शिवसेनेने या विरोधात अतिशय़ आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच शिवसेना व भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे दिसून आले. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने झाली. या सर्व घडामोडींवर राजकीय नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर अगदी मोजक्याच शब्दात माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही. ते त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात.” अशा मोजक्याच शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, राज्यात शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आली. दरम्यान, नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. जुहू इथल्या नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ उडाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणाचा नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेला आहे, “नारायण राणे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं बोलणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरलेली नाही. नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणूक नारायण राणे यांच्या वक्तव्यावरुन राज्याला व देशाला कळली,” असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

आज जिल्ह्यात 791 जणांना मिळाला डिस्चार्ज

सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 791 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 1698400*
*एकूण बाधित – 235167*
*घरी सोडण्यात आलेले 223533*
*मृत्यू -5893*
*उपचारार्थ रुग्ण- 9378*
0000

इंद्रजीत मोहितेंसारख्या कर्तृत्वशून्य नेतृत्वामुळेच सहकार अडचणीत! कृष्णा कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप यांचा डॉ. मोहितेंवर पलटवार

वेध मा ऑनलाइन
कराड
कृष्णा कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्या पॅनेलच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आणि ज्यांना सभासदांनी पूर्णपणे नाकारले, त्या रयत पॅनेलचे नेते डॉ. इंद्रजीत मोहिते यांची स्वत:च्या अस्तित्वासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे. निव्वळ स्व:अस्तित्व सिद्ध करण्याच्या केविलवाण्या धडपडीतून त्यांनी शनिवारी (ता. २२) कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली. पण त्यावेळी त्यांनी सहकाराबद्दल मांडलेली भूमिका नेहमीप्रमाणेच केवळ शब्दांचे निरर्थक बुडबुडे निर्माण करणारी आहे. स्वत:ला विचारवंत सिद्ध करण्यासाठी ते सातत्याने जड भाषेचा वापर करतात. पण त्यातून नेमका कोणताच अर्थबोध ना सभासदांना होतोय, ना सरकारला! अशा असंबंध आणि अर्थशून्य मांडणीमुळेच सभासदांनी याहीवेळी त्यांना नाकारले आहे. पण हे उमजून काम करण्यापेक्षा, कर्तृत्वशून्य राहून केवळ सहकारावर भाषणं झोडणाऱ्या त्यांच्यासारख्या नेतृत्वामुळेच सहकार अडचणीत आला आहे, अशा शब्दांत रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप यांनी डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यावर पलटवार केला आहे.

कृष्णा कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सभासदांनी विरोधी संस्थापक आणि रयत पॅनेलच्या सर्व उमेदवारांना धूळ चारत, सुमारे ११००० च्या मताधिक्याने जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला सत्तेवर पुन्हा आणले आहे. रयत पॅनेलच्या अनेक उमेदवारांचे डिपॉझिटदेखील जप्त झाले असून, त्या पॅनेलचे नेते डॉ. इंद्रजीत मोहिते यांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीनंतर प्रथमच डॉ. मोहिते यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ‘बघ्याच्या भूमिकेमुळे सहकार अडचणीत’ अशा आशयाचे विधान करून त्यांनी सहकार क्षेत्राबद्दलची आपली मते मांडली. मात्र या पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत कृष्णा कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पलटवार केला आहे. 

त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की ज्यांना या निवडणुकीत सभासदांनी सपशेल नाकारले ते डॉ. इंद्रजीत मोहिते अजूनही विचारवंताच्या भूमिकेतच वागत आहेत. त्यांच्या या सततच्या ‘अ’विचारी मांडणीचा उबग सभासदांना गेली अनेक वर्षे आलेला आहे. जड आणि सर्वसामान्य लोकांना न कळणाऱ्या भाषेत बोललो की आपण काहीतरी महत्वाचे आणि ‘भारी’ बोलतोय, असा त्यांचा गोड गैरसमज आहे. यातूनच दिवसेंदिवस त्यांची जनतेशी नाळ तुटत चालली आहे. पण त्याचे कुठलेही सोयरसुतक त्यांना नाही. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले अनेक मुद्देही असेच असंबंध आणि गैरलागू आहेत. खरंतर यातील काही मुद्दे ते निवडणुकीच्या वेळीदेखील सभासदांसमोर मांडत होते. पण सभासदांनी ते मुद्दे स्पष्टपणे धुडकावून लावत, त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. पण तरीही आपले मुद्दे पुढे रेटण्याची भूमिका पाहता, ते सभासदांनी दिलेल्या जनमताचा स्पष्ट आदर करताना दिसून येत आहेत. 

सर्वसामान्य शेतकऱ्यांची समृद्धी हे सहकाराचे ब्रीद राहिले आहे. ते जपण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करत आहोत. किंबहुना सहकारामध्ये काम करणारे अनेकजण आपापल्या परीने सहकाराच्या वृद्धीसाठी झटत आहेत. पण निव्वळ फुकाची शाब्दिक बडबड करणाऱ्या डॉ. इंद्रजीत मोहितेंनी मात्र सहकाराला रसातळाला नेण्याचे काम केले आहे. अन्य सहकारी संस्थांच्या कारभारावर टिका करणारे डॉ. मोहिते ते ज्या सहकारी सस्थांचे संस्थापक - मार्गदर्शक आहेत, त्या सहकारी संस्था आज डबघाईला आल्या आहेत. पण त्याबद्दल मात्र साळसूद मौन बाळगून, केवळ चांगल्या चाललेल्या सहकारी संस्थांवर टीका करण्याशिवाय दुसरा उद्योग त्यांच्याकडे उरलेला नाही. बघ्याच्या भूमिकेमुळे नाही, तर डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्यासारख्या कर्तृत्वशून्य नेतृत्वामुळेच सहकार अडचणीत आला आहे. आणि हे सत्य सभासदांना उमगल्यामुळेच त्यांना कृष्णा कारखान्याच्या सभासदांनी सपशेल नाकारले आहे. सहकाराची काळजी  करण्यापेक्षा त्यांनी स्वत: नेतृत्व करत असलेल्या सहकारी संस्था कशा उभारी घेतील, तेथील सभासदांना त्यांचे पैसे, ठेवी परत कशा मिळतील याची काळजी करावी, असे प्रतिपादन श्री. जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकात केले आहे.
***

