कराड
शहरात आता डेंग्यूचे रुग्ण सापडू लागले आहेत झालेल्या मोठ्या पावसानंतर साथीच्या रोगाचो शक्यता ओळखून पालिकेने शहरातून धुरांडी फिरवत प्रिकोशन्स घ्यायला सुरुवात केल्याचे दिसून आले पालिकेने आणलेल्या नवीन धुरांडे मशीनची चाचणी यानिमित्ताने आज करण्यात आल्याचेही समजले खरतर जोराचा पाऊस झाल्यावरच पालिकेने साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित होते मात्र उशिरा का होईना पण आरोग्य खात्याला जाग आल्याने दिसते आहे आता ही उपाययोजना राबवण्यात कितपत सातत्य राहणार हाही प्रश्न आहेच
दरम्यान या एकूणच विषयाबाबत पालिकेतील विरोधीपक्ष आवाज उठवेल अशी अपेक्षा असताना तसे होताना दिसले नाही राजकीय आरोप करण्याबरोबरच सामाजिक प्रश्नाचे निराकरण व्हावे यासाठीदेखील विरोधीपक्ष वेळोवेळी सतर्क दिसला पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही अशी चर्चा असते
मागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसाने खूप ठिकाणची पडझड झाली काहीजण स्थलांतरित झाले अनेकजण मृत्युमुखी पडले असे चित्र राज्यात विविधठिकाणी निर्माण झाले असताना कराड शहर व परिसरात देखील पावसाने दाणादाण उडवून देत जनजीवन विस्कळीत करून टाकले होते मात्र सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे पुन्हा जनजीवन सुरळीत होताना दिसत असले तरी झालेल्या पावसामुळे शहरात अद्यापही काही ठिकाणी नाले तुंबले आहेत त्यामुळे तेथे घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य आहे काही ठिकाणी रस्त्यात खड्डे काढून पालिकेची कामे सुरू आहेत आणि अजून पाऊस अधून मधून पडतच असल्याने तेथे चिखल निर्माण होऊन डासांचे वाढते प्रमाण आढळून येत आहे यामुळे त्याठिकाणी साथीच्या रोगाचा प्राधुरभाव होण्याची भिती आहे या विषयाचे गांभीर्य ओळखून पालिका आरोग्य खात्याने याबाबत उपाययोजना करणे अपेक्षित असताना अजून शहरात पेशंट आढळून येत नाहीत म्हणून की काय पण त्याकडे फारसे लक्ष दिले नाही असे दिसले आणि आता शहरात डेंग्यू ने तोंड वर काढले आहे शहरातील पत्रकारही डेंग्यू ने बाधीत झाले आहेत
उपाययोजना म्हणून पालिकेकडून धुरांडी फीरण्यास सुरुवात झाल्याचे दिसले पालिकेने आणलेल्या नवीन धुरांडे मशीन ची ट्रायलदेखील त्यानिमित्ताने झाल्याचे समजते दरम्यान नियमित पावडर फवारणी औषध फवारणीसह आणखी आवश्यक त्या उपाययोजना आता सातत्याने शहरात झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा आहे एकीकडे कोरोना अजूनही कमी होण्याचे नाव घेत नाही असे असताना साथीच्या रोगांना वेळीच थांबवण्यासाठी उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे खरतर मोठा पाऊस झाल्यानंतर साथीचे रोग पसरण्याची भीती ओळखून या उपाययोजना होणे गरजेचे होते मात्र तसे होताना दिसले नाही आता पेशंट शहरात सापडू लागले आहेत त्यामुळे आता उशिरा का असेना पण उपाययोजना होताना दिसू लागल्या आहेत तसेच शहरातील काही दवाखान्यामधून डेंग्यूसह मलेरिया व चिकन गुनियाचे रुग्णदेखील आढळून येत असल्याचे समजते अजूनही पाऊस पडण्याबाबत संकेत मिळत आहेत त्यामुळे यादेखील आजारांचा प्राधुरभाव वाढण्याची चिंता आहे नागरी वस्तीत पावसामुळे पडलेले खड्डे वाढलेली अनावश्यक झुडपे ठिकठिकाणी डबक्यात साचलेले पाणी काही ठिकाणचे तुंबलेले नाले यामुळे डास वाढतच आहेत या एकूणच विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून पालिकेने शहराच्या आरोग्याचा विचार करत डासांचा प्राधुरभाव रोखण्याला प्राधान्य देणे व त्याबाबतच्या उपाययोजना अधिकाधिक राबवणे यासाठी आता प्रयत्न करण्याची गरज आहे
दरम्यान या सामाजिक प्रश्नाबाबत पालिकेतील विरोधीपक्ष आवाज उठवेल अशी अपेक्षा शहराला होती मात्र तसे झाले नाही राजकीय आरोप प्रत्यारोप करण्याबाबत तत्परता दाखवणारा विरोधीपक्ष शहराच्या अशा प्रश्नाबाबतही सतर्क दिसणे गरजेचे आहे अशी आता यापुढे लोकांना अपेक्षा आहे
No comments:
Post a Comment