शहरात झालेल्या मोठ्या पावसामुळे अनेक ठिकणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याची परिस्थिती बनली आहे त्यामुळे डासांचे प्रमाण शहरात वाढल्याने मलेरिया चिकन गुनीया - डेंग्यू सारखे आजार बळावण्याची भीती आहे त्यावर पालिका प्रशासनाने शहरात योग्य ती उपाययोजना करावी या मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील व डॉ सौ सविता मोहिते यांनी मुख्याधिकारी डाके यांना नुकतेच दिले यावेळी सौ मीनाक्षी मारुलकर प्रियांका पाटील यांच्यासह शहर व परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या
मागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसाने खूप ठिकाणची पडझड झाली काहीजण स्थलांतरित झाले अनेकजण मृत्युमुखी पडले असे चित्र राज्यात विविधठिकाणी निर्माण झाले असताना कराड शहर व परिसरात देखील पावसाने दाणादाण उडवून देत जनजीवन विस्कळीत करून टाकले होते मात्र सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे पुन्हा जनजीवन सुरळीत होताना दिसत असले तरी झालेल्या पावसामुळे शहरात अद्यापही काही ठिकाणी नाले तुंबले आहेत त्यामुळे तेथे घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य आहे काही ठिकाणी रस्त्यात खड्डे काढून पालिकेची कामे सुरू आहेत आणि अजून पाऊस अधून मधून पडतच असल्याने तेथे चिखल निर्माण होऊन डासांचे वाढते प्रमाण आढळून येत आहे यामुळे प्राधुरभाव होण्याची त्याठिकाणी भिती आहे
शहरातील काही दवाखान्यामधून डेंग्यू मलेरिया व चिकन गुनियाचे रुग्ण आढळून आले आहेत अजूनही पाऊस पडण्याबाबत संकेत मिळत आहेत त्यामुळे डासांचा प्राधुरभाव आणखी वाढण्याची चिंता आहे नागरी वस्तीत पावसामुळे पडलेले खड्डे डबकी, त्यात साचलेले पाणी यामुळे देखील डास वाढत आहेत या एकूणच सर्व विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून पावसामुळे निर्माण होणारे आजार शहरात वाढू नयेत याकरिता पालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात या मागणीचे निवेदन डॉ सौ सविता मोहिते व माजी नगराध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील याच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके याना देण्यात आले यावेळी शहर व परिसरातील अनेक महिलांची उपस्थिती होती
No comments:
Post a Comment