529 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  529 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून  2  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 8 (9747 ),  कराड 59 (37432 ), खंडाळा 19 (13708 ), खटाव 42  (23743 ), कोरेगांव 74  (20561 ), माण 50 (16448),  महाबळेश्वर  3 (4566 ), पाटण  6 (9882 ), फलटण  115 (34011 ), सातारा  113 (48538 ), वाई 26 (15208 ) व इतर  14(1852 ) असे आज अखेर एकूण 235696 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (212), कराड 0(1138), खंडाळा 2 (186), खटाव  0(584), कोरेगांव  0 (446), माण 0 (370), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (357), फलटण 2 (656), सातारा  0 (1424), वाई 0 (356) व इतर 0(76), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5893 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                                0000

Monday, August 23, 2021

480 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 12 बाधितांचा मृत्यू ; 1578 जणांना दिला आज डिस्चार्ज

 सातारा दि.23 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  480 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून  12  बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 8 (9739 ),  कराड 41 (37373 ), खंडाळा 21 (13689 ), खटाव 41  (23701 ), कोरेगांव 54  (20487 ), माण 22  (16398 ),  महाबळेश्वर  2 (4563 ), पाटण  6 (9876 ), फलटण  117 (33896 ), सातारा  128 (48425 ), वाई 35 (15182 ) व इतर  5 (1838 ) असे आज अखेर एकूण 235167 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (208), कराड 3 (1134), खंडाळा 2 (181), खटाव  0(578), कोरेगांव  2 (444), माण 1 (357), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (356), फलटण 2  (637), सातारा  2 (1418), वाई 0 (351) व इतर 0(75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5827 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

1578  जणांना दिला आज डिस्चार्ज

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 1578 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

एकूण नमूने – 1684430
एकूण बाधित – 235167
घरी सोडण्यात आलेले 222742
मृत्यू -5827
उपचारार्थ रुग्ण- 9640
0000
                                                                0000

Sunday, August 22, 2021

जिल्ह्यात आज 692 बाधीत तर,216 जणांना दिला आज डिस्चार्ज...

सातारा दि.22 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 216 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.दरम्यान आज जिल्ह्यात 692 जण बाधीत सापडले आहेत तर 43 जण दगावले आहेत.....

*एकूण नमूने – 1672798*
*एकूण बाधित – 234687*
*घरी सोडण्यात आलेले 221164*
*मृत्यू -5803*
*उपचारार्थ रुग्ण- 10738*
0000

कराड शहरात डेंग्यू, चिकुन गुणिया सदृश्य रुग्ण आढळल्यास त्याची कल्पना पालिकेच्या आरोग्य विभागास द्यावी ; आरोग्य सभापती गुंड्याभाऊ वाटेगावकर यांचे महत्वपुर्ण आवाहन...

वेध माझा ऑनलाइन
कराड
डेंग्यू, चिकन गुणियाचा आजार वाढू नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. विनाकारण भीती बाळगू नये. याशिवाय जर आपल्या परिसरात डेंग्यू, चिकुन गुणिया सदृश्य आजाराची लक्षणे असलेले रुग्ण आढळल्यास त्याची कल्पना पालिकेच्या आरोग्य विभागास द्यावी असे महत्वपूर्ण आवाहन आरोग्य सभापती गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी आज साप्ताहिक वेध माझाशी बोलताना केले.

दरम्यान,पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू, चिकन गुणियासारखे रोग पसरू नयेत, यासाठी कराड नगरपरिषद फाईट द बाईट अभियान राबवत आहे. या अभियानांतर्गत शहरातील 45 रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचा आढावा रोज घेण्यात येत असून शहरामध्ये ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे पाच व चिकन गुणियाचा एक रुग्ण आढळून आला आहे. शहरात या दोन्ही रोगाची स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी विनाकारण भीती बाळगू नये, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले

कराड नगरपरिषद स्वच्छतेच्या कामकाजात सातत्य राखून शहरवासियांचे सार्वजनिक आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत असते. स्वच्छ सर्वेक्षणबरोबरच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फाईट द बाईट अभियान आरोग्य विभाग सातत्याने राबवत आहे. मे महिन्यापासून पालिकेने पुन्हा हे अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. मे, जून, जुलै या कालावधीत डासांचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाचे पाणी घराच्या परिसरातील कंटेनर, रिकामी भांडी यात वाढून डासांची उत्पत्ती होत असते. परिणामी या आजाराचे रुग्ण वाढतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे पालिकेने फाईट द बाईट अभियानांतर्गत डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रीनी टीम यांच्या सहकार्याने प्रयत्न केले आहेत. याबरोबरच शहरात घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत असून ग्रीनी व पालिकेचे आरोग्य कर्मचारी घरोघरी भेटी देऊन पाणी साचणार्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथील डासांची उत्पत्ती थांबवत आहेत. नागरिकांना सूचना करत आहेत. सर्वसाधारणपणे घरात फ्रीजच्या पाठीमागील कंटेनरमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडत असल्याची असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले. याबाबत नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. याशिवाय आशा सेविकांच्या मार्फत शहरात सर्वेक्षण करण्यात येऊन जिथे या आजाराचे रुग्ण सापडतील, तिथे लोकांच्या आरोग्याची माहिती घेतली जात आहे. ती आरोग्य विभागात कळवल्यानंतर त्या परिसरात औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात येत आहे. यासाठी लिओ कंपनीच्या दोन आधुनिक मशीन पालिकेने घेतल्या आहेत. याशिवाय रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील नामांकित अशा 45 रुग्णालयांना ग्रीनी टीमतर्फे रोज फोन करून तेथे या आजारांचे रुग्ण दाखल झाले आहेत का याची माहिती रोज घेण्यात येते. 19 ऑगस्टअखेर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे पाच रुग्ण दाखल असून चिकन गुणियाचा केवळ एक रुग्ण दाखल आहे. तर जुलै महिन्यात पाच रुग्ण दाखल होते. शहर व परिसरात सुमारे 300 रुग्णालये असून या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी तालुक्यातून व शेजारच्या जिल्ह्यातून तसेच आणि अन्य तालुक्यातून रुग्ण दाखल होत असतात‌. त्याचा कराड शहराशी संबंध येत नाही. पालिका सातत्याने राबवत असलेल्या डास प्रतिबंधक उपाय योजनांमुळे शहरात या दोन्ही आजाराचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र या दोन्ही आजारांबाबत विनाकारण नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याचे दिसत आहे. पुढील दोन महिने जास्त खबरदारी घेण्यात येणार असल्याचे वाटेगावकर यावेळी बोलताना म्हणाले.


