Friday, August 6, 2021

इनरव्हिल झोनल सब को-ऑर्डिनेटर पदी कराडच्या रूपाली डांगे

कराड
इनरव्हिल डिस्ट्रिक्ट ३१३च्या झोनल सब-कॉर्डिनेटर पदी कराडच्या रूपाली डांगे यांची नूतन असोसिएशन सचिव अनुराधा चांडक व डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोष सिंग यांनी निवड केली.

रूपाली डांगे या इनरव्हील क्लब ऑफ कराड च्या माजी अध्यक्षा असून त्यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करत इनरव्हील क्लब ऑफ कराडला एकुण तेरा बक्षिसे मिळवून दिली. इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१३ मधील एकूण ७१ क्लब मधून त्यांना बेस्ट प्रेसिडेंट -१  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे महाबळेश्वर ,भोर, लोणंद या क्लब ची जबाबदारी दिली आहे 

त्यांच्या निवडीबद्दल इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षा मंजुषा इंगळे ,सचिव ऋता चाफेकर आणि सर्व सदस्यांनी  तसेच रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे ,सचिव अभय पवार व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment