कराड
सन 2020-21 या वर्षातील कराड शहरातील मिळकत धारांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी या मागणीचे निवेदन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील याना आज माजी नगरसेवक विचारमंच च्या वतीने देण्यात आले
यावेळी या मंचचे अध्यक्ष अडव्होकेट सतीश पाटील उपाध्यक्ष अशोकराव पाटील दादा तसेंच सुभाषकाका डुबल प्रदीप जाधव नंदकुमार बटाणे घनश्याम पेंढारकर दीपक पेंढारकर हरीश जोशी आनंदराव लादे ऍडव्होकेट मानसिंगराव पाटील विजय मुठेकर उदय हिंगमिरे प्रमोद वेर्णेकर आदी माजी नगरसेवक उपस्थित होते
कराड नगरपालिकेने 2020 व 21 या कालावधीमधील घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी या मागणीचे निवेदन ना बाळासाहेब पाटील याना देण्यासाठी शहरातील माजी नगरसेवक सदस्यांनी माजी नगरसेवक विचारमंचच्या माध्यमातून उपस्थित रहावे असे आवाहन मंचचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील यांनी केले होते त्यानुसार आज माजी नगरसेवकांनी एकत्र येवुन सदर निवेदन ना बाळासाहेब पाटील यांना दिले
गेली दोन वर्षे लॉक डाऊनमुळे जनतेचे कम्बरटे अक्षरशः मोडून पडले असताना सर्वांचेच अर्थिक गणित बिघडून गेले आहे त्यामुळे येथील पालिकेने आकारलेली भरमसाठ घरपट्टी व पाणीपट्टी रद्द व्हावी अशी मागणी जनतेकडून होत आहे माजी नगरसेंवक विचार मंचच्या माध्यमातून या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न शहरातून सुरू आहे त्याचनिमित्ताने आज पालकमंत्र्यांना याबाबतचे बिवेदन देण्यात आले दोन दिवसांपूर्वी पालिका प्रशासनालाही याबाबतचे निवेदन या मंचच्या वतीने देण्यात आले आहे
No comments:
Post a Comment