692 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 43 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  692 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून  43 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली  16 (9731 ),  कराड 99  (37332 ), खंडाळा 25  (13668 ), खटाव 108  (23660 ), कोरेगांव 104  (20433 ), माण 62  (16376 ),  महाबळेश्वर  1 (4561 ), पाटण  1 (9870 ), फलटण  100 (33779 ), सातारा  136 (48297 ), वाई 24 (15147 ) व इतर  16 (1833 ) असे आज अखेर एकूण 234687 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (208), कराड 4 (1131), खंडाळा 2 (179), खटाव  3 (576), कोरेगांव  0 (441), माण 1 (355), महाबळेश्वर 0 (88), पाटण 2  (356), फलटण 18  (627), सातारा  12 (1415), वाई 0 (351) व इतर 0(75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5803 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                                0000

Saturday, August 21, 2021

623 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 54 बाधितांचा मृत्यू ; 612 जणांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि.21 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 623  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून  54 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली  7 (9715),  कराड  77 (37233 ), खंडाळा  14 (13643 ), खटाव  95 (23552 ), कोरेगांव  50 (20329), माण  80 (16314 ),  महाबळेश्वर 4  (4560 ), पाटण 8  (9869 ), फलटण  115 (33679 ), सातारा 134  (48161 ), वाई  25 (15123 ) व इतर  14 (1817 ) असे आज अखेर एकूण 233995 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (207), कराड 4 (1127), खंडाळा 0 (177), खटाव   3 (573), कोरेगांव 4  (441), माण 16 (355), महाबळेश्वर 0 (88), पाटण 1 (354), फलटण  17 (609), सातारा 9 (1403), वाई 0  (351) व इतर 0(75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5760 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                              
612 जणांना दिला आज डिस्चार्ज

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 612 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने –1659191*
*एकूण बाधित –233995*
*घरी सोडण्यात आलेले –220948*
*मृत्यू -5760*
*उपचारार्थ रुग्ण- 10262*
0000
                                  0000

Friday, August 20, 2021

आज सातारा जिल्ह्यात 597 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 17 बाधितांचा मृत्यू ; जिल्ह्यात 661जणांना दिला आज डिस्चार्ज...

 सातारा दि.20(जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 597 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 17 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 6 (9708),  कराड 61 (37156), खंडाळा 7 (13629), खटाव 48(23457), कोरेगांव 78(20279), माण 43(16234),  महाबळेश्वर 1 (4556), पाटण 14 (9861), फलटण 185 (33564), सातारा 125 (48028), वाई 15 (15098) व इतर 14 (1803) असे आज अखेर एकूण 233373 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
          तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (207), कराड 2(1123), खंडाळा 0 (177), खटाव 0 (570), कोरेगांव 1 (437), माण 0(339), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0(353), फलटण 10 (592), सातारा 2 (1394), वाई 2 (351) व इतर 0(75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5706 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                             

आज जिल्ह्यात 661जणांना दिला डिस्चार्ज
       
सातारा दि.20 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 661 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 1645271*
*एकूण बाधित – 233373*
*घरी सोडण्यात आलेले – 220336*
*मृत्यू -5706*
*उपचारार्थ रुग्ण-10251*
                                                             0000                  

कराड येथील शिवाजी स्टेडीयममध्ये उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून पाहणी...

वेध माझा ऑनलाइन
कराड
 येथील शिवाजी स्टेडीयममध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून 14 लाख खर्चून नव्याने उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
यावेळी कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, जिल्हा क्रिडाधिकारी युवराज नाईक, नगरसेवक सौरभ पाटील, जयंत पाटील आदी उपस्थित होते. 
जिल्हा वार्षिक योजनेतून या बॅडमिंटन कोर्टसाठी 14 लाख रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाचे 3 बॅढमिंटन कोर्ट उभारण्यात आले आहे. यापूर्वी कराड येथील बॅडमिंटन खेळाडूना बाहेर खेळताना अडचणी येत होत्या. आता नव्याने उभारण्यात आलेल्या कोर्टमुळे त्यांना बाहेर सहजपणे खेळता येणार आहे.  या बॅडमिंटन कोर्टमध्ये  सर्व प्रकारच्या सूविधा देण्यात आलेल्या आहेत. नुकतेच शासनाने निर्बंधामध्ये शिथीलता दिली आहे. त्याचबरोबर अंडरडोअर खेळाला परवानगी दिली आहे. याचा बॅडमिंटन खेळाडूना लाभ होणार आहे. यावेळी खेळाडू व त्यांचे पालक उपस्थित होते.
0000

Thursday, August 19, 2021

751 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.19 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 751नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 36 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
         तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. 
जावली 14 (9702),  कराड 94 (37158), खंडाळा 30 (13622), खटाव 92 (23409), कोरेगांव 40 (20201), माण 85 (16191),  महाबळेश्वर 2 (4555), पाटण 15 (9847), फलटण 168 (33429), सातारा 149 (47953), वाई 49 (15083) व इतर 13 (1789) असे आज अखेर एकूण 232939 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
              तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (207), कराड 6(1121), खंडाळा 0 (177), खटाव 1 (570), कोरेगांव 0 (436), माण 19(339), महाबळेश्वर 0 (88), पाटण 1 (353), फलटण 1 (582), सातारा 1 (1392), वाई 7(349) व इतर 0(75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5689 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
                                                                0000

Tuesday, August 17, 2021

856 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 27 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.17 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 856 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 27 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 18 (9665), कराड 102 (36955), खंडाळा 41 (13584), खटाव 104 (23240), कोरेगांव  54 (20131), माण 102 (16029), महाबळेश्वर 0 (4552) पाटण 21 (9821), फलटण 150(33139), सातारा 236 (47675), वाई 23(14991) व इतर 5(1755) असे आज अखेर एकूण  231537 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (207), कराड 6 (1111), खंडाळा 1 (176), खटाव 4 (565), कोरेगांव  1 (435), माण   1 (320), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0  (351), फलटण 10(574), सातारा 3 (1386), वाई 0 (342) व इतर 0 (75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5630 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0 0 0 0

"त्या' नगरसेविकेची पात्रता काय? माझा भत्ता इतर नगरसेवकांबरोबरीने जमा होत असताना माझ्या मानधनाबाबत घाणेरडे राजकारण का? नगराध्यक्षांचा सवाल...

वेध माझा ऑनलाइन
कराड
कराड नगरपरिषदेतील माझ्या मानधनाबाबत गेले काही दिवस उलट सुलट चर्चा विविध आघाड्यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेमधून सुरु आहेत.  ज्यांची स्वतःची पात्रता काय आहे हे संपूर्ण कराडकरांना माहिती आहे अशी एक शनिवार पेठेतील महिला नगरसेविका स्वत: एक महिला आहोत याचा विचार न करता उचलली जीभ लावली टाळ्याला या प्रकारानुसार अतिशय खालच्या भाषेत माझ्यावर गरळ ओकुन प्रकाशझोतात राहण्याचा अतिशय घाणेरडा प्रकार करत आहे.  तोंड वर करून तुम्ही दुसऱ्यांच्यावर कितीही थुंकायचा प्रयत्न तरी थुंकी शेवटी तुमच्याच तोंडावर पडणार आहे याची जाणीव तुम्हाला नाहि अशा भाषेत नगराध्यक्षा सौ शिंदे यांनी नगरसेविका सौ हुलवान यांचा समाचार निवेदनाद्वारे घेतला आहे 

सौ हुलवान यांनी काही दिवसापूर्वी नगराध्यक्षा सौ शिंदे यांना चोर नगराध्यक्षा म्हणून पत्रकार परिषदेतून हिणवले होते त्यावर पलटवार करताना आज नगराध्यक्षा सौ शिंदेंनी नाव न घेता हुलवान यांच्यावर जबरदस्त हल्लाबोल केला आहे तसेच लोकशाही आघाडी व जनशक्तीवर देखील त्यानी टीका करत त्यांचाही समाचार घेतला आहे 

दरम्यान जनशक्ती आघाडी आणि लोकशाही आघाडी हे दोघेजण मिळून माझ्यावर टीका करीत आहेत . गेले चार - साडेचार वर्ष आपण निद्रिस्त होतात काय ? निवड़णूक जवळ आली की जो माणूस काम करतोय त्याच्या  पाठीमागे आपण का लागलाय , हे कराडकर जनतेला माहित आहे . तुम्ही गेले काही दिवस काय कारस्थान करताय याची संपूर्ण माहिती जनतेला आहे हे तुम्ही विसरू नका या भाषेत नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांनी त्यांच्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपाचा निवेदनाद्वारे समाचार घेतला आहे...दरम्यान माझाही मिटींगचा भत्ता मी स्वतः घेतलेला नाही तर तो भत्ता इतर नगरसेवकांच्या मिटींग भत्त्याप्रमाणे शासकीय जमा झालेला आहे. असाही महत्वपूर्ण खुलासा नगराध्यक्षा सौ शिंदे यांनी या निवेदनातून केला आहे मग माझ्याशी कोणतीही चर्चा न करता परस्पर माझ्या मानधनाचा विषय त्या उपसूचनेमध्ये कसा समाविष्ट केला असा सवालही त्यांनी केला आहे

नगराध्यक्षा सौ शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की...सन २०१६ मध्ये मी लोकनियुक्त नगराध्याक्षा म्हणुन निवडुन आल्यानंतर पहिले तीन वर्ष रू २५००/- इतके प्रतिमाह मानधन मिळत होते. त्यानंतर २३ ऑगस्ट २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व लोकनियुक्त नगराध्यक्षांना प्रतिमाह रु २०,०००/- ( ब वर्ग )इतके मानधन मिळू लागले . माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातून आलेल्या महिलेला ही रक्कम फार मोठी व मोलाची आहे. कोविड कालावधीत झालेल्या मिटिंगमध्ये एक उपसूचना जनशक्ती कडून मांडण्यात आली. त्यामध्ये नगराध्यक्षा,उपनगराध्यक्ष,सर्व नगरसेवक यांचे सर्व मिटींग भत्ते शासकीय जमा करणेबाबत   ठराव मांडला. यामध्ये त्यांनी उपनगराध्यक्ष, तसेच त्यांच्या गटाच्या नगरसेवकांशी चर्चा केली असे त्यांचे म्हणणे आहे.परंतु माझ्याशी कोणतीही चर्चा न करता परस्पर माझे मानधनाचा विषय त्या उपसूचनेमध्ये कसा समाविष्ट केला. बर इतर सदस्यांबरोबर माझाही मिटींगचा भत्ता मी स्वतः घेतलेला नाही .तो भत्ता इतर नगरसेवकांच्या मिटींग भत्त्याप्रमाणे शासकीय जमा झालेला आहे. असे असताना व मानधन हा माझा वैयक्तीक हक्क असतानासुद्धा मला विचारत न घेता परस्पर काहीही मुद्दे घालून उपसूचना मांडायची. म्हणजे हा नगराध्यक्षा म्हणुन माझ्या वैयक्तिक अधिकारांचे हनन करण्याचा विरोधकांचा डाव आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे.

 तसेच यामध्ये ३२ नगरसेवकांचे आजअखेर झालेल्या मिटिंगचे भत्ते प्रत्येकी एकूण  साधारणपणे ७००/- ते ८००/- शासन जमा झालेत . त्याचप्रमाणे माझ्याही मिटिंगचे भत्ते ७००/- ते ८००/- एकूण शासन जमा झालेत. असे असताना माझे वर्षभराचे वैयक्तिक मानधन रु.२ लाख ४० हजार हे सुद्धा शासनाच्या तिजोरीत जमा करा हे कितपत रास्त आहे .म्हणजे ज्या नगरसेवकांचे करोडोचे व्यवसाय -मालमत्ता आहे, जे पिढयानपिढया राजकारणाचा उपयोग व्यवसाय म्हणून करतात अशा गब्बर नगरसेवकांचे ८००/- रुपये कोविड मदत म्हणून जमा आणि माझ्यासारख्या सामान्य कष्टकरी  घरातून आलेल्या महिलेकडून मात्र सदर ८००/- रुपए भत्ता देण्याबरोबरच मानधनाचेही रु.२ लाख ४० हजार जमा करा म्हणणे म्हणजे माझा हक्क ओरबाडून घेण्याचा हा प्रकार आहे. म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या महिलेसोबत अतिशय घाणेरडे राजकारण करण्याचा हा प्रकार आहे.  

दरमहा मला जे २० हजार रुपये मानधन मिळते आहे, त्यामधील काही रक्कम मी निश्चितच सामाजिक कार्यासाठी तसेच गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी मागील २-३ वर्षांपासुन खर्च करते आहे. त्याची वाच्यता करून मला प्रसिद्धी-मोठेपणा मिळवायचा नाही. कारण हि बाब माझ्या मानसिक समाधानासाठी मी करत असून त्याची मी कधीही प्रसिद्धी करीत नाही.

 गेले अनेक दिवस काही आघाड्या, नगरसेवक हे माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर जावून वैयक्तिक टीका करू लागले आहेत. शनिवार पेठेतील एक नगरसेविका तर टीका करताना आपण एक महिला आहोत याचे तारतम्य विसरून वैयक्तिक भांडण असल्याप्रमाणे अतिशय हीन पातळीवर उतरून टीका करत आहेत. सामान्य कुटुंबातील महिलेने पुढे जावून राजकारण - समाजकारण भाग घ्यायचाच नाही का ? काही प्रस्थापित नेते, घराणे यांचीच मक्तेदारी नगरपालिकेत राहीली पाहिजे अशी मानसिकता यांची आहे , ती योग्य आहे का? मी करत असलेल्या कामामुळे एका सामान्य कुटुंबातील महीलेला लोकप्रियता मिळत आहे .कराडचे नागरिक मला अनेक रूपात आशीर्वाद देत आहेत. आणि सर्व कराडकर मायबाप माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातुन आलेल्या महिलेला साथ देतील , अशा मला आशा आहे.  असेही प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे... 

कराड शहरात डेंग्यूचे रुग्ण सापडू लागले ; पालिकेकडून उशिरा का होईना पण उपाययोजना सुरु ; शहरात धुरांडी फिरू लागली...उपाययोजना राबवण्यात सातत्य अपेक्षित...

वेध माझा ऑनलाइन
कराड
शहरात आता डेंग्यूचे रुग्ण सापडू लागले आहेत झालेल्या मोठ्या पावसानंतर साथीच्या रोगाचो शक्यता ओळखून पालिकेने शहरातून धुरांडी फिरवत प्रिकोशन्स घ्यायला सुरुवात केल्याचे दिसून आले पालिकेने आणलेल्या नवीन धुरांडे मशीनची चाचणी यानिमित्ताने आज करण्यात आल्याचेही समजले खरतर जोराचा पाऊस झाल्यावरच पालिकेने साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित होते मात्र उशिरा का होईना पण आरोग्य खात्याला जाग आल्याने दिसते आहे आता ही उपाययोजना राबवण्यात कितपत सातत्य राहणार हाही प्रश्न आहेच 

 दरम्यान या एकूणच विषयाबाबत पालिकेतील विरोधीपक्ष आवाज उठवेल अशी अपेक्षा असताना तसे होताना दिसले नाही राजकीय आरोप करण्याबरोबरच सामाजिक प्रश्नाचे निराकरण व्हावे यासाठीदेखील विरोधीपक्ष वेळोवेळी सतर्क दिसला पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही अशी चर्चा असते

मागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसाने खूप ठिकाणची पडझड झाली काहीजण स्थलांतरित झाले अनेकजण मृत्युमुखी पडले असे चित्र राज्यात विविधठिकाणी निर्माण झाले असताना कराड शहर व परिसरात देखील पावसाने दाणादाण उडवून देत जनजीवन विस्कळीत करून टाकले होते मात्र सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे पुन्हा जनजीवन सुरळीत होताना दिसत असले तरी झालेल्या पावसामुळे शहरात अद्यापही काही ठिकाणी नाले तुंबले आहेत त्यामुळे तेथे घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य आहे काही ठिकाणी रस्त्यात खड्डे काढून पालिकेची कामे सुरू आहेत आणि अजून पाऊस अधून मधून पडतच असल्याने तेथे चिखल निर्माण होऊन डासांचे वाढते प्रमाण आढळून येत आहे यामुळे त्याठिकाणी साथीच्या रोगाचा प्राधुरभाव होण्याची भिती आहे या विषयाचे गांभीर्य ओळखून पालिका आरोग्य खात्याने याबाबत उपाययोजना करणे अपेक्षित असताना अजून शहरात पेशंट आढळून येत नाहीत म्हणून की काय पण त्याकडे फारसे लक्ष दिले नाही असे दिसले आणि आता शहरात डेंग्यू ने तोंड वर काढले आहे शहरातील पत्रकारही डेंग्यू ने बाधीत झाले आहेत 

 उपाययोजना म्हणून पालिकेकडून धुरांडी फीरण्यास सुरुवात झाल्याचे दिसले पालिकेने आणलेल्या नवीन धुरांडे मशीन ची ट्रायलदेखील त्यानिमित्ताने झाल्याचे समजते दरम्यान नियमित पावडर फवारणी औषध फवारणीसह आणखी आवश्यक त्या उपाययोजना आता सातत्याने शहरात झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा आहे एकीकडे कोरोना अजूनही कमी होण्याचे नाव घेत नाही असे असताना साथीच्या रोगांना वेळीच थांबवण्यासाठी उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे खरतर मोठा पाऊस झाल्यानंतर साथीचे रोग पसरण्याची भीती ओळखून या उपाययोजना होणे गरजेचे होते मात्र तसे होताना दिसले नाही आता पेशंट शहरात सापडू लागले आहेत त्यामुळे आता उशिरा का असेना पण उपाययोजना होताना दिसू लागल्या आहेत तसेच शहरातील काही दवाखान्यामधून डेंग्यूसह मलेरिया व चिकन गुनियाचे रुग्णदेखील आढळून येत असल्याचे समजते अजूनही पाऊस पडण्याबाबत संकेत मिळत आहेत त्यामुळे यादेखील आजारांचा प्राधुरभाव वाढण्याची चिंता आहे नागरी वस्तीत पावसामुळे पडलेले खड्डे वाढलेली अनावश्यक झुडपे ठिकठिकाणी डबक्यात साचलेले पाणी काही ठिकाणचे तुंबलेले नाले यामुळे डास वाढतच आहेत  या एकूणच विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून पालिकेने शहराच्या आरोग्याचा विचार करत डासांचा प्राधुरभाव रोखण्याला प्राधान्य देणे व त्याबाबतच्या उपाययोजना अधिकाधिक राबवणे यासाठी आता प्रयत्न करण्याची गरज आहे 

दरम्यान या सामाजिक प्रश्नाबाबत पालिकेतील विरोधीपक्ष आवाज उठवेल अशी अपेक्षा शहराला होती मात्र तसे झाले नाही राजकीय आरोप प्रत्यारोप करण्याबाबत तत्परता दाखवणारा विरोधीपक्ष शहराच्या अशा प्रश्नाबाबतही सतर्क दिसणे गरजेचे आहे अशी आता यापुढे लोकांना अपेक्षा आहे 

Monday, August 16, 2021

569 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.16 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 569 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 11 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 17 (9647), कराड 60 (36870, खंडाळा 18 (13543), खटाव 85 (23136), कोरेगांव  51 (20077), माण 69 (15927), महाबळेश्वर 2 (4552) पाटण 5 (9800), फलटण 84(32989), सातारा 139 (47539), वाई 36(14968) व इतर 3(1750) असे आज अखेर एकूण  230798 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (206), कराड 0 (1105), खंडाळा 0 (175), खटाव 0 (561), कोरेगांव  2 (434), माण   1 (319), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0  (351), फलटण 3 (564), सातारा 5 (1383), वाई 0 (342) व इतर 0 (75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5603 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0 0 0 0

Sunday, August 15, 2021

653 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.15 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 653 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 5 (9630), कराड 103 (36810, खंडाळा 31 (13525), खटाव 61 (23051), कोरेगांव  47 (20026), माण 66 (15858), महाबळेश्वर 1 (4550) पाटण 12 (9795), फलटण 163(32905), सातारा 140 (47400), वाई 19(14932) व इतर 5(1747) असे आज अखेर एकूण  230229 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (206), कराड 3 (1105), खंडाळा 0 (175), खटाव 22(561), कोरेगांव  0 (432), माण   1 (318), महाबळेश्वर 0 (88), पाटण 2  (351), फलटण 4 (561), सातारा 2 (1378), वाई 0 (342) व इतर 0 (75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5592 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0 0 0 0

Saturday, August 14, 2021

785 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 27 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.14 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 785 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 27 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 33 (9625), कराड 122 (36707), खंडाळा 35 (13494), खटाव 123 (22990), कोरेगांव  52 (19979), माण 61 (15792), महाबळेश्वर 6 (4549) पाटण 8 (9783), फलटण 156(32742), सातारा 141 (47260), वाई 42(14913) व इतर 6(1742) असे आज अखेर एकूण  229576 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (206), कराड 6 (1102), खंडाळा 0 (175), खटाव 5(539), कोरेगांव  0 (432), माण   2 (317), महाबळेश्वर 1 (88), पाटण 2  (349), फलटण 1 (557), सातारा 6  (1376), वाई 3 (342) व इतर 1 (75), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5558 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0 0 0 0

Friday, August 13, 2021

सातारा जिल्ह्यात शिथिलतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; दुकाने राहणार रात्री 10 वाजेपर्यंत खुली... व्यापाऱ्यांच्यात समाधान...

वेध माझा ऑनलाइन
 कराड
सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निरबंधामध्ये शिथिलता देत जिल्ह्यातील दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत उघडण्या बाबतचे महत्वपूर्ण आदेश आज जारी केले आहेत.या आदेशाची अमलबजावणी सोमवार पासून होणार आहे.

या आदेशामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व व्यापारी दूकाने सर्व दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे मात्र दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांची लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. शॉपिंग मॉल्स मध्ये जाताना लसीकरण प्रमाणपत्र फोटोसह ओळखपत्र दाखवणे अवश्यक आहे. या शिवाय रात्री दहापर्यंत वाढवून वेळ मिळालेल्या मध्ये उपहारगृहे, बार, जिम्नॅशियम, योग, सलून सेंटर, स्पा इनडोअर स्पोर्ट्स आदींचा समावेश आहे. विवाह सोहळ्यासाठी तहसीलदार यांची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहेत. सिनेमागृह व मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, धार्मिक स्थळे ही बंदच राहणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील सर्व मैदाने उद्याने स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. ज्या नागरिकांचे लसीचे दोन्ही दिवस पूर्ण झाले आहेत त्या नागरिकांना बाहेरच्या राज्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी RTPCR चाचणीची आवश्यकता नसणार आहे. मात्र अन्य प्रवासासाठी 72 तास पूर्वीची RTPCR चाचणी निगेटीव्ह किंवा 14 दिवस विलगीकरण आवश्यक राहणार आहे.


मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील दि. 11 ऑगस्ट 2021 अन्वये संपूर्ण राज्याकरिता नव्याने सूचना निर्गमित करणेत आलेल्या असून त्यानुसार सातारा जिल्हयाकरिता जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह यांनी साथरोग अधिनियम, 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे नव्याने आदेश पारित केले आहेत.

उपहारगृहे -खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. उपहारगृह, बारमध्ये प्रवेश करताना, प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहिल. उपहारगृह, बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचा-याचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह, बारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल.

वातानुकुलित उपहारगृह, बार असल्यास, वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल. प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहिल. उपहारगृह, बारमध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी. उपहारगृह, बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहिल. बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री 09.00 वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

सातारा जिल्हयातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविंड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.

सातारा जिल्हयातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दूसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.

जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा : वातानुकुलित तसेच विनावातानुकूलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, उक्त संस्था वातानुकूलीत असल्यास, वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील.

इनडोअर स्पोर्टस : इनडोअर स्पोटर्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच, या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूना बैंडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.

कार्यालय / औद्योगिक / सेवाविषयक आस्थापना : सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पुर्ण करण्यात यावे. ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचा-यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झालेले असेल त्या आस्थापन पुर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे ज्या आस्थापना वरील कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचा-यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे.

शासकीय - निमशासकीय कार्यालये नियमित वेळेत पुर्ण क्षमतेने चालू ठेवणेस परवानगी असेल. तसेच खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील. सातारा जिल्हयातील सर्व मैदाने, उद्याने स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.

विवाह सोहळे : विवाह सोहळा आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. खुल्या प्रांगणातील, लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविंड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. खुल्या प्रांगण, लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल. बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादित असेल, मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिका-याला तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक राहिल.

या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल, कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल, मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन, बँडपथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधीत सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.

सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स : सातारा जिल्हयात सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ( स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

धार्मिक स्थळे : सातारा जिल्हयातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील. तथापि सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक, धार्मिक सेवा करणेस मुभा राहील.

आंतरराज्य प्रवास : ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना, बाहेरच्या राज्यातून सातारा जिल्हयात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहिल. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. यास्तव गर्दी, जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे, क्रिडा स्पर्धा इ. वरील निर्बंध कायम राहतील. सातारा जिल्हयातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की, मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारिरीक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध, इ. सर्व निर्बंधांचे पालन करणे अनिवार्य राहिल.

सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक, व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेव कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पुर्ण होऊन 14 दिवस झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचाऱ्यांची यादी (लसीकरण माहिती / प्रमाणपत्रासह) तयार ठेवावी व सक्षम प्राधिकाऱ्यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करुन दयावी.

दुकाने, उपहारगृहे, बार, मॉल्सचे, कार्यालये, औद्योगिक यांचे नियतकालीक निर्जतूकीकरण व सॅनीटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधीत मालकाची व व्यवस्थापनाची असेल. तसेच, यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड, कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच यामध्ये मास्क डिस्पेंसर व बायोमेडीकल वेस्ट (वापरलेले मास्क व टिशु पेपर्स इत्यादीची विल्हेवाट) जमा करण्याची व विहित कार्यपध्दतीने विल्हेवाटीसाठी देण्याची जबाबदारी संबंधीत आस्थापनांची असेल.

अंत्यविधी व दशक्रिया विधी - जास्तीत जास्त 50 नातेवाईक/नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दशक्रिया विधी करणेस परवानगी असेल.CONTAINMENT ZONE बाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे ज्या ज्या वेळी स्वतंत्र आदेश काढून CONTAINMENT ZONE जाहीर करतील व सदर क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करतील ते आदेश CONTAINMENT ZONE क्षेत्रास लागू राहतील.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सातारा जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हीटी रेट 10 पेक्षा कमी असल्यने जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व ग्रामपंचायत स्तरावर कोविड प्रतिबंधात्मक खालील अटी व शर्तींचे अधिन राहून ऑफलाईन ग्रामसभांचे आयोजन करण्यास जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.


1090 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 13 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.13 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1090 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 13 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 26 (9592), कराड 160 (36585), खंडाळा 39 (13459), खटाव 154 (22867), कोरेगांव  86 (19927), माण 136 (15731), महाबळेश्वर 0 (4543) पाटण 30 (9775), फलटण 194(32586), सातारा 211 (47119), वाई 50(14871) व इतर 4(1736) असे आज अखेर एकूण  228791 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (206), कराड 2 (1096), खंडाळा 0 (175), खटाव 0(534), कोरेगांव  0 (432), माण   1 (315), महाबळेश्वर 0 (87), पाटण 0  (347), फलटण 5 (556), सातारा 5  (1370), वाई  1 (339) व इतर 0 (74), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5531 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0 0 0 0

Thursday, August 12, 2021

पावसकरांचे राजकारण काँग्रेसच्या कुबड्यांवर ...जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांचा घणाघात

कराड
जनशक्तीकडे बहुमत आहे का याची काळजी तुम्ही करू नका.आमची आघाडी सक्षम आहे. तुम्ही ज्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा घेतला ते काँग्रेसचे सदस्य आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी स्थायी समितीवर आपल्याला जाता यावे.यासाठी भाजपाने काँग्रेसचा घेतलेला हा पाठिंबा आहे. पावसकरांचे राजकारण हे काँग्रेसच्या कुबड्यांवर चालणारे राजकारण आहे.त्यांनी आमची मापे काढण्यापेक्षा स्वतःचे आत्मचिंतन करावे. अशी बोचरी टीका जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्यावर केली. दरम्यान आमचा आरोप पावसकर गटावर आहे मात्र भारतीय जनता पार्टीबद्दल आम्हाला आदर आहे असे खोचक विधान देखील राजेंद्र यादव यांनी यावेळी केले...

 कराड पालिकेत आयोजित पत्रकार बैठकीत ते आज (गुरुवारी) बोलत होते. यावेळी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती सौ.स्मिता हुलवान,बांधकाम सभापती हणमंतराव पवार, नगरसेविका प्रियांका यादव, ओंकार मुळे, राहुल खराडे, निशांत ढेकळे आदी उपस्थित होते.

 राजेंद्रसिंह यादव म्हणाले, 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून' याप्रमाणे भाजपाच्या या गटाचे राजकारण सुरू आहे. जनशक्ती आघाडी ही पक्षविरहित स्थानिक आघाडी आहे. यामध्ये सर्व पक्षाचे समविचारी सदस्य आहेत. जनशक्तीकडे बहुमत आहे का... हे तपासण्यापूर्वी पावसकरानी गेल्या साडेचार वर्षात काय केले हे संपूर्ण कराडकरांना माहित आहे. आमची आघाडी सक्षम आघाडी आहे. पण तुम्हीच तुमच्या लोकनियुक्त नगराध्यक्षावर फिरस्ती, उचापती, नगराध्यक्षा मिटींग काढत नाहीत, टक्केवारी घेतल्याशिवाय बिलावर सह्या करीत नाहीत.असे आरोप  केले होते. परंतु आम्ही नगराध्यक्षांना नेहमीच सहकार्याची भूमिका ठेवली होती. परंतु गेल्या सहा महिन्यात अशी कोणती  जादू झाली की नगराध्यक्षांना या सर्व गोष्टींचा विसर पडला आहे.

 गावाच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे ही आपली पहिल्यापासून भूमिका आहे. परंतु गावाचा बुद्धिभेद करून भाजपाच्या पावस्कर गटाचे राजकारण सुरू आहे. 270 कोटी रुपयांचे बजेट उपसूचनेद्वारे मंजूर झाले. हा आमचा नेतिक विजय आहे. कराडकरांना कोणत्याही प्रकारची करवाढ न करता आम्ही हा अर्थसंकल्प दिला आहे. परंतु भाजपाच्या या गटाने अर्थसंकल्पाबाबत बुद्धिभेद, लबाडी व फसवणूक करण्याचा प्रकार केला आहे. अर्थसंकल्पामधील अनेक कागदपत्रे गहाळ झाली आहेत. ऑडिओ-व्हिडिओ गायब झाले आहेत. नगरपालिका सभागृहात जे बोलले जाते, ते प्रोसिडिंगवर येत नाही. प्रोसिडिंगवर खाडाखोड  केली जात आहेत. हे सर्व या भाजपा गटाचे कारस्थान आहे. या भाजपा गटाने अर्थसंकल्पाचा परिपूर्ण अभ्यास केलेला दिसत नाही. आम्ही जो 270 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यामध्ये नगरपालिकेला कसली झळ बसली आहे का? असा सवाल उपस्थित करून राजेंद्रसिंह यादव म्हणाले, कराड हे स्मार्ट सिटी बनवण्याचे आम्ही स्वप्न पहात आहोत. हे स्वप्न पूर्ण करून दाखवण्याची आमच्यात धमक आहे. परंतु विरोधकांना अशी स्वप्न पडतात की नाही हे माहीत नाही. नगराध्यक्षांनी 134 कोटी रुपयांचे बजेट स्वतःच्या सहीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले. यावर  मुख्यधिकाऱ्यांची सही नाही. तसेच अर्थसंकल्प एकमताने मंजूर आहे. असा खोटा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून देऊन नगराध्यक्षांनी सभागृहाची तसेच जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यानंतर त्यांनी सात दिवसानंतर दिलेल्या अहवालात एकमताने हा शब्द मी नजरचुकीने लिहिला आहे असे म्हंटले आहे. यावरून त्यांची नैतिकता दिसून येते.

 नगराध्यक्षांना विशेषता भाजपाच्या गटाला महामानवाबद्दल आकस दिसत आहे. अर्थसंकल्पामध्ये महामानवांच्या विकासाला विरोध केला आहे.आम्ही निधी आणला असे पावसकर नेहमी बोलतात.परंतु, शासनाने दिलेला हा निधी आहे.तो जनतेचाच  पैसा आहे, तुम्ही निधी काय स्वतःच्या खिशातून दिला का? तुम्ही कुठल्याही कामाचा पाठपुरावा करीत नाही आणि न केलेल्या कामाचे श्रेय मात्र घेता. तुमच्याकडून केवळ खुर्च्या झिजवण्याचे काम केले जाते असा घणाघातही राजेंद्रसिंह यादव यांनी यावेळी केला.

 विजय वाटेगावकर म्हणाले,गेल्या एक वर्षापासून नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभा काढली नाही. त्यामुळे अनेक विषय प्रलंबित आहेत. मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्वसाधारण सभेसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केले असल्याचेही त्यांनी सांगितले. घंटागाडी चा शहरात गाजलेला विषय असो किंवा नगराध्यक्षाचा सहीचा विषय असो त्यांच्या एकूणच कारभारावर वाटेगावकर यांनी यावेळी जोरदार टीका